जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग २

अखेर गप्पा मारता ते जँक व रॉन त्या बाईकवाल्या हल्लेखोराला पकडण्यासाठी आरग्वान गँरेजवर पोहोचले.

" तो नक्की येईल ना आज "
रॉनने लगबगीने गँरेजच्या मालकाला विचारलं.

" हो त्याची बाईक तर तो घेऊन जाण्यासाठी तयार आहे. तो आजच येईल असं त्याने म्हटलं होत "

" बघूया हा दिलेल्या शब्दाचा किती मान राखतो ते " जँक

" तो येईपर्यत आपल्याला ईथेच लपून राहावं लागेल "
जँक व रॉन गँरजमधील एका गाडीच्या आडोशाला लपून त्याची वाट पाहत होते.

" तो आला की तूम्ही आम्हाला लगेच ईशारा करा " जँक

" हो "
गँरेजच्या मालकाने मान डोलवली.

" खरंतर खूपच ऊशीर झालाय त्याने सहा ची वेळ ठरवली होती आणी आता सात वाजत आलेत " रॉन

" हा अजून कसा येत नाही, त्याला आपण ईथे असल्याचा संशय तर आला नसेल ना " जँक

" शक्यता आहे जर तो भररस्त्यात बाईकने एखाद्याला ऊडवू शकतो कँमेर्याच्या नजरेतून सूखरूप निसटू शकतो तर त्याच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही " रॉन

" बघूया अजून थोडा वेळ त्याची वाट पाहू तसंतरी आता ईथून आपल्याला सरळ घरीच तर जायचं आहे "
जँकने तोडांवर हात ठेवत आळस दिला.बाहेर रीमझीम पाऊसही सूरू झाला होता त्यामूळे त्या दोघांना थोडावेळ तिथेच थांबावं लागणार होतं.

" मला वाटत नाही हा आज येईल "

" येईल नाही तो आता खरंच आलाय समोर बघ "
जँकने रॉकीच्या सांगण्यानूसार समोर पाहीलं माञ त्या बाईकवाल्या ईसमाने त्या दिवसासारखाच काळ्या कँपवाला रेनकोट घातल्यामूळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.

" या खेपेला माञ मी याला सोडनार नाही "

" रॉन थांब घाई करू नकोस, त्याला अगोदर आतमध्ये येऊ दे "
काही वेळ गँरेजबाहोर टाईमपास केल्यानंतर बाईकवाला गँरेजमध्ये आला व त्याने खीशातून पैसे काढले. आणी चोरट्या नजरेनं आजूबाजूला पाहीलं. रॉननेही मूद्दामूनच त्याला पकडण्याच्या हेतूने त्याची बाईक गँरेजच्या एका कोपऱ्यात लावली होती "

" माझी बाईक घेऊन जाण्यासाठी तयार आहे का ?"
शक्य तेवढा आवाज स्थीर ठेवत बाईकवाल्या ईसमाने गँरेजवाल्याला विचारले.

" हो ती बघा तीथे "

गँरेजच्या मालकाने ईशारा करताच जँक व रॉन दोघंही त्याला पकडण्यासाठी तयार झाले.

" हे घे "
मँक्यानीकच्या हातात पैसे देत तो ईसम बाईकजवळ पोहोचला आणी मग अचानकच शांतपणे तो पून्हा मागे देखील फिरला.

" आता ह्याला काय झालं हा पून्हा मागे का फिरला ? "
जँकने डोक्याला हात लावत रॉनला विचारले. तेवढ्यात रॉन मोठ्याने ओरडला.

" चल जँक तो पळायच्या तयारीत आहे, तो ईथून निसटायच्या अगोदरच आपण त्याला पकडायला हवं कदाचीत आपण ईथे असल्याचा त्याला संशय आला असावा म्हणूनच तो मागे फिरला "
ते दोघंही ताबडतोब त्याच्या मागे धावले.

" ए थांब आम्ही तूला काहीही करणारा नाही "
जँक मोठ्याने ओरडला.
त्या मूसळधार पावसात ते दोघंही त्याचा पाठलाग करत गँरेजबाहेर पडले पंरतू थोड्या अंतरावरून तो अचानकच दिसता-दिसता एका झाडामागून नाहीसा झाला.

" शीट यार तो पून्हा आपल्या तावडीतून निसटला "
रॉन रागाने ओरडला.

" नाही आपण सहजासहजी त्याला सोडायचं नाही तू या बाजूने जा मी मी तिकडून जातो "
पून्हा दोघंही जण त्याला शोधण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही दिशाना धावले.

" जँक तो फार दूर गेला नसेल कदाचीत तो त्या झाडाच्या आडोशाला देखील लपला असेल तू तीथेही जाऊन बघ "
बहूतेक पावसाच्या पडण्याच्या मोठ्या आवाजात रॉनचा आवाज जँकपर्यत पोहोचला नसावा.
त्या दोघांनीही बराच वेळ आजूबाजूचा संपूर्ण परीसर धूंडून काढला पण त्याला शोधण्यात ते अपयशी ठरले. काही केल्या तो बाईकवाला ईसम भेटायला तयार नव्हता. पून्हा एकदा त्याच्यां नजरेदेखत, फसवून तो निसटण्यात यशश्वी झाला होता.

" आता तो आपल्याला पून्हा सापडणे खूपच कठीण आहे जँक "

" नाही, आता तो फार दिवस आपल्यापासून लपून राहू शकत नाही "

" म्हणजे कसं काय ?
तो तर आत्ताच आपल्यासमोरून पळाला "

" अरे वेड्या तो त्याची बिघडलेली बाईक दुरूस्त करण्यासाठी जेव्हा गँरेजमध्ये आला असणार तेव्हा म्यँक्यानीकने त्याला नक्कीच पाहीलं असेल "

" मग "

" मग काय, जर मँक्यानीकने त्या ईसमाला पाहीलं असेल तर त्याच्या मदतीने आपण त्या ईसमाचा स्केच देखील बनवू शकतो शिवाय त्याची बाईक सूद्धा अजूनही गँरेजमध्येच आहे ना "

" पण त्याचा काय फायदा ?
त्या बाईकची नंबर प्लेट तर त्याने ऑलरेडी गायब केली होती त्यामूळे त्या बाईकच्या मालकाची ओळख पटवण देखील आपल्याला आता अशक्य आहे "

" आता तो मँक्यानीकच फक्त आपली मदत करू शकतो "

" हो चल पटकन आपण त्याला आत्ताच विचारू "
जँक व रॉन घाईघाईत पून्हा गँरेजमध्ये परतले.

" तो बघ "
मँक्यानीककडे बोट दाखवत रॉनने ईशारा केला मग ते दोघंही त्याच्याजवळ पोहोचले. तो आपल्या कामात व्यस्त होता. तरीही जँकने फार आवेडावे न घेता त्याला स्पष्टच विचारलं.

" तो बाईकवाला जेव्हा गँरेजमध्ये त्याची बिघडलेली बाईक देण्यासाठी आला होता तेव्हां तूम्ही त्याला पाहीलं असेलच ना ?"
तो मँक्यानीक प्रथम जँकच्या प्रश्नाने गांगरलाच पण मग सद्य परीस्थीतीची जाणीव होताच स्वतःला सावरत त्याने शांतपणे जँकच्या प्रश्नाचं ऊत्तर दिलं.

" नाही साहेब, तो आला तेव्हां तो खूप घाई-गडबडीत होता. त्याची बिघडलेली बाईक त्याने माझ्याकडे सोपवली व तो ईथून ताबडतोब निघाला. मी तर त्याची बिना नबंर प्लेटची बाईक घेण्यास तयारच नव्हतो पण त्याची विनवनी पाहून मी बाईक ठेवून घेतली.
जाताना त्याने मला सांगीतले की तो सात दिवसानंतरच त्याची रिपेअर झालेला बाईक घेण्यासाठी परत येईल. त्या ईसमाने आज सारखाच काळया रंगाचा कँपवाला रेनकोट घातला होता अंधारात मी त्याचा चेहरा देखील निट पाहू शकलो नाही......मग मला त्याचां संशय आल्यामूळे मी तूम्हांला ताबडतोब फोन करून कळवलं "

" हा बाईकवाला जो कोणी आहे तो खूपच सावध आहे जँक, म्हणूनच तर मी गँरेजच्या एका कोपऱ्यात ऊभ्या केलेल्या बाईकमूळे त्याला आपला संशय आला असावा "

" असो जे झालं ते झालं आता फार विचार करण्यात काही अर्थ नाही चल आपण लवकर घरी जाऊ ऑलरेडी या बाईकवाल्या नादात आपल्याला खूपच ऊशीर झालाय " जँक
त्या बाईकवाल्या ईसमाला पकडण्याची एवढी तयारी करूनही त्यांच्या हाती निराशाच लागली होती मग दोघांनीही त्या मूसळधार ओल्या पावसातून भिजत घरची वाट धरली.

" तूला काय वाटंत रॉन तो बाईकवाला माझ्या जिवावर का बेतला असेल "

" त्याची नक्कीच तूझ्याशी कसलीतरी जूनी-पूरानी दूश्मनी असणार नाहीतर ऊगाचच तो तूला मारण्याची रीस्क घेणार नाही "

" पण तो कोण आहे आणी अंस का करतोय हेच मला अजून समजलेलं नाही मी अशी कोणती चूक केली आहे की तो मला मारण्यासाठी......."

" थांबं जँक तू काय म्हणालास ?"
जँकच वाक्य अर्धवट तोडतच रॉनने त्याला थांबवलं कदाचीत त्याला कसलातरी शोध लागला असावा कीवां काहीतरी आठवलं असावं.

" आता काय ?"
" तो तूला मारण्यासाठी..........नाही पण त्याने तर तूझ्यावर फक्त हल्लाच केलाय त्याला जर तूझा जीव घ्यायचं असता तर तो तेही करू शकला असता त्याच्याकडे पूष्कळ वेळ होता "

" म्हणजे तूला नक्की काय म्हणायचं आहे रॉन "
जँकला रॉन काय सांगत होता हेच कळत निट नव्हतं.

" म्हणजे तो बाईकवाला तूझ्यावर फक्त हल्ला करणासाठी आला होता त्याच्यापासून तूझ्या जिवाला काही धोका असेल असं मलातरी वाटत नाही..............पण तरीही तू त्याच्यापासून सावध राहा. तो हे सर्व कशासाठी करतोय याचा शोध माञ आपल्याला घ्यायलाच हवा "

" माझं जाऊदे रे त्या बाईकवाल्याला तर आपण शोधूच यार पण हा रॉकी कूठे गेलाय कूणास ठाऊक. आपण त्याला आता लवकरात लवकर शोधलं पाहीजे कदाचीत त्याच्या जिवाला देखील धोका असू शकतो. " जँक उगाचच काहीतरी बोलावं म्हणून बोलत होता.

" अरे पण वेड्या, रॉकी खंरच कूठे स्वतःहून गेलाय की कोणी त्याला किडनँप केलंय हे देखील आपल्याला अजून व्यवस्थीत समजू शकलेलं नाही. आणी तू म्हणतोस त्याच्या जिवाला धोका असेल.
आपल्याला सर्व तर्काचा आता व्यवस्थीत विचार करावा लागेल. आता स्वस्थ बसून चालायचं नाही रॉकीला आपण लवकरात लवकर शोधलं पाहीजे. "
जेव्हा रॉन काम करून खूप थकत असे तेव्हा तो असचं काहीतरी बरडत असे रॉनची ही नेहमीचीच सवय जँकच्या चांगलीच लक्षात होती पण यावेळी माञ रॉन आणखीन पूढे काही बोलायच्या अगोदरच जँक गाढ झोपी गेला होता. मग रॉननेही वीस्कीचे दोन पेग घेऊन त्याच्या बिछान्यावर धाव घेतली.

क्रमशः
पूढील भाग लवकरच..................

प्रतिक्रिया

पालींची बदनामी थांबवा!!!!!!