अंबरात फिरुनिया उगवतो

अंबरात फिरुनिया उगवतो, हासरा राजस तारा
परिमळता देहातून गंधित, मोगरमोहर सारा................. || धृ ||

बालपणीचा काळ हरवला, गाव कुसाला सांगा
हिरवाईचा ऋतू परतता, फुलल्या रेशीम बागा
पूर्व दिशेला, भिजवुनि आल्या, कोवळ्या पाऊसधारा .........|| १ ||

स्वप्नांच्या गावात बोलले, बोल मनीचे कोणी
निळ्या बोलक्या.. डोळ्यांमधली, लाजलाजरी गाणी
छेडुनि गे_ला, केस मोकळे, कुठुनी रानचा वारा ..............|| २ ||

काचेच्या पानात अडकली, किरणे रंगीत बाई
तेजाच्या स्पर्शाने फुलली , आंधळी यौवनघाई
विश्वाच्या गर्भाशी घुमला, चैतन्याचा नारा ...................|| ३ ||

अंगण माझे फुलले हसले, तृप्तीने गं न्हाले
हिरवाईचा त्यागुन शालू, मन निळोसे झाले
चाफ्याच्या गंधाने महकला, देहाचा देव्हारा ...................|| ४ ||

- संध्या

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

कविता आवडली. वाचून 'श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिम धारा' ची ताबडतोब आठवण झाली. शब्दयोजना, वृत्त आणि तृप्तीत हरवलेपणाच्या भावनाही मिळत्याजुळत्या आहेत. तुमच्या कवितेत मात्र देहाची, मनाची आंतर्गत स्थिती वर्णन केलेली आहे. बाल्य संपल्यानंतर यौवन साजरं करण्याचं व येणाऱ्या तृप्तीचं वर्णन आहे. श्रावणात.. मध्ये निसर्गाच्या मनस्वी क्षणात हरवून जाणं आहे.

थोडा छिद्रान्वेष - काही ठिकाणी वृत्ताचं बंधन पाळलेलं नाही, त्यामुळे गुणगुणताना अडचण होते. ते दुरुस्त करावं ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवर स्वागत!
कविता आवडली.. काहि ठिकाणी राजेश म्हणतोय तसा चालीत म्हणताना गोंधळ होतोय. सुधारता येईल का? किंवा अपेक्षित चाल असल्यास तीही सांगा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनःपूर्वक आभार. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देहाचा देव्हारा

खरय. आवडली कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0