विहिर विचारी समुद्राला...

एक होती विहीर. चांगलीच मोठी होती तशी, म्हणजे गुगल मॅप्स वरून बघितल्यास तिचा 'व्यास' कळावा इतपत मोठी होती ती. खरंतर त्या विहीरीत अपवाद म्हणावा की आठवे आश्चर्य अशा तर्‍हेने वैविध्यपूर्ण प्राणी रहात होते, गुण्यागोविंदाने(?). पण मध्येच पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यावर पाणी भरपूर वाढून खूप हलकळ्ळोल व्ह्यायचा विहीरीत पण तो लगेच थंडही पडायचा. वेगवेगळ्या प्रकृतीचे, स्वभावधर्माचे विवीध प्राणी त्यावेळी आपापले अस्तित्व जाणवून द्यायचा प्रयत्न करायचे आणि गोंधळ मजवून द्यायचे. खूप आवाज व्ह्यायच्या विहीरीत अश्यावेळी. पण क्वचितच त्या विहीरीच्या मालकाला ते जाणवून यायचे, ते प्रमाण अगदी नगण्यच म्हणा ना. पण काही वेळा काही प्राण्यांचा खूपच अतिरेक व्ह्यायचा. ते थेट आकाशातून विहरीत पडल्यासारखे, स्वत:ला प्रेषित समजून इतरांना तुच्छ लेखायचे. त्यांनी तटच पाडले होते. उच्चभ्रू म्हणजे फक्त तेच जे विचार करू शकणारे आणि इतिहास घडवणार असा आत्मविश्वास (फाजील ?) असणारे व बाकीचे उपेक्षित, वैचारिक दलित जे विचार मांडू शकतात पण विस्कळीत, 'सप्रमाण' सिद्ध न करू शकणारे. त्या उपेक्षितांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे व्ह्यायचे बर्‍याच वेळेस. खूप गोंधळ व्ह्यायचा. मग मालकाला आणि त्याच्या 'मुनीम'जींना अशा गोंधळ करणार्‍या प्राण्यांच्या मुसक्या आवळाव्या लागायच्या, नाइलाजानेच. त्यालाही ते सर्व प्राणी प्राणाहून प्रिय होतेच. सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे असे त्याला वाटायचे. अशा 'वैविध्यतने नटलेल्या' विहीरीचा त्याला सार्थ अभिमान होता. पण आगतिक होऊन त्याला असे कडक पाऊल कधीकधी उचलावे लागायचे.

परंतू एकदा फार मोठा,प्रचंड, महाप्रलय झाला. खुपशी भौगोलिक उलथापालथ झाली आणि चक्क एक समुद्रच वाटावा असा एक मोठा जलाशयच विहीरीच्या शेजारी तयार झाला. नुकताच भारत सरकारचा नद्याजोडणी प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे सर्वच प्राणी इकडच्या तिकडच्या पाण्यात जाऊ शकत होते. लोकशाही किंवा रामराज्यच होते म्हणा ना. त्यामुळे ज्याला जे पाणी अनुकूल वाटत होते तिथे जाऊन तो त्या पाण्यात डुंबून आनंद मिळवत असे. विहीरीतले बरेच उच्चभ्रू प्राणी त्या जलाशयाच्या आश्रयाला गेले आणि त्यांनीच त्या जलाशयला समुद्र असे नामाभिमान देऊ केले. हे त्या नामाभिमान मात्र त्या विहीरीतल्या प्राण्यांना ठाऊकच नव्हते.

सर्व आलबेल आहे असे वाटावे अशी परिस्थीती होती. पण अचानक त्या मोठ्या जलाशयातले प्राणी विहीरीत येऊन त्या जलाशायाला त्यांनी समुद्र असे त्यांनी नामाभिमान दिले आहे असे सांगू लागले. समुद्रात कशी मज्जा-म्ज्जा असते, किती गुण्यागोविंदाने सगळे नांदतात हे सांगू लागले. समुद्रात खूप खूप जागा आहे, 'ऐस'पैस पसरता येते सर्वांना, विहीर फारच छोटी आहे हे सांगायचा प्रयत्न करू लागले. विहरीत सर्वांना संकोचित आयुष्य जगावे लागते आहे आणि त्यामुळे एकप्रकारची जैविक उत्क्रांती होऊन सर्व प्राण्यांचे बेडूक ह्या प्रजातीत रुपांतर झाले आहे आणि 'कूपमंडूक' प्रवृत्तीचा फैलाव झाला आहे असे एक मतप्रवाह त्यांनी विहीरीत सोडून दिला. समुद्रात कसे 'रामराज्य' आहे असे सर्वांना पटवून द्यायचा प्रयत्न जोर-जोरात होऊ लागला.

अरेच्चा, विहीरीतल्या प्राण्यांना काहीच कळेना. हे काय? असे तर इथे होतेच, नव्हे नव्हे आहेच, मग हे काय नविनच? त्यांना काहीच कळेना की हा नविन समुद्र म्हटला जाणारा जलाशय म्हणजे नेमके काय? फार वैचारिक गोंधळ होऊ लागला.

मग विहीरीलाच रहावेना, ती विहीर अखेर त्या समुद्रक्षम जलाशयाला विचारती झाली, 'हे विशाल 'ऐसी' ख्याती असलेल्या समुद्रा, माझ्या माहितीप्रमाणे समुद्राचे बरेच प्रकार असतात. जसे की समुद्र, महासमुद्र, पीत समुद्र, काळा समुद्र आणि चक्क मृत समुद्रही. तर हा जलाशय ह्यातला नेमका कुठल्या प्रकारचा समुद्र समजायचा आम्ही?'

वि.सू.: ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे, ईतर काही शोधण्याचा प्रत्यत्न केल्यास समुद्राच्या खारटपणाशिवाय काहिही हाती येणार नाही. Smile

field_vote: 
1.8
Your rating: None Average: 1.8 (5 votes)

प्रतिक्रिया

गमतीदार लेख. बातमी या सदरात का आहे हे कळलं नाही, कारण वर्णनांत काही त्रुटी आहेत. पण लेखनाची शैली छान आहे. याच शैलीत ज्ञानगंगा आणि तिच्या ऐलतटावर पैलतटावर रहाणारे यांच्याविषयीही लिहावं ही विनंती.

ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे,...

जरूर. या लेखाचं एक छानसं रसग्रहण करावं असं मनात येतं आहे. Smile पण सगळ्यांचा वाचून तर होऊ देत. प्रत्येकाने आपापलं इंटरप्रिटेशन मोकळेपणे मांडावं असा इथे प्रयत्न आहे. इकडे कोणी वैचारिक दलित थोडेच आहेत की त्यांनी काय लिहावं/वाचावं आणि काय लिहू/वाचू नये हे मालक-मुनीमजींनी ठरवावं? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इकडे कोणी वैचारिक दलित थोडेच आहेत की त्यांनी काय लिहावं/वाचावं आणि काय लिहू/वाचू नये हे मालक-मुनीमजींनी ठरवावं?

अच्छा. महादेव कोण आणि नंदी कोण? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__/!\__
सध्या फक्त दंडवत स्विकारा!

- (विनम्र) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विहीरीच्या कट्ट्यावर बसून वाचला आहे म्हणून पुन्हा प्रतिक्रिया देत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणखी एक गंमत सांगू सोकाजी?

समुद्रात कधीमधी ज्वालामुखींचे उद्रेक होतात. पाण्याखाली भूपृष्ठाच्या हालचाली होतात. मधूनच बेटं वर येतात. समुद्रांचे आकारही बदलत रहातात. घनता बदलत रहाते. एकेकाळचा कास्पियन आणि मृत समुद्र, आता तळी वाटावीत असे आटले आहेत. दुसरीकडे मनुष्याने धरणं बांधून कृष्णराजसागर आणि असे अनेक बनवले आहेत. अगदी अर्धा हात खोली असणार्‍या डवर्‍यांतून ते समुद्रापर्यंत सगळीकडे मासेमारी होते.

आणि समुद्रातही मोठे मासे छोट्या माशांना खातात. पण समुद्रात छोट्या माशांसाठी उथळ जागाही असतात आणि मोठ्या माशांसाठी बागडायला चिक्कार लांबी, रुंदी आणि खोली असणार्‍या जागाही असतात. मोठे मासे विहीरीत मावतच नाहीत. मोठ्या माशांचं विहीरीत कुपोषण होतं. डॉल्फिन मौजे कोपरगावच्या सार्वजनिक विहीरीत कसे दिसणार? आलाच एखादा चुकून "देवाच्या इच्छेने", तरी लगेच मासेमारांना बोलावून त्याची समुद्रात जाण्याची सोय नाही का पाहिली जाणार?

साहसाची आवड असणार्‍या एखाद्या सर्फरला विचार, हे लोकं समुद्रातच बोर्ड्स टाकतात. माणसांची नावंही विहीर, तळं, डवरा अशी थोडीच असतात? ती पण सरिता, सिंधु, सागर अशीच असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्वसंपादित. Not worth spending so many grey cells over.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

समुद्राच्या पाण्यात पुष्कळ मासे असतात. त्यामुळे मासेमारी देखील होते. त्या माशांचा रस्सा तिखट लागला तर पिण्यासाठी समुद्राचे नाही तर विहिरीचे पाणीच उपयोगी पडते.
आणि समुद्र नसेल, तर ते बाष्पीभवन होणार नाही, ढ्ग बनणार नाहीत, पाऊस पडणार नाही. मग विहीरीमधे पाणी कसे येणार?

ताप्तर्य : जरी गुणधर्म वेगवेगळे असले तरी समुद्र आणि विहीर दोन्ही असणे जरूरी आहे.

समुद्र आणि विहीरीतील साम्ये:
१)अनेक प्रकारच्या विहीरी, आणि अनेक प्रकारचे समुद्र आढळतात.
२)विहीरीत पाणी असते तसेच समुद्रात देखील पाणी असते.
३) विहीर, आणि समुद्राचे पाणी त्यात पोहणार्‍याला कधी तरंगत ठेवते तर कधी बुडवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

बालु की भित, पवन का खंबा |
देवल देख भया अचंबा ||
भोला मन जाने - अमर मेरी काया ||

खरं तर अतिशय उत्तम व संतुलित असा प्रतिसाद आहे. परंतु तशी श्रेणी द्यायची सोय नाही म्हणून माहितीपूर्ण असे म्हंटले आहे. एखाद्याला न चिडता (व न चिडविताही) अतिशय समंजसपणे आपला मुद्दा कसा पटवून द्यावा (व सोबतच त्याच्या ज्ञानात कशी भर टाकावी) याचे आदर्श उदाहरण म्हणजे मनीषाजींचा हा प्रतिसाद आहे.

अवांतर :- संपादकांनी उत्तम व संतुलित या शब्दांचा श्रेणींमध्ये समावेश करण्यावर जरूर विचार करावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

लेखन अ‍ॅलिगिरिकल दिसते. एकंदर सोयीनुसार अ‍ॅलिगॉरीज् वापरलेल्या दिसल्यामुळे अ‍ॅलिगॉरीमधे सत्याच्या दर्शनापेक्षा अजेंडा-पुशिंग झालेले आहे. आनंद आहे. Smile

विंदा करंदीकरांची एक विरुपिका आठवली :
"एकदा त्याने समुद्राच्या पाण्यात
लघवी केली
आणि
उरलेले आयुष्य
त्यामुळे समुद्राची खोली किती वाढली
हे शोधण्यात काढले."

(उपरोक्त विरुपिका विनोदी आहे. विनोद समजूनच घ्यावी. निदान इथे तरी विनोद करता येईल. हसता येईल. अन्यत्र चाललेले विद्वेषयुक्त प्रदर्शन रोचक आहे.
अगदी समुद्रावरचे विनोद , समुद्रावरची अनावश्यक/जहरी टीकासुद्धा इथे चालवली जाते. अन्यत्र मुद्देसूद केलेल्या प्रतिवादाचंसुद्धा काय होतं कोण जाणे. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

करंदीकरांची विरुपिका आवडली व त्याहूनही अधिक आवडला तो ती विरुपिका इथे चपखलपणे वापरण्याचा हजरजबाबीपणा.

<< अगदी समुद्रावरचे विनोद , समुद्रावरची अनावश्यक/जहरी टीकासुद्धा इथे चालवली जाते. अन्यत्र मुद्देसूद केलेल्या प्रतिवादाचंसुद्धा काय होतं कोण जाणे. >>

या वाक्यांतील शब्दाशब्दांशी पूर्णतः सहमत. अर्थातच त्यामुळे +१ श्रेणी दिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे,

अवघड पेच टाकला आहे सोकाजींनी. :-S

असो. लहान बेडकांना विहीरीत आणि समुद्रात दोन्हीकडे काहीच धोका नसतो असे स्वानुभवावरून वाटते.
बाकी यानिमित्ताने आमच्या एका मित्राच्या तीन खोल्यांच्या घराचे नाव गणेश 'प्रासाद' आहे ते आठवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समुद्र ज्याला म्हण्टलेले आहे ते त्याने स्वतःला मिरवलेले नामाभिधान नव्हे तर "कॉल द डॉग मॅड अँड देन शूट हिम" या सोयीच्या अ‍ॅलिगोरीमधले आहे हे येथे नमूद करायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

>>समुद्र ज्याला म्हण्टलेले आहे ते त्याने स्वतःला मिरवलेले नामाभिधान नव्हे

या विधानाबद्दल थोडी शंका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शंका ज्यामुळे आली त्याचं कारणसुद्धा द्या. माझ्या तपशीलात काही चूक होत असेल तर मान्य करायला मी तयार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लेख फारच त्रोटक वाटला.

अरेच्चा, विहीरीतल्या प्राण्यांना काहीच कळेना. हे काय? असे तर इथे होतेच, नव्हे नव्हे आहेच, मग हे काय नविनच? त्यांना काहीच कळेना की हा नविन समुद्र म्हटला जाणारा जलाशय म्हणजे नेमके काय? फार वैचारिक गोंधळ होऊ लागला.

गोंधळ झाला का केला गेला ? Wink

७/१२ आणि विहिरीच्या कागदपत्रांवर नाव लावण्याचे आश्वासन मिळालेल्यांच्या प्रतिक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

विहिर असो वा समुद्र वा अन्य कुठलाही जलाशय.
प्राण्यांना पोहता येत असल्याशी कारण. आणि जर पोहता येत नसेल तर फ्लोटर शिवाय पाण्यात उतरण्याचे धाडस करु नये. Wink
काय म्हंता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

अगदी अगदी, शेम तु शेम असेच म्हंतो! Smile Smile

- (पट्टीचा पोहणारा) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय बोर मारलय राव सोका
चार दारूचे धागे काढ लेका
(ते तुला जमतं बर्का) Smile
गढूळ डब्क्यात उड्या माराव्या बेडकानी
दारूच्या पेल्यात बुड्या माराव्या सोकानी
बेडूक फुग्ला तर बैल होतो का?
धडा घे लेका सोका
संपली इसापची गोष्ट बर्का.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

सोकाजी, तू दारूबद्दल लिही रे. नाहीतर असल्या कविता वाचाव्या लागतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्हा बेड्कांच्या अन माश्यांच्या गोष्टी काय आम्हाला कळायच्या नाही बुवा.

आणि हो, आम्हाला पोहता येत नाही. पण आम्हाला माशांची शिकार मात्र बरोबर करता येते. ही पहा झलक...

-(आफ्रिकन ईगल)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile