हरि बिन कूण गती मेरी। - इतर भाषेतील रत्ने - भाग -१

नये साल की पहली सुबह तुम्हें क्या दूं मैं ?
एक फूल अमन के लिए,
एक बन्दूक आज़ादी के लिए,
एक किताब संग-साथ के लिए ?
तुम्हारी आंखों के लिए नयी चमक ?
तुम्हारे ख़ून के लिए नयी गरमी,
तुम्हरे प्रेम के लिए नयी नरमी,
दिल के लिए नयी आशा, संघर्ष के लिए नयी भाषा ?
नये वर्ष में दूर हों ग़म,
नये वर्ष में मिटें सितम,
नये वर्ष में दुख हों कम,
सिर झुकें नहीं, बांहें थकें नहीं,
टूटें सभी बेड़ियां, मिले नया दम ।

रचनाकार: नीलाभ

कधी कधी भाषेची भिंत उध्वस्त होते ती अश्या कवीच्या मुळे / लेखकांच्यामुळे.
मराठीमध्ये, हिंदीमध्ये व इतर अनेक भारतीय भाषेत अनेक कवी लेखक होऊन गेले, आहेत व येतील जे आपल्या या तणावपुर्ण जिवनात काही क्षण आपले साथी बनून राहतील. वरील कविता जेव्हा मी वाचली तेव्हा दंग राहिलो होतो. एक एक ओळ म्हणजे अप्रतिम आहे, प्रत्येक ओळ एवढी समर्थ आहे कवी समोर नतमस्तक व्हावे माणसाने.

सिर झुकें नहीं, बांहें थकें नहीं,
टूटें सभी बेड़ियां, मिले नया दम ।

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येवर लिहलेली असेल ही कविता त्यांनी. तरूण रक्ताला जागृत करण्यासाठी.. जोष, एक उल्हास निर्माण करण्यासाठी निर्मित झालेली असावी ही कविता.

काही कविता भुरळ घालतात मनात कुठेतरी घर करून राहतात, त्यामध्ये नावे घ्यावीत असे खूप आहेत पण एक नाव नक्कीच सर्वात प्रथम येईल माझ्या लिस्ट मध्ये मीरा !

अरे प्रेमात वेडे होणे म्हणजे काय हे मीराच्या भजनांकडे पाहिले की कळते. भक्तीची परमोच्च सीमा रेखा पार करून ज्याला इश्वर मानले त्याच्यावरच प्रेम करायचे व ते देखील एवढं उच्च किती हातात आलेला विषप्याला देखील अमृत म्हणून घ्यायचे, हा साधा खेळ नाही आहे. त्यासाठी मीराच व्हावे लागते, मीरा आपल्या समोर फक्त येते काव्य स्वरूपात, तीने केलेल्या तीच्या बोली भाषेतील रचनेत, राजस्थानी म्हणजे पहाडी आवाज असलेला, खडी बोली ज्याला म्हणतात अशी भाषा पण त्या भाषेची गोडी जरा वेगळीच आहे.
*
हरि बिन कूण गती मेरी।
तुम मेरे प्रतिपाल कहिये मैं रावरी चेरी॥

आदि अंत निज नाँव तेरो हीयामें फेरी।
बेर बेर पुकार कहूं प्रभु आरति है तेरी॥

यौ संसार बिकार सागर बीच में घेरी।
नाव फाटी प्रभु पाल बाँधो बूड़त है बेरी॥

बिरहणि पिवकी बाट जोवै राखल्यो नेरी।
दासि मीरा राम रटत है मैं सरण हूं तेरी॥
*

हरि बिन कूण गती मेरी।
तुम मेरे प्रतिपाल कहिये मैं रावरी चेरी॥

कृष्णा तुझ्या वाचून कोण माझे, मला या संसाराच्या भवसागरातून पार करण्यास तुच समर्थ, पण जर तूच जर नसशील तर माझे काय होईल. तुच माझे सर्वस्व आहेस व तूच माझी काळजी घेणारा आहे.. येथे मीरा स्वतःला रावरी चेरी म्हणत आहे, रावरी चेरी = कट्टर समर्थक Smile कट्टर भक्त !

आदि अंत निज नाँव तेरो हीयामें फेरी।
बेर बेर पुकार कहूं प्रभु आरति है तेरी॥

अरे तुझे नाव माझ्या हदयात फेरे धरून नाचत आहे, क्षणाक्षणाला तुझी आठवण येत आहे, सुरवात तूच व माझा शेवट ही तूच, असे वेड्या सारखं तुझे नाव घेत आहे, पण याला वेडेपणा म्हणून नकोस हीच तुझ्यासाठी मी रचलेली आरती, पुजा आहे देवा !

यौ संसार बिकार सागर बीच में घेरी।
नाव फाटी प्रभु पाल बाँधो बूड़त है बेरी॥

या संसाराच्या विक्राल सागराच्या मध्यात मी अडकलेली आहे, तीच सुटका कर रे माझी, नाव फाटी , अरे या भवसागरात अडकत चाले आहे मी, तुच त्राता आहेस तूच मला यातून बाहेर काढशील... हात दे मला, या बुडत्या जहाजातून बाहेर पडण्यासाठी, पाल बाँधो प्रभु !

बिरहणि पिवकी बाट जोवै राखल्यो नेरी।
दासि मीरा राम रटत है मैं सरण हूं तेरी॥

मी, वाट पाहत आहे तुझी, ये व मला जवळ घे, आपल्यात सामावून घे माधवा, सगळे हरले आता, दासी झाली मीरा... तुझ्या नामस्मरण मध्येच दंग आहे, लवकर ये व आपल्या जवळ कर.

किती साध्या सोप्या बोली भाषेत लिहलेली रचना आहे, काही उदाहरणे देणे, त्यातून आपली अजोड भक्ती देवा समोर मांडणे व त्याची आर्जव करण्यासाठी धडपणे ही मीरा च्या रचनेची खासियत म्हणावी लागेल. प्रयेक ओळ आपल्या ह्दयाला स्पर्श करून जाते, तीच्या प्रेमाची, भक्तीची तुलना कोणाशी होऊच शकत नाही, मीरा ही मीराच आहे, दुसर्‍या एका रचनेत तीला माधवा बरोबर राधा ची उपस्थिती खलती आहे हे स्पष्ट म्हणते पण त्याच नंतर लगेच, राधा शिवाय तुझ्यावर एवढं प्रेम करणार म्हणून ती ची महती देखील कबूल करते. ही समर्पणाची भावना मीरा च्या शब्दाशब्दांत आहे म्हणून ती मला जरा वेगळीच भासते, आवडते.

आता जरा वेगळी रचना.. माझ्या अत्यंत आवडत्या गझलकराची निदा फ़ाज़ली यांची !

कुछ तबीयत ही मिली थी ऐसी चैन से जीने की सूरत ना हुई
जिसको चाहा उसे अपना ना सके जो मिला उससे मुहब्बत ना हुई

जिससे जब तक मिले दिल ही से मिले दिल जो बदला तो फसाना बदला
रस्में दुनिया की निभाने के लिए हमसे रिश्तों की तिज़ारत ना हुई

दूर से था वो कई चेहरों में पास से कोई भी वैसा ना लगा
बेवफ़ाई भी उसी का था चलन फिर किसीसे भी शिकायत ना हुई

वक्त रूठा रहा बच्चे की तरह राह में कोई खिलौना ना मिला
दोस्ती भी तो निभाई ना गई दुश्मनी में भी अदावत ना हुई

किती स्पष्ट व अर्थपुर्ण रचना !
पहिली ओळ "कुछ तबीयत ही मिली थी ऐसी चैन से जीने की सूरत ना हुई" पाया आहे तर शेवटीची ओळ "दोस्ती भी तो निभाई ना गई दुश्मनी में भी अदावत ना हुई" कळस आहे.

दोस्ती भी तो निभाई ना गई दुश्मनी में भी अदावत ना हुई
मैत्री करणे जमलेच नाही ते तर सोडा, पण दुश्मनी करण्यासाठी गेलो तर साधी दुश्मनी (अदावत) पण नाही झाली.... क्लास !

रस्में दुनिया की निभाने के लिए हमसे रिश्तों की तिज़ारत ना हुई

मरजावां ! काय लिहू मी ओळीसाठी Smile जगाची रित जरा वेगळी असते, येथे टिकण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे , पण त्याच गोष्टी मला करता नाही आल्या, नात्यांचा धंदा / व्यापार करता नाही आला मला.

आता थोडा आराम... पुन्हा कधी तरी असेच लिहीन काही माझ्या मनातील आवडत्या कवितेच्या संदर्भात !

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

चांगला विषय, मांडणी.. अशीच विविध भाषांतील रचनांचा या निमित्ताने आस्वाद घेता येईल असे दिसते!
यातील एखादी रचना जर कोणी गायली असेल तर त्याचाही दुवा देत जा! अधिक मजा येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुढील लेखनात दुवे देण्याचा प्रयत्न नक्की करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

लेख आवडला.

चांगला विषय, मांडणी.. अशीच विविध भाषांतील रचनांचा या निमित्ताने आस्वाद घेता येईल असे दिसते!

सहमत.

हरी बीन कूण गती मेरी: लता, हृदयनाथ मंगेशकर
http://www.youtube.com/watch?v=fVMT2AgTyPM
हे ऐकताना 'सुबह'('उंबरठा'चा हिंदी अवतार) मधील 'तुम आशा विश्वास हमारे' ची आठवण होते Smile

कुछ तबीयत ही:चंदन दास
http://www.aisiakshare.com/node/598
'जिसको चाहा उसे अपना ना सके जो मिला उससे मुहब्बत ना हुई' ही कश्मकश आपल्यापैकी प्रत्येकाने वेगवेगळ्या संदर्भात अनुभवली असेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम आशा विश्वास हमारे !
वाह! काय आठवण काढलीत.. ऋणी आहे तुमचा.. गुणगुणत असतो हे पण शब्द विसरलो होतो.. तुमच्यामुळे आठवले परत Smile
धन्यु!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

लिपी माहित आहे, भाषा समजते तरीही हिंदी वाचन होत नाही. राजे, हिंदीतल्या नवीन कवींच्या रचना तुझ्या वाचनात असतील तर अशाच शेअर करत जा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान लेखमालेच्या आशेत आहे.
निवडलेल्या तीनही कविता आवडल्या.
एक सुचवणी - एका लेखांकातील कविता कुठल्याशा दुव्याने जोडलेल्या असतील, तर लेखांक वाचताना अधिक मजा येईल. या लेखाकांतील कवितांमध्येसुद्धा दुवे असतील म्हणा. पण एका कवितेकडून दुसर्‍या कवितेकडे जाताना एका परिच्छेदाने तो दुवा स्पष्ट करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सूचनेचा नक्की विचार भाग तीन नंतर करतो, कारण भाग तीन पर्यंत लेखन आधीच लिहलेले आहे व लिहलेले लेखन बदलणे मला जरा योग्य वाटत नाही पण भाग चार मध्ये मात्र नक्की तुम्ही सूचवलेले बदल दिसतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

हरि बिन कूण गती मेरी।
फार फार आवडली. छान लेखन राजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छान..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0