पटेल कॅश अ‍ॅन्ड कॅरी

"पटेल कॅश अँड कॅरी"
मी स्वतःशीच हसले, हे वाचून.
आत गेल्यावर
बचकभर गवार कोंबली
हातातल्या पारदर्शक प्लॅस्टिकमधे

इथले व्यवहारही असेच.
पारदर्शक पिशवीत दिसतात हिरव्या तजेलदार भाज्या
पण आतून बेचव, कधी राठ.
बघा, पटेल, तर यू कॅन कॅश इन
अँड कॅरी ऑन
समहाऊ.

आधी आधी चीजचॉकलेटं
खाल्ली ओ येईस्तोवर
पण मूळचा कांद्या-मुळ्याचा, आलं-लसुणाच्या वाटण्याच्याही वास
(का सहवास!) जाता जात नाही घरातून
कितीही कॅण्डल लावल्या तरीही.
लोकही विचारतातच आवर्जून, "तुम्ही वडाभात कसा करता?"
आणि वडीलमाणसं तर सदा कानामागे
"मेरा भरीत महान" गुणगुणतच असतात.
फक्त पुढे हे पालुपद जोडून, की "आम्ही म्हातारी माणसं,
तेव्हा बघा...
पटेल तर!"

देशातून परत येतांना मात्र
काय भरू काय नको होत राहतं
पापडासारखे मनाचे पीळ तिकडून आणायचे सहज
इथे येऊन कडक कोरडे वाळवून घ्यायचे
कारण ज्यादिवशी सगळी शक्ती संपलेली असते
त्यादिवशी खिचडीला
त्यांचाच आधार होतो
पण नाहीच आणता आले, तर आहेच
पटेल - कॅश अँड कॅरी
पटेल - तुम्हालाही हळूहळू, पटेल

रोजचीच त्रेधातिरपीट: कधी ही कणीक, कधी ती
तरीही
कॉइलवर, कितीही रक्त आटवलं
तरीही
क्षणात वातड वातड होणाऱ्या
त्या वैतागवाण्या पोळ्या!

त्यावर उपाय म्हणून की काय
मसाल्यात गच्चं भरलेला
गंधास्वादाचा संस्कार
आजकाल सढळ हातानेच करू लागले आहे
कधीकधी तर भसकन पडतोच!
मग शेजारीच नव्हे, तर पोरंही नाकं वाकडी करत विचारतात
"मॉमी, इट सीम्स यू मेड युअर मंथली ट्रिप टू दॅट...
व्हॉचामा कॉल इट...पटेल?"

पण विसरू देत नसतो इथला बर्फ
तुम्हाला तुमचं गोठलेलं वास्तव
रस्तेच बंद होतात तेव्हा, ब्रेड ऑम्लेट, पास्ता, सूप
भगवावंच लागतं
पण शनी-रवी त्या पटेल मधली गर्दी बघून
कधी असंही वाटतं:
की वी शूड बी एबल टू कॅरी ऑन
विदाउट धिस........पटेल!

खूपशी स्वप्नंही मग पडून राहतात
महिनोंमहिने फ्रीजरमध्ये
दामटून, वा दयेपोटी, पोरं झोपलीच लवकर
तर दोघांनी पिक्चर बघत
एकमेकांना चमच्या-चमच्याने भरवायची.
जस्ट हीट अॅंड सर्व्ह!

अळणीच रुटीनवर, रोज भांडणांच्या फोडण्या
घालायच्याही...दोघांनीच मिळून
पण धुराने वाजणाऱ्या भोंग्याने
ओशाळंही व्हायचं लागेचच! कारण पटेल, न पटेल
तरी शेवटी हीच कॅश कॅरी करायची आहे
जन्माची पूंजी- म्हातारपणी!

पहिल्यांदा पाऊल टाकलं होतं
देसी ग्रोसरीत, तो क्षण...
अजूनही आठवतो
विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हंटलं होतं
"अय्या! खरंच इथे सगळंच मिळतं की!"
आता वाटतं, खरंही आहे ते......
पटेल, हळूहळू पटेल.
कॅश अँड कॅरी.
ऑन.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

फारच मस्त लिहिलंय. आवडलं असं म्हणवत नाही, पण आवडलंच. 'पटेल' वरचा शब्दखेळ विशेष आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

असेच म्हणतो. अुद्या जायचंय पटेलला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दखेळ गमतीशीर.

जानेवारीत खोऱ्यानं दिसणाऱ्या विमानतळांवरच्या फेसबुकी चेकिनचा मुहूर्त चुकवून आलेलं प्रकटन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रत्येक डिसेंबरपासून मार्चपर्यंत मला मरो ती थंडी, मी विमानात बसून पळते कधी एकदाची, असं होत असतं. तुमची मज्जा मज्जा आहे बुवा! सुट्टी सुरू असेल, तर मस्तच, नाहीतर..... 'थंडीचाही वेगळा चार्म आहे, पटेल्...पटेल...." Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरीबांच्या टेक्सासात उन्हाळ्याचा एवढा त्रास होतो की चार दिवस हुडहुडायला झालं तरी खपवून घेते; डिसेंबरात थंडीचा मलाही बराच त्रास होतो. दिवस लहान झालेला असतो, थंडी, बोचरे‌ वारे, त्यात ढग आले की आणखीनच कंटाळा येतो. पण ख्रिसमस येईस्तोवर या प्रकाराची जरा सवय होते. जानेवारीच्या मध्यानंतर दिवस मोठा व्हायला लागलाय हे जाणवतं. 'आता थोडेच दिवस' असं म्हणत मी घरात टोमॅटो, बाझिल, भेंडी वगैरेंच्या बिया पेरायला घेते. एकदा बागेची कामं सुरू केली की कंटाळा खूपच कमी होतो. मात्र इथे उन्हाळा पेटतो तेव्हा भारतातले लोक फेसबुकवर पावसाळी फोटो लावून लावून जीव जळवतात.

ह्या वर्षी तर आमच्याकडे फेब्रुवारीतच वश्या आलाय. (उन्हाळ्याचा विचार मी सध्या करत नाहीये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरे वा! मस्त लिहिलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तम कविता.

परक्या भूमीत गेल्यावर होणारी कुतरओढ कुठलेही उमाळे न काढता मांडलेले आहेत. परदेशात येणं ही कॅशसाठीची गरज अाहे. आणि मग आहे त्याच परिस्थितीत कॅरी ऑन करावं लागतं. ही तडजोड फार छान पद्धतीने पकडलेली आहे.

कॅरी ऑन, पटेल, मेरा भरीत महान वगैरे शब्दप्रयोग आणि त्यांवर केलेले श्लेष भन्नाट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला इतकी परिस्थिती असते इथली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिस्थिती वाईट नाहिये, पण कधीकधी आपल्याला कुठल्या गोष्टीचं उगीचच, जास्तच वाईट वाटतं. फीमेल हार्मोन्स की काय ते असावेत, किंवा दर हिवाळ्यात मला हे असंच वाटत असावं Smile

बाकी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद! लिहायला हुरूप येतो तुमच्या कौतुकाने! _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कविता जगत आहे त्यामुळे "पटेल"ली आहे. फूलनामशिरोमणी यांचे आभार की त्यांच्यामुळे कॉलर ताठ झाली की आपणही ब्वॉ कविता जगतोय Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवल्डी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता मजेशीर आहे. एनाराय जगण्यातल्या गमतीजमती टिपणारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हे तो प्रचितीचे बोलणे!
काँग्रेसचे रजनी पटेल, जनताचे शांती पटेल, मराठी मनाला हे कसे पटेल ?
(शिवसेना, १९७८ च्या आसपास!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

छान.
माझ्या मते परदेशात (पाश्चिमात्त्य, विशेषत। यूएस अमेरिकेत) आल्यानंतरच्या १ वर्पासून ते साधारण ३-४ वर्षांपर्यंत ही मनःस्थिती होते - "येथे सर्व चक्चकीन, पण दिखाऊ आहे."

आल्या-आल्या १ वर्ष - "किती मस्त!" (स्वच्छ रस्ते आणि शिस्त बघून)
मग ३-४ वर्षे - "किती दिखाऊ खोटेपणा" (सौजन्याने वागणारे सहकारी कधी घरी बोलावत नाहीत, खरे मित्रत्व करत नाहीत म्हणून)
मग हळू-हळू अनेक वर्षे लागतात - "इथे असे असते तर... आता समजू लागले आहे". (स्थानिक रीती, बोलण्यातील खाणाखुणा वगैरे समजू लागतत, आणि संवाद समजून-उमजून होऊ लागल्यानंतर मित्र भेटतात)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0