जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ७

पहावं ते नवल, हेच म्हणायचं आता बाकी राहीलं होतं. ईतक्या राञीही त्या गूहेत माणसांच्या अस्तीत्वाला वाव होता.
तीथे वेबचे साथीदारच होते. कारण वेबचंही त्या गूहेत येणं जाणं असायचं. त्या अनोळखी माणसांपासून धोका असल्यामूळे ते तीघंही एका मोठ्या दगडाच्या आडोशाला लपून त्यांच्याकडे पाहत होते.

" म्हणजे वेब या गूहेमध्ये याच्यांसोबतच असतो तर "
ज्युलीने आपला तर्क माडंला.

" पण यावेळी ही माणसं ईतक्या राञी ईथे करतायेत तरी काय ?" रॉन

" काय माहीत,
ते कसले बॉक्स आहेत रे तीथे ?"
त्या गूहेच्या समोर एका कोपऱ्यात ठेवलेल्या लाकडी पेट्यांकडे बोट दाखवून जँक विचारत होता.
अगदी पद्धतशीरपणे एका वर एक ते लाकडाचे खोके रचून ठेवले होते.

" अरे पण त्या बॉक्सेसमध्ये नक्की आहे तरी काय ?
की ईतक्या राञीदेखील त्या माणसांना त्यांची राखण करावी लागते म्हणजे " रॉन

" असेल काहीतरी महव्ताचंच आपल्याला काय करायचं आहे " ज्युली

" ते काहीही असो आता आपल्याला लवकरात लवकर वेब ईथे यायच्या अगोदरच या गूहेतून निसटायला हवं " जँक

" हो चला पटकन नाहीतर आपण पून्हा त्यांच्या तावडीत सापडू " ज्युली

" पण जँक आपण चूकून जरी यांच्या नजरेत आलो ना. तरी ते आपल्याला लगेचच पकडतील.
मला तरी असं वाटतं की आपल्याला त्या लाकडी पेट्यांमागूनच लपत-लपत पूढे जावं लागेल. "
समोरच एकावर-एक रचलेला पेट्यांच्या ढीगाऱ्याकडे ईशारा करत रॉन बोलत होता.

" हो तू अगदी बरोबर बोलतोयेस रॉन. आपल्याकडे आता दूसरा पर्यायच नाही.
अगदी सावकाशपणे त्या माणंसाची नजर चूकवत आपल्याला पेटारऱ्यांमाागून पूढे निसटावं लागेल. "

" ठीक आहे मग तूम्ही दोघं या माझ्या मागे. आपल्याकडे आता वेळ फारच कमी आहे. "
ठरल्यानूसार पूढे रॉन आणी ज्युली व त्या दोघांमागून जँक लगेचच एका मागोमाग धावत गेले. पण धावण्याच्या गडबडीत नकळतच ज्युलीचा हात लागून वरचा एक लाकडी बॉक्स पटकन खाली कोसळला. त्यामूळे त्या गूड शातंतेचा भंग करत अचानकच मोठा आवाज झाला. आणी त्या पडलेल्या बॉक्समधून कसल्यातरी सफेद काळ्या रंगाच्या चार-पाच पूड्या बाहेर आल्या.

" ए कोण तडमडायला गेला रे तीथे मूर्ख मला निट झोपून पण देत नाहीत "
त्या खाली पडलेल्या बॉक्सच्या दिशेने पाऊलं टाकत त्यांच्यातलाच एक माणूस मोठ्याने ओरडत होता.
त्याचं ओरडणं एेकून ज्युली घाबरतच पूढे धावत सूटली. तीला पाहून तिच्यामागे रॉन व जँक दोघंही धावले.
आणी मग धावता-धावता ते तीघंही नकळत त्या जागेवरून सूखरूप निलटलेही.

" कोणी लावले रे हे बॉक्स, मूर्खाना निट ठेवतापण येत नाही "

" शू...वाचलो एकदाचे नाही तर आपलं आता काही खरं नव्हतं "
सूटकेचा सूस्कार सोडत ज्युली घाईघाईने बोलत होती.

" तू बघीतलंस ना जँक त्या बॉक्समध्ये काय होतं ते ?" रॉन

" हो, मला वाटलं देखील नव्हतं. की ही माणसं ईथे असं काही करत असतील " जँक

" काय होतं त्यात ?" ज्युली

" अगं वेडे त्या चरस, गांज्याच्या पूड्या होत्या. हिरोईन, हिरोईन " रॉन

" शी काहीही हां " ज्युली

" हो गं. तो स्मगलीगंचाच माल होता. " जँक

" म्हणजे कोणाच्याच नकळत, ईथे असले धंदे चालतात तर.
आपल्याला आता याच्यांविरूद्ध लवकरात लवकर काहीतरी अँक्शन घेतलीच पाहीजे " ज्युली

" हो पण त्यासाठी आपल्याला आधी ईथून सूखरूप निसटायला तर हवं. " रॉन

" मग चला आता पटकन " ज्युली

पूढे त्या भूयाराच तोडं डावीकडे वळलं होतं त्यामूळे ती पोरं घाईघाईत पायाखालची दगड-माती तूडवत डावीकडे वळली.
तीथे देखील एका लहानशा कोपऱ्यात मशालीचा अंधूक प्रकाश लकाकत होता. व त्या खाली दगडावर कोणीतरी आडवा होऊन झोपला होता. त्याचे दोन्ही हात रस्सीने त्या दगडाला बांधण्यात आले होते. एखाद्या कैद्याप्रमाने त्याच्या तोडांत एक कापडाचा बोळा कोबंण्यात आला होता. त्याला पाहून ते तीघंही सावधपणे त्याच्या जवळ गेले. अंधूक प्रकाशात त्याचा चेहरा निट दिसत नव्हता. म्हणून मग रॉनने त्याच्या चेहऱ्यावर मोबालच्या फ्लँश लाईटचा फोकस केला. आणी त्याला पाहताच त्याच्या तोंडावर समाधानाचे हास्य पसरले.

तो दूसरा-तीसरा कोणी नसून चक्क त्यांच्या शेजारचा रॉकी होता. तो अशा ठिकाणी कैद असेल याची कोणाला साधी कप्लना देखील कधी करता आली नसती.
या अधांऱ्या गूहेत आपल्याला कोणीतरी शोधत येईल याची तर रॉकीने आशाच सोडून दीली होती. पण आपल्या तीघा जीवलग मिञाना पाहताच तो सूखावला. त्याचे डोळे झीरमत आले होते. जागेवरून ऊठण्याची ताकद देखील आता त्याच्या बाहूत नव्हती. त्या तीघांकडे पाहून रॉकीने त्याच्या तोडांतील कापडाचा बोळा काढण्याचा ईशारा केला. मग रॉनने लगेचच त्याचे रस्सीने दगडाला बांधलेले दोन्ही हात सोडवले. व त्याच्या तोडांतील कापडाचा बोळा काढला. अखेर त्याने अनेक दिवसांपासून मनात कोडूनं ठेवलेला सूटकेचा श्वास सोडण्यात त्याला यश आलं होतं.
मग रॉकीला सावकाशपणे दगडावर बसवत ज्यूलीने त्याला बाजूच्या वॉटर थर्मासमधील पाणी ग्लासात भरून दिलं.
रॉकी खूप थकला होता. पाणी पीऊन झाल्यावर त्याला धीर देत जँकने हळूहळू त्याची विचारपूस करण्यास सूरूवात केली.

" आम्ही तूला शोधण्याचे खूप प्रयत्न केले रे. पण तू काय आम्हाला सापडला नाहीस, तूझी आई तर तूझ्या आठवणीने सारखी रडत असायची. "

" तूम्ही तीघं ईथे आलात म्हणून बंर झालं. नाहीतर मी कधीच या गूहेतून बाहेर पडू शकलो नसतो.
पण तूम्हाला कसं काय कळलं, की मी या गूहेत आहे ते ?" रॉकी

" ते फार महत्वाचं नाही रे. आम्ही निव्वल योगायोगानेच या ठीकाणी पोहोचलो.
पण तू ईथे कसा काय ?
म्हणजे तूला या गूहेत कोण घेऊन आला. "

" तूम्हाला काय सांगू. खूप वाईट होते रे ते. मला त्यांच नाव माहीत नाही. पण मी त्यांना पाहीलं तर नक्कीच ओळखेन "
रॉकी अजूनही घाबरलेल्या स्वरात बोलत होता.
मग पून्हा एक मोठा पॉस घेऊन तो पूढे बोलू लागला.

" तूला आठवंतय जँक, मागील महीण्यात आपल्या सोसायटीत बाहेरच्या देशातील काही माणसं आली होती. "
जँकने होरारार्थी मान हलवली.

" पण त्या सर्वाचां या घटनेची काय संबध ?
ती माणसं तर त्यांच्या बिजनेस संदर्भात चर्चा करण्यासाठी ईथे आली हो...... "

" .........नाही "
जँकचं वाक्य अर्धवट तोडतच रॉकी म्हणाला.

" ती माणसं ईथे बिजनेस वैगरे
करण्यासाठी नाही. तर एका गूप्त खजाण्याच्या शोधात ईथे आली होती., त्या खजाण्याचा तूझ्याशी देखील नक्कीच काहीतरी संबध आहे. "

" काय ?
वेडा झालायेस की काय तू ?"
जँकने अाच्छर्याच्या स्वरात पून्हा प्रश्न केला.

" हो "

" मी जेव्हा शनीवारी कॉलेजवरून घरी येत होतो. तेव्हा त्याचं बोलणं माझ्या कानी पडलं. ती काळ्या रंगाचे एकसारखेच कपडे घातलेली माणसं त्यांच्या कार्यालयात तूझ्यावीषयीच बोलत होती. त्यांच्यापैकी एकाच्या हातात तूझा फोटो देखील होता. ते तूला किडनँप करण्याचा प्लान करत होते. कारण एका गूप्त खजाण्याचा शोधासाठी त्यांना तूझ्या मदतीची गरज भासणार होती. त्यामूळे ती माणसं मागील काही दिवसांपासून तूझ्यावर नजर ठेवून होती.
मी त्यांची ही सर्व चर्चा त्या कार्यालयाच्या खिडकीपाशी त्यांच्या नकळत ऊभा राहून एेकत होतो. बिजनेसचा तर फक्त बहाणा होता. ते तूला शोधण्यासाठीच ईथे आले होते.
त्यांचा वाईट हेतू माझ्या लक्षात येताच मी तूला सांगायला येणार होतो. पण जेव्हां मी तीथून निघण्यासाठी मागे वळलो. तेव्हां त्यांच्यापैकी एकजण माझ्या मागेच ऊभा होता. त्याने मला पकडलं. आणी मला त्यांच्या कार्यालयात घेऊन गेला.

मी त्याचं बोलणं चोरून एेकलं होतं. त्यांना काही सांगण्याच्या अगोदरच त्यांनी जबरदस्तीने माझ्या तोडांत कापडाचा बोळा कोंबला. आणी तिथल्या एका खूर्चीला मला बांधून ठेवलं. त्या दिवशी राञभर मी त्या कार्यालयातच कैद होतो.
स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयन्त केला. पण मी काहीच करू शकलो नाही. दूसऱ्या दिवशी सकाळी भल्या पहाटे ती माणसं पून्हा कार्यालयात आली. आणी त्यांनी माझ्या डोळ्यांवर एक काळी पट्टी बांधली. मग थोड्या वेळाने अचानकच सर्वजण शांत झाले. तेवढ्यात बूटांच्या टाचांचा आवाज करत एक ईसम आत आला. मग माझ्या जवळ येऊन तो क्षणभर ऊभा राहीला. आणी मग पून्हा मागे वळून त्याने ईशाऱ्यानेच त्याच्या माणसांना काहीतरी सांगीतलं असावं.

मग माझे खूर्चीला बांधलेले दोन्ही हात सोडवण्यात आले. आणी ती माणसं मला बाहेर घेऊन आली. त्यांनी मला एका कारमध्ये बसवलं. माझ्या डोळ्यांवर काळी पट्टी असल्यामुळे मला कोणत्याच गोष्टीचा नीट अंदाज लावता येत नव्हता.

थोड्या वेळाने कार अचानकच थांबली. मग त्यांनी मला कारमधून बाहेर काढलं. आणी थेट ईथे या गूहेत घेऊन आले. मग माझ्या डोळ्यांवर बांधलेली काळी पट्टी त्यांनी काढली. आणी माझे हात या मोठ्या दगडाला बांधून ठेवले. तेव्हांपासून मी ईथेच पंधरा-वीस दिवस या अधांऱ्या गूहेत अडकून पडलो होतो, पण आता तूम्ही आलात म्हणून बरं झालं. "
एवढं बोलून रॉकी थांबला.

त्याने सांगीतलेल्या या घटनेची कल्पनाच करणं त्या तीघांसाठी निव्वल अशक्य होतं. कारण एखाद्या गूप्त खजाण्याशी जाँकचा असा काही संबध असेल याचा विचार देखील त्यांनी कधी केला नसावा.

" पण हे कसं शक्य आहे रॉकी. मला तर अशा कोणत्याच गूप्त खजाण्याविषयी कसलीच माहीती नाही. " जँक

" तू नीट आठव अगोदर, कारण ऊगााचच त्यांनी तूला कीडनँप करण्याचा प्लान केला असेल असं मला तरी वाटत नाही. " रॉकी

" जर असं असेल तर मग ते तूला या गूहेतच का घेऊन आले. ते तूला दूसऱ्या ठीकाणी देखील ठेऊ शकले असतेच ना. " जँक

" ते काय मला माहीत नाही बूवा " जँक

" ........पण मला माञ आता माहीत पडलंय. तो वेब देखील यांच्यापैकीच एक असावा. मला किडनँप करण्यासाठीच तो अजूनही आपला पाठलाग करतोय " जँकला हळूहळू एका-एका गोष्टीचा ऊलगडा होत होता.

" म्हणजे जँक तो बाईकवाला ईसमही तूला पकडण्यासाठीच तूझ्यावर नजर ठेऊन होता तर " रॉन

" कदाचीत "

क्रमशः
पूढील भाग लवकरच............

प्रतिक्रिया

पालींची बदनामी थांबवा!!!!!!