‘प्रेमाला’ जाऊन भांडे लपविणे...

पुरुषानं कसं सडेतोड असावं. मुळूमुळू करणं हा इतरांचा प्रांत. धडाकेबाजपणा हा पुरुषाचा मूळ गुणधर्म. तो त्यानं जपला पाहिजे अन् योग्यवेळी व्यक्त केलाही पाहिजे. मनात कुढत बसणे त्याचा पिंड नाहीच. जे वाटते, जे आवडते, जे पटते ते बोलून मोकळे होणे हाच खरा पुरुषार्थ. तसेच जे मनाविरुद्ध घडते, जे आवडले नाही अन् ज्यात आपले इप्सित साध्य होत नाही त्याचा प्रतिकार करणे, बिनतोडपणे त्याचा जाहीर लिलाव करणे व त्या विरुध्द आवाज उठविणे हाच पुरुषाचा धर्म असतो.
असो. इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे काही पुरुष ताकाला जातात खरे पण भांडं लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु समोरची पार्टी महाचाणाक्ष असते. तिला सिक्थसेन्स नावाचा प्रकार अवगत असतो. केवळ नजरेच्या विभ्रमानुसार पुरुषाच्या मनातली खळबळ अन् तळमळ ती जाणू शकते. त्याला नेमकं काय ओकायचं आहे हे ती जाणतेच पण तसे न दाखवता त्या पार्टीलाही आपले सूप्त हेतू पुरुषाकडून पूर्ण करवून घ्यायचे असतात. मग ती त्याचा टाय पकडून त्याला कुत्र्यासारखे हिंडवित जाते. पुरुष बिचारा आता तरी समोरची पार्टी हो म्हणेल, नंतर तरी ती सगळं हवाली करेल या आशेवर खोटं खोटं प्रेमाचं नाटक करीत राहतो, आपल्या शरीरातील गर्मी अन् उर्मी दोघींनाही दाबत राहतो.
प्रेमळपणाचा आव आणणे हा पुरुषाचा डाव असून समोरच्या पार्टीला कधी एकदा चीतपट करून कुस्ती मारतोय हा त्यामागे मूळ हेतू असतो आणि यात गैर ते काहीच नाही. पुरुष निसर्ग नियमाला धरूनच वागत असतो. फक्त व्यक्ती तितक्या प्रकृति या न्यायाने त्यात भावभावनांचे मिश्रण म्हणा किंवा डिव्होशन म्हणा असे उपप्रकार घुसडून प्रेम व्यक्त केले जाते, निभावले जाते. खरा चेहरा त्याने झाकलेलाच असतो. मग ताकाला जाऊन आपलं भांडं लपवायचं कशासाठी? सरळ सांगून टाकायचं ना- ‘कभी मेरे साथ, कोई रात गुजार...’ समोरच्या पार्टीदेखत ‘इलू इलू’ करण्यात काय अर्थ आहे. ती जर हो म्हणाली तर ठीक, नाही तर नेक्स्ट!
जे निसर्गानं बहाल केलंय त्याचा बेधडक वापर करायला हवा. आडवळणाने जाऊन वेळ कशाला घालवायचा? फटाफट सांगून मोकळं व्हायचं- ‘मला तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करणार आहे. बोल तुला मंजूर आहे की नाही?’ कदाचित समोरची पार्टी आपल्या श्रीमुखात भडकावून देईल. पण घाबरून जायचे कारण नाही. तिला जे वाटत असतं ना की दुसरा कुणी निष्काम प्रेम करणारा भेटेल, तर तो त्या पार्टीचा गोड गैरसमज असतो. फार फार तर दोन तीन महिने तो नवखा भिडू ‘दम’ काढेल, नंतर मात्र आपले मनोवांछित फल प्राप्त्यर्थम कसे होईल याचीच संधी शोधीत राहील. प्रेम केल्यानंतर ओघाने ‘चाळे’ येतातच. झुडपाआड लपून कुणी काही ‘सोज्ज्वळ’ प्रेमाच्या गुजगोष्टी करीत बसत नसतो. किंवा त्याला ‘एकांत’ का हवा असतो, हे समोरच्या पार्टीला कळत नाही असे समजणे चूक समजावे का म्हणून? जर तिलाही हे कळलेले असेल तर आपल्याला जे हवं ते बेधडक सांगून टाकायला कचरायचं का म्हणून?
‘पोरींना प्रेम करायला कारण लागतं तर मुलांना प्रेम करायला जागा लागते!’ ही उक्ती काही चुकीची नाही. निवांत, अंधाऱ्या, निर्जन जागा पोरींपेक्षा पोरांनाच जास्ती माहिती असतात, हे काय उगाच नाही. जंगलातल्या नवनव्या वाटा, खडकाळ आडोसे, दऱ्याखोऱ्या, अर्धवट लेण्या व गुहा, ओसाड मंदिरे, चिडीचूप माळराने अशी कितीतरी ठिकाणे पोरांच्या हिटलिस्टवर असतात ते का म्हणून?
म्हणूनच ‘प्रेमाला’ जाऊन कधीच भांडं लपवायचं नसतं. कारण आपला बहुमुल्य वेळ वाया घालवून उचंबळून येणाऱ्या निसर्गाला पुरुषानं का म्हणून कोंडून ठेवायचं?

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (3 votes)

प्रतिक्रिया

जळ्ळे मेले प्रेम. काय वाचते आहे रे मी श्रीरामा?
सुसंस्कृत रमाबाई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुसंस्कृत रमाबाई

जरा 'चन्द्रमस्' चालवून दाखवता का रमाआज्जी, प्लीज? अंमळ विसरलोय.

नाही म्हणजे, तुमच्या पिढीचं पाठांतर अंमळ बरं असायचं म्हणून ऐकलंय, तुमच्याच पिढीतल्या लोकांकडून, म्हणून म्हटलं... अगदी ऐकून थकवा येईपर्यंत ऐकलंय. सांगणारे सांगून कसे थकत नसत, तेच जाणोत. बाकी तुमची पिढी, काहीही म्हणा, पण भारी चिवट बुवा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाबा रे, पिढ्यांमध्ये भांडणे का लावतोस? आताच्या पिढीतही सुसंस्कृत मुले आहेत रे.पण स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही चालवून घ्यायचे हे काही पटत नाही. म्हंटले तर कर्मठ म्हण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile
बरोबर आहे तुमचं .. पण 'ही उर्मी स्त्रियांमधे नसते असे वाटत नाही
मुली/स्त्रियादेखील या बाबतीत जराही मागे नाहित असे निरिक्षण आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुली/स्त्रियादेखील या बाबतीत जराही मागे नाहित असे निरिक्षण आहे
बस्स? फक्त निरिक्षण आहे?
अनुभव आहे असं ल्ह्या की राव बिंदास!
उगाच 'प्रेमाला जाऊन भांडं कशाला लपवायचं'?
Wink

गोल बुडाच्या भांड्यांचा चाहता,
पिवळा डांबिस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपला बहुमुल्य वेळ वाया घालवून उचंबळून येणाऱ्या निसर्गाला पुरुषानं का म्हणून कोंडून ठेवायचं?

अगदी बरोबर...

-तर्कतीर्थ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संपुर्ण जगाकडे केवळ 'ब्लॅक अ‍ॅड व्हाईट' नजरेने पहाण्याचा डॉक्टरांचा दृष्टीकोन आणि सातत्य वाखाणण्याजोगं आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

... रंगांधळेपणातून तमाम दुनियेला रंगेलपणाची बतावणी करण्याचे कसब. निव्वळ प्रशंसनीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि डोळ्यावर पट्टी बांधून १८५७ सालच्या कल्पनांना घट्ट कवटाळून बसणे. ... पण हे फार रटाळ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगला प्रयत्न, पण

पण हे फार रटाळ आहे.

अदितीबैंशि सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या लेखनावर बहुतांश लोकांनी तक्रारी केलेल्या दिसतात. मला व्यक्तिशः हे लेखन प्रचंड आवडलेलं नसलं तरी इतक्या तक्रारी करण्यायोग्य वाटलं नाही.

बहुतेकांना रंगेलपणे व काहीशा एकांगी दृष्टीकोनातून लेखन आल्यासारखं वाटलेलं आहे. माझ्या मते दिवट्यांनी एक व्हॅलिड दृष्टिकोन मांडलेला आहे. बहुतेक व्यक्ती या दृष्टीकोनातून कधी ना कधी, काही प्रमाणात का होईना विचार करतात. प्रत्येकच लेखक आपला एक दृष्टीकोन मांडतो. आपलाच्च दृष्टिकोन बाळगावा, कायम, असं प्रत्येक लेखकाचं मत असावं असं मला वाटत नाही.

या तक्रारी वाचून मला भारतीय दार्शनिकांनी चार्वाकाच्या दर्शनाला ज्या तुच्छतेने वागवलं त्याची आठवण झाली.

आणि डोळ्यावर पट्टी बांधून १८५७ सालच्या कल्पनांना घट्ट कवटाळून बसणे.

लिंगसापेक्ष भूमिका या कालातीत आहेत. दिवटेंनी ज्या 'स्ट्रॅटेजी' सांगितलेल्या आहेत, त्यांची चर्चा उत्क्रांतीवादामध्ये गेम थिअरीच्या अनुषंगाने केलेली मी वाचलेली आहे.

वरील लेखाबद्दल माझी तक्रार असेल ती फक्त या विषयात पुरेसं खोलवर न जाता वरवर, काहीशा संदिग्ध शब्दांत मांडणी केलेली आहे, इतकीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरसकटीकरण. ज्याला गणपाने ब्लॅक-अँड-व्हाईट नाव दिलं, 'न'वी बाजूंनी रंगांधळेपणा म्हटलं आणि मी गतकाळातल्या गोष्टींना कवटाळून बसणं म्हटलं. लेखातली ही पहिलीच दोन वाक्य घ्या:

पुरुषानं कसं सडेतोड असावं. मुळूमुळू करणं हा इतरांचा प्रांत.

किती हे स्टीरीओटाईप्स! त्यातून 'इतरां'चा प्रांत काय? स्त्रिया हा शब्द एवढा का टाकाऊ आहे? का संपूर्ण प्राणीजगतात पुरूष आणि इतर अशी विभागणी असल्याचं लेखकाला सुचवायचं आहे? जुन्या जमान्यातल्या (बहुदा उच्चवर्णीयच) स्त्रिया मुळुमुळू करणार्‍या असतील. पण अगदी १८५७ मधेही घोड्यावर बसून शत्रूवर तलवार चालवणारी होती.
लेखाची सुरूवातच स्त्रियांप्रती हीनत्त्व दर्शवणारी, सरसकटीकरण करणारी असेल तर पुढचं वाचकांनी वाचावं का? आणि वाचलं तर प्रतिक्रिया द्यावी का? दिलीच तर गोग्गोड शब्दांत 'चान चान' म्हणावं का?

आपलाच्च दृष्टिकोन बाळगावा, कायम, असं प्रत्येक लेखकाचं मत असावं असं मला वाटत नाही.

असं असेल तर उत्तमच. माझा दृष्टीकोन एवढाच आहे की सदर लेख सरसकटीकरण आणि तुच्छतेने बरबटलेला आहे. लेखकाला लिहायचंय ते लिहू देत, मला ते भयंकर रटाळ (आणि टाकाऊ) वाटतं त्यामुळे मी तशीच प्रतिक्रिया (लिहीलीच तर) लिहीणार.

लेखक महोदय या मतांची निदान नोंद घेतील का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्त्रिया हा शब्द एवढा का टाकाऊ आहे

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेश घासकडवींशी बाडिस.
इच्छुकांनी याविषयावरचे "The Game" हे पुस्तक मिळवून वाचावे असे सुचवतो (त्या पुस्तकावरची टीकाही अवश्य वाचावी आणि मिळाल्यास देहभान हे नाटकही पाहावे/वाचावे असे सुचवतो.)
आपल्या नैसर्गिक ऊर्मींप्रमाणे वागून आनंद मिळवणारा एक मोठा वर्ग जगात असल्याची जाणीव होऊन स्वतःच्याच संस्कार, नीतिनियमांमध्ये अडकून 'जमत नाही म्हणून सभ्य' असलेल्या वर्गाच्या आर्थिक प्रगतीपाठोपाठ होणार्‍या 'जागृती'चे 'सांगोपांग' विवेचन या निमित्ताने करता आले असते असे वाटते. लेखकाने ही एक संधी गमावली आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असल्या लेखांमुळे एरवी 'जागतिक महिला दिन' हा आता एक उत्सवी (आणि म्हणून कंटाळवाणा) समारंभ झाला असला तरी त्या दिवसाची, त्या निमित्ताने होणा-या प्रयत्नांची आणि नव्या स्वप्नांची गरज आहे अजून हे पुन्हा एकदा लक्षात येत!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिवट्यांच नाव बघितलं की कंटेटबद्दल बांधलेला अंदाज फार क्वचितच चुकतो
हमखास यशस्वी प्रकारातलं

बाकी चालू देत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

व्यक्तिशः मलाही लेख नाही आवडला पण श्रीरामपंतांनी काही प्रमाणात खरे सांगितले आहे हे मात्र निश्चित. काळ जुना असो वा नवा, पुरुषांची प्रेमाची व्याख्या अगदी ठरलेली असते. अनेक वेळा स्त्रियांनाही हे आवडत असते.गुलाबाचे फूल देवून कविता म्हणणारा प्रियकर हल्ली किती मुलींना आवडत असेल कुणास ठावूक्.त्यापेक्षा बाईकवरुन फर्रदिशी तिला नेवून शॉपिंगमालमध्ये नेणारा त्या पसंत करतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रेम केल्यानंतर ओघाने ‘चाळे’ येतातच.
अरारारा काय वाक्य आहे!!!!!!!! ‘चाळे’? एखाद्या डॉक्टरनी (कसले का असेनात वैद्यकीय क्षेत्रातले किंवा पी. एच. डी.) एवढे बरबटलेले (संपूर्ण लेख) लिहावे? डॉक्टरांची प्रेमाची व्याख्या काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल (आता इथे लेख वाचून काय कळले नाही का? असेही कोणी विचारतील, पण तरीही).
प्रत्येक अशा नात्याचे हे एक आणि एकच फलित असते का? शारीरिक खर आहेच पण मानसिक काहीच नाही का? प्रेमाचे नाटक वगैरे डॉक्टरानी लिहिले आहे.

रमाबाई कुरसुंदीकरांचे वाक्य
पुरुषांची प्रेमाची व्याख्या अगदी ठरलेली असते
परत सरसकटीकरण
प्रत्येक पुरुषाचे सरसकटीकरण केल्याबद्दल डॉ. दिवटे आणि रमाबाई कुरसुंदीकरांचा निषेध.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या डॉक्टरनी (कसले का असेनात वैद्यकीय क्षेत्रातले किंवा पी. एच. डी.) एवढे बरबटलेले (संपूर्ण लेख) लिहावे?

प्रसाद, doctor हा शब्द क्रियापदाच्या अंगाने वापरला तर त्याला To falsify or change in such a way as to make favorable to oneself असे म्हणतात. त्यादृष्टीने... असो! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला दिवटे यांचा लेख काही विशेष आवडलेला/पटलेला नाही. मात्र तो खालीलप्रमाणे बदलला तर कमी वादग्रस्त होईल असं वाटलं.... Smile
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माणसानं कसं सडेतोड असावं. मुळूमुळू करणं हा आपला प्रांत नव्हे. धडाकेबाजपणा हा आपला मूळ गुणधर्म असो किंवा नसो, तो आपण जपला पाहिजे अन् योग्यवेळी व्यक्त केलाही पाहिजे. मनात कुढत बसणे आपला पिंड नाहीच. जे वाटते, जे आवडते, जे पटते ते बोलून मोकळे होणे हाच खरा माणूसपणाचा अर्थ. तसेच जे मनाविरुद्ध घडते, जे आवडले नाही अन् ज्यात आपले इप्सित साध्य होत नाही त्याचा प्रतिकार करणे, बिनतोडपणे त्याचा जाहीर लिलाव करणे व त्या विरुध्द आवाज उठविणे हाच मानव्याचा धर्म असतो.

असो. इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे काही व्यक्ती ताकाला जातात खरे पण भांडं लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु समोरची पार्टी महाचाणाक्ष असते. तिला सिक्थसेन्स नावाचा प्रकार अवगत असतो. केवळ नजरेच्या विभ्रमानुसार भांडं लपवणार्‍याच्या मनातली खळबळ अन् तळमळ ती जाणू शकते. त्याला नेमकं काय ओकायचं आहे हे ती जाणतेच पण तसे न दाखवता त्या पार्टीलाही आपले सूप्त हेतू भांडं लपवणार्‍याच्याकडून पूर्ण करवून घ्यायचे असतात. मग ती समोरच्याचा टाय/पदर पकडून त्याला कुत्र्यासारखे हिंडवित जाते. भांडं लपवणारा बिचारा आता तरी समोरची पार्टी हो म्हणेल, नंतर तरी ती सगळं हवाली करेल या आशेवर खोटं खोटं प्रेमाचं नाटक करीत राहतो, आपल्या शरीरातील गर्मी अन् उर्मी दोघींनाही दाबत राहतो.

प्रेमळपणाचा आव आणणे हा माणसांचा डाव असून समोरच्या पार्टीला कधी एकदा चीतपट करून कुस्ती मारतोय हा त्यामागे मूळ हेतू असतो आणि यात गैर ते काहीच नाही. माणूसप्राणी निसर्ग नियमाला धरूनच वागत असतो. फक्त व्यक्ती तितक्या प्रकृति या न्यायाने त्यात भावभावनांचे मिश्रण म्हणा किंवा डिव्होशन म्हणा असे उपप्रकार घुसडून प्रेम व्यक्त केले जाते, निभावले जाते. खरा चेहरा त्याने झाकलेलाच असतो. मग ताकाला जाऊन आपलं भांडं लपवायचं कशासाठी? सरळ सांगून टाकायचं ना- ‘कभी मेरे साथ, कोई रात गुजार...’ समोरच्या पार्टीदेखत ‘इलू इलू’ करण्यात काय अर्थ आहे. ती जर हो म्हणाली तर ठीक, नाही तर नेक्स्ट!
जे निसर्गानं बहाल केलंय त्याचा बेधडक वापर करायला हवा. आडवळणाने जाऊन वेळ कशाला घालवायचा? फटाफट सांगून मोकळं व्हायचं- ‘मला तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करणार आहे. बोल तुला मंजूर आहे की नाही?’ कदाचित समोरची पार्टी आपल्या श्रीमुखात भडकावून देईल. पण घाबरून जायचे कारण नाही. तिला जे वाटत असतं ना की दुसरा कुणी निष्काम प्रेम करणारा भेटेल, तर तो त्या पार्टीचा गोड गैरसमज असतो. फार फार तर दोन तीन महिने तो नवखा भिडू ‘दम’ काढेल, नंतर मात्र आपले मनोवांछित फल प्राप्त्यर्थम कसे होईल याचीच संधी शोधीत राहील. प्रेम केल्यानंतर ओघाने ‘चाळे’ येतातच. झुडपाआड लपून कुणी काही ‘सोज्ज्वळ’ प्रेमाच्या गुजगोष्टी करीत बसत नसतो. किंवा त्याला ‘एकांत’ का हवा असतो, हे समोरच्या पार्टीला कळत नाही असे समजणे चूक समजावे का म्हणून? जर तिलाही हे कळलेले असेल तर आपल्याला जे हवं ते बेधडक सांगून टाकायला कचरायचं का म्हणून?
‘प्रेमविषयांना प्रेम करायला कारण लागतं तर प्रेमिकांना प्रेम करायला जागा लागते!’ ही उक्ती काही चुकीची नाही. निवांत, अंधाऱ्या, निर्जन जागा प्रेमीविषयांपेक्षा प्रेमिकांनाच जास्ती माहिती असतात, हे काय उगाच नाही. जंगलातल्या नवनव्या वाटा, खडकाळ आडोसे, दऱ्याखोऱ्या, अर्धवट लेण्या व गुहा, ओसाड मंदिरे, चिडीचूप माळराने अशी कितीतरी ठिकाणे प्रेमिकांच्या हिटलिस्टवर असतात ते का म्हणून?
म्हणूनच ‘प्रेमाला’ जाऊन कधीच भांडं लपवायचं नसतं. कारण आपला बहुमुल्य वेळ वाया घालवून उचंबळून येणाऱ्या निसर्गाला प्रेमिकानं का म्हणून कोंडून ठेवायचं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हम्म
आता मुक्तसुनीत यांनी स्रियांना एखादा पुरुष आवडल्यास त्यानी कस अँप्रोच व्हाव याबद्दलही लेख लिहावा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

माझ्यामते वरील "लेख" उभयलिंगी आहे. आपण पुन्हा एकदा वाचून पहावा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.