सचिनचं शंभरावं शतक!

सचिन तेंडुलकर. शंभरावं शतक!

लांबलचक प्रवासातला एक लांबचा मैलाचा दगड. हा प्रवास कधी पूर्ण होतोय याची श्वास रोखून अनेक जण वाट बघत होते. हा मैलाचा दगड ओलांडला म्हणून केवळ सचिन तेंडुलकर श्रेष्ठ ठरत नाही. तो महान आहे, म्हणून त्याने तो ओलांडला. तो निश्चितच ही रेषा पार करेल हा विश्वास घेऊन लोक आनंद साजरा करण्यासाठी उभे होते. एखाद्या मॅरेथॉन धावणाऱ्याची वाट फिनिश लाइनवर हारतुरे घेऊन उभं राहाणाऱ्यांनी पहावी तशी. ती रेषा पार करण्याबद्दल कौतुक आहेच, पण तिथे पोचणं हे पुन्हा एकदा सचिनचं आत्तापर्यंतचं यश साजरं करण्याचं निमित्त आहे. या शतकाआधीच्या ९९ शतकांनाही तितकंच महत्त्व आहे.

या निमित्ताने सचिनच्या कर्तबगारीला मानाचा मुजरा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

तीच मॅच ते ही बांग्लादेशाकडनं हरण्याचा पराक्रमही आपल्या टीमनं आजच केला... काय बोलावं आता!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे सचिनच करू शकतो.
त्ये बेनं ठोकतंय. त्याच्याशिवाय हैच कोन?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कापूसकोन्ड्या

जो सामना जिंकू शकत नाही त्या शतकाला काहीही अर्थ नाही.
आता पुढे लोक काय म्हणतील ? सचिन सामना जिंकून देऊ शकत नाही.
बाकी खेळाडू जणू झोपेत खेळत होते !
- शेखर काळे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या आईने मुलाच्या आजारपणात रात्रंदिवस जागून बिचाऱ्याचं सगळं केलं, तरी ते मूल गेलं तर तुम्ही त्या आईच्या मायेला काही अर्थ नाही असं म्हणाल का?
शतकाचं अभिनंदन करा, बांग्लादेशी टीम अधिक चांगली खेळली म्हणा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बांग्लादेशी टीम अधिक चांगली खेळली म्हणा...
स्वत:ची समजूत घालून घ्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

उद्या भारत जिंकला तर बांग्लादेशची टीम वाईट खेळली म्हणा आणि शेजार्‍यांचा आदर करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धाग्याला अनुमोदन.
रितसर म्याच हरल्यामुळे सचिन कसा स्वतःच्यअ विक्रमांसाठी खेळतो अशी बोंब ठोकायचीही सोय झालेली आहे.
सगळेच खूश.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सचिनच मनापासून अभिनंदन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

राजेशरावांचा 'सचिन' लेख वाचल्यावर आता असे वाटू लागले आहे की त्याच्याविषयी लिहिणारे थकले तर थकू देत, थकतीलही पण हा कधीही थकणार नाही.

आजच्या संघातील त्याच्या जोडीने खेळणारे दोन खेळाडू १. विराट कोहली आणि २. सुरेश रैना ही सचिन तेंडुलकर ज्या वर्षी पहिली कसोटी खेळला त्यावेळी अनुक्रमे १ व २ वर्षाची आपापल्या आईच्या मांडीवर तोंडात बोट घालुन पहुडणारी बाळे होती. आणि कालच्या मिरपूरच्या मैदानावर या दोघांपेक्षाही चपळाई सचिनची दिसत होती.....हा एक म्हटले तर चमत्कारच होय आमच्या सच्याचा.

[काहीसे अवांतर : तुम्ही लिहिले आहे "सचिनने हा मैलाचा दगड ओलांडला"..... पण मला वाटते हा मैलाचा दगड त्या रस्त्यावर यापूर्वी कधी नव्हताच, तो सचिनने आता निर्माण केला आहे. त्यामुळे पुढे भविष्यात दुसर्‍या कुणीतरी हा विक्रम पार केला तर मात्र म्हणता येईल की, "अबक याने सचिनच्या विक्रमाचा मैलाचा दगड ओलांडला...."]

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतराशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(हा प्रतिसाद अशोक यांच्या प्रतिसादावर आहे. वरती का येतोय कळत नाही).
मैलाचा दगड पूर्वी ३५ होता. त्याची चर्चा कोणी करत नसे - पण वन डे व टेस्ट मिळून कोणाचीही एकूण शतके ३५ च्या वर नव्हती. गावसकर (३४+१), रिचर्ड्स (२४+११) आणि वन डे मधे तेव्हा सर्वात जास्त शतके केलेला हेन्स (१८+१७) असे मिळून जास्तीत जास्त ३५ शतके होती (नंतर स्टीव वॉ वगैरे आले. आताही आंतरराष्ट्रीय शतकांत ३५ वर थांबलेले बरेच आहेत). तेव्हा इंग्लंड मधले दिग्गज त्यांची कसोटील १५-२० व उरलेला काउंटी क्रिकेटमधली अशी धरून १०० "फर्स्ट क्लास" शतके करत, त्यांचे प्रचंड कौतुक चाले इंग्लिश मीडियात. त्या लोकांच्या स्वप्नातही आले नसेल की कोणी आंतरराष्ट्रीय सामन्यांत १०० शतके करेल, तीही इतक्या विविध देशात, इतक्या विविध मैदानात आणि २२ वर्षांत बदललेल्या इतक्या वेगवेगळ्या पिढीतील गोलंदाजांविरूद्ध!

मला नक्की आठवत नाही पण तो ३५ चा माईलस्टोन सचिनच पहिल्यांदा पार करून गेला. (स्टॅट्स बघून नक्की सांगू शकतो).

सुरूवातीच्या काळात सचिनकडून मार खाल्लेले रॅफेल, धर्मसेना वगैरे पंच झाले, काही मॅकडरमॉट, मियाँदादसारखे कोच झाले (कर्स्टनही त्यात, पण तो आपलाच कोच. जॉन राईटही - हे सगळे सचिनविरूद्ध खेळलेले लोक!) - त्यांनी नवीन रक्ताच्या बोलर्सना सचिनला काय बोलिंग करायला हवी ते शिकवले, व्हिडीओ अ‍ॅनेलिसीस आले. आणि तरीही सचिन धावा कुटतोच आहे. सिडने आणि मेलबोर्न कसोटींमधली त्याची बॅटिंग पाहिली की वाटते अजून बरेच क्रिकेट बाकी आहे.

आता आमची अपेक्षा फक्त त्याने धुव्वाधार खेळावे. तो स्वतः बॅटिंगचे मजा जेव्हा घेइल तेव्हा बघणार्‍यांनाही ती आपोआप मिळेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सचिनने स्वतः एकट्याने प्रवास करून हा रस्ता तयार केला आणि मैलाच्या दगडाची स्थापना केली या म्हणण्याशी १००% सहमत.

तो स्वतः बॅटिंगचे मजा जेव्हा घेइल तेव्हा बघणार्‍यांनाही ती आपोआप मिळेल!

एकदम चोक्कस! गेले कितीतरी महिने त्याला लोक 'काय मग शंभरावी सेंचुरी कधी करणार?' याच्याशिवाय दुसरं काही विचारत नव्हते. सर्व जनता आपल्या मागे अशा प्रकारे लागली की मग ते जबाबदारीचं ओझं होतं. आधीच धावा करण्याचं ओझं काय कमी आहे का त्याच्या डोक्यावर? आनंद म्हणून बॅटिंग करणं आणि त्यातून असे मैलाचे दगड ओलांडले जाणं ही एक गोष्ट आणि केवळ हा दगड कधी ओलांडला जाणार याची वाट बघणाऱ्यांची अपेक्षापूर्ती करणाऱ्यांसाठी बॅटिंग करणं वेगळं. आता हे ओझं गळून गेलं आहे, तेव्हा तो पुन्हा आनंद घेऊ शकेल ही आशा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोनदा आल्याने काढला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गिव्ह अँड टेक च्या आजच्या काळात वरच्या भावनिक प्रतिक्रिया बघून ड्वाले पानावले.

गिव्ह १०० टेक मॅच. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

सचिन बद्दल काय बोलणार.. सचिन म्हटलं की लेखणीच खुंटते!
त्याला (पुन्हा एकवार) कुर्निसात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम रे सचिन.छान खेळी कलीस हो. बाकीच खेळाडू नेहमीप्रमाणे हागले ह्यात विशेष वाटले नाही.
अवांतर- ह्या म्हातारीची सांगायची लायकी नाही पण शिखरावर असताना निवृत्त व्हावे.पेले काय वा आमचा सुनिल काय ह्यांचेही असेच मत होते असे वाचल्याचे स्मरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकीच खेळाडू नेहमीप्रमाणे हागले ह्यात विशेष वाटले नाही

रमा आज्जी पुण्याचा असाव्यात आणि वय वर्षं पस्तिशीच्या आसपास. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रमा आज्जी पुण्याचा असाव्यात आणि वय वर्षं पस्तिशीच्या आसपास. (डोळा मारत)
आणि त्या आज्जी नाहीत, आजोबा आहेत हे तर उघडच आहे. डाऊन विथ जेंडर स्वॅपिंग!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कुठून कसले निष्कर्ष काढतोस तू संजोपा देव जाणे.असे Nile सारखे निष्कर्ष काढ्ण्यापूर्वी तू अमेरिकेत नाहीस हे लक्षात ठेव्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सचिनचे शतक हा राष्ट्रैय महत्वाचा मुद्दा बनवून जो काही धुरळा मिडिया उडवत आहे त्यास तोड नाही.
हा दणदणाट अति होतोय. सचिनचे चाहती आम्हीही आहोत, पण दणदणाट व महाशतकास दिले गेलेले अतिरेकी महत्व पाहून अस्वस्थ व्हायला होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबाशी शतशः सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

लोकांस जरी ह्या महाशतकाचे अतिरेकी महत्व पाहून अस्वस्थ व्हायला झाले असले तरीची त्या महाशतकाचे महात्मं कमी होत नाही.
सचिनला मानाचा मुजरा!

- ( सचिनचा भक्त ) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0