गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?

गांजाचे व्यसन असणारी शरीराचे खोके झालेली, डोळे निस्तेज झालेली समाजाच्या निम्न स्तरातली मंडळी नेहमी दिसून येत, तेव्हा त्यांच्याविषयी अनुकंपा वाटत असे. समाजात नेहमीच त्यांची गांजाडा म्हणूनच संभावना होत असे, दारूड्यांपेक्षा वाईट प्रतीचे व्यसनाधीन म्हणून त्यांची घृणा केली जाई. मी लहानपणी 'लोकमत' या वृत्तपत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांची ड्रग्जचे दुष्परीणाम सांगणारी एक लेखमालिका वाचली होती, तीतदेखिल गांजाचे भरपूर दुष्परीणाम सांगितले होते, जे वाचून अंगावर काटा आल्याचे आठवते. आता मात्र ऑफिसमधील कलिग्ज किंवा कॉलेजमधले मित्र यांच्याकडून गांजाविषयी निराळीच माहिती समजते. एक तर ह्या सगळ्याच लोकांत गांजा हे निरूपद्रवी व्यसन असल्याबद्दल खात्री आहे. ह्यांच्या तब्येतीवर किंवा कार्यक्षमतेवर कुठला वाईट परीणाम झाल्याचे दिसत नाही. (माझा सँपल सेट खुप छोटा आहे याची जाणीव निश्चित आहे.) अमेरिकेत झालेल्या संशोधनाचा किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गांजाच्या सुरक्षीत आणि अंमली पदार्थ नसण्याबद्दलच्या रिपोर्टचा(संदर्भ) हवाला देत ते भारतात गांजा कायदेशीररीत्या उपलब्ध असावा अशी मागणी करत असतात. अमेरिकेत ९ राज्यांत डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गांजा सेवन करण्याची परवानगी २१ वर्षांपुढील व्यक्तिस आहे. २९ राज्यात मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तर गांजा मिळू शकतो. पॉप्युलर कल्चरमधूनदेखिल गांजा सेवन केल्याचे उल्लेख(एआयबी किंवा टिव्हीएफच्या वेबसीरीजमधून वगैरे) होताना दिसतात. गांजा बर्‍याचदा अ‍ॅंटी- एस्टॅब्लिशमेंटचे चिन्ह म्हणून देखिल मिरवले जाते. गांजा हे अगदीच निरूपद्रवी आणि व्यसन न लागू शकणारी वनस्पती आहे असे मत वैद्यकिय क्षेत्रात देखिल बहुसंख्य तज्ञांत आढळेल. मात्र मानसरोगतज्ञांत व मेंदूतज्ञातील काही वर्तुळात गांजाच्या दुष्परीणामांबद्दल भिन्न मते असल्याचे आढळते. इतर अंमली पदार्थांच्या सोबत गांजा असणे हे सिगारेट व दारू कंपन्यांचे कारस्थान असल्याचे बंदीविरोधकांचे म्हणणे दिसते.

बंदीविरोधकांचे युक्तिवाद खालीलप्रमाणे:

१. गांजामुळे उलट इतर अंमली पदार्थाकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल.
२. सिगारेट ओढण्याचे किंवा तंबाखूचे दुष्परीणाम सर्वांसमोर आहेत, ते शास्त्रिय संशोधनातून सिद्ध देखिल झाले आहेत. तंबाखू सेवनाने ७० लाखांहून अधिक व्यक्ति एका वर्षात मरतात(स्रोतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन: इथे) मात्र तरीही तंबाखुवर बंदी नाही मात्र गांजाच्या थेट सेवनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नसतानासुद्धा गांजावर बंदी हे तंबाखू लॉबीचे कारस्थान आहे. तसेच दारूमुळे झालेल्या मृत्यूंशी देखिल तुलना केली जाते.
३. बंदी असूनसुद्धा नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि अंमली पदार्थाचे व्यापारी-स्मगलर्स यांच्या संगनमताने भारतात निर्धोकपणे गांजा मिळतो. मात्र त्याचे पैसे दहशतवादी व समाजविरोधी तत्वांना मनी लाऊंडरींगस्वारे मिळतात. एक नगदी पिक जे शेतकर्‍यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवले जाते.
४. भारतात गांजाच्या परीणामांवर फारसे सम्शोधन न होताच बंदी घातली गेली आहे. जे अन्याय्य आहे.
५. टिपिकल लिबर्टेरियन युक्तिवादः लोकांच्या वैयक्तिक बाबीत जसे व्यसन ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असू नये.

तर बंदी चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचे मुख्य युक्तिवाद खालीलप्रमाणे असतातः

१. गांजा ही इतर अंमली पदार्थाच्या सेवनाची पहिली पायरी असू शकते. किंबहूना बर्‍याच केसेसमध्ये तसेच असते.
२. गांजामुळे होणारे भास- भ्रम हे मेंदूला हानीकारक ठरतात असेदेखिल काही संशोधनात सिद्ध झाले आहे. मेंदूतील पेशी मरण्यासंबंधीचे संशोधन बर्‍यापैकी गाजले आहे. संदर्भ
३. अंमली पदार्थावर बंदी असणेच योग्य, खरे तर सिगारेट- दारूवरदेखिल बंदी असावी पण गांजावरील बंदी उठवू नये.
४. भारत आणि अमेरिकेत फरक आहे, तिथे मेडिकल मरियुवानाचे नियंत्रण व्यवस्थित होऊ शकते मात्र भारतातल्या भ्रष्ट व्यवस्थेत त्याची पायमल्लीच होईल. त्यामुळे परवानगी नकोच.
५. गांजा तंबाखूप्रमाणे प्रक्रिया करून मग सेवन करायचा नसतो, थेट वापरता येतो. अधिकृत परवानगी दिली तर किती मोठ्या प्रमणात गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढेल? शिवाय देशासाठी अतीमौल्यवान असणारे मनुष्यतास गांजाच्या नशेत वाया जातील त्यामुळे हे आजिबात करू नये.

आणखी एक उपमुद्दा: सत्पुरूष, संत किंवा सदगुरू वगैरे म्हणून पुज्य असणार्‍या धार्मिक गुरूंच्या हातातील चिलिम हे गांजाच्या गौरवीकरणाचं उदाहरण वाटतं का?

या विषयावर ऐसिकरांची मते जाणून घ्यायला आवडतील. चर्चा गांजा व त्याचे उपप्रकार जसे भांग इत्यादीपर्यंतच मर्यादीत रहावी.

१. या विषयावर द हिंदूत झालेला वादविवादः इथे
२. गांजाविषयीची WHO वरील माहिती इथे: http://www.who.int/substance_abuse/facts/cannabis/en/
३. क्वोरावर या विषयावर ढिगार्‍याने चर्चा झाल्या आहेत त्यातील महत्वाच्या चर्चा: इथेइथे
४. अमेरिकेतील गांजासंबंधी: इथे

field_vote: 
0
No votes yet

गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?

.
हो.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दारु ला आहे, सिगरेट ला आहे.
मग 'अधिक' सामाजिक दुष्परीणामाची रेघ ओढायची तरी कोठे?
परवानगी द्या आणि विस्कळित होउ द्या जनजीवन एकदाच. परत शिस्त येईलच की. Order from chaos.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्याचे तसल्या ड्राईव्हमध्येही उपयोग आहेत हे वाचून होतो.
गांजा ओढण्याची कला
१.गांजा हा एक प्रकारचा पालासद्रष्य पदार्थ आहे. त्यात बाजरी सारख्या बिया असतात. तंबाखू प्रमाणे मळल्यास त्या बिया सहज काढून टाकता येतात.
मग हा पाला चारमिनार वा दुसरी कोणतीही (फिल्टर नसलेली सिगरेट रिकमंडेड) सिगारेट त्यातली तंबाखू काढून अर्धी तंबाखू अर्धा गांजा भरुन समोरचं टोक वात काढल्लागत पिळून मग ते पेटवून निवांत ओढत बसावं
२. कुठून तरी मातीची चिलीम मिळवून त्यात वर सांगितल्याप्रमाणे मसाला ठासून भरावा अन ओढायच्या टोकाला एक कपडा लाऊन झक्कास दम भरावा.
(नविन व्यक्तीनं जरा दम्मानच घ्यावं कारण चिलीम मधून भलामोठ्ठा दुर घशात जाऊन खोकला लागू शकतो)
मातीची चिलीम न भेटल्यास नारळाच्या झाडाचं पान मिळवून त्यालाही चिलमीसारखा आकार देता येऊ शकतो.

नविन व्यक्तीनं दोन-तीन दिवस सुट्या असल्यासच हा प्रयोग करावा असे सुचवू इच्छितो.

ही आपली एक ऐकिव माहिती.

बाकी गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळू नै असे मत नोंदवून मी थांबतो. जयहिंद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

कायदेशीर मान्यता मिळाल्यास काय मोठा फरक पडेल असे वाटते?
आज मान्यता नसतानासुद्धा गांजा सहजपणे कुठेही उपलब्ध आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

कधीकाळी आमच्या ग्रुप एडीरने लिहलेला हा लेख आठवला जो भारतीय परिप्रेक्ष्यात अधिक माहिती देतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम लेख.
गांजा ओढणाऱ्यांचे प्रमाण इतके मोठे असेल असे वाटले नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

गांजा आणी भांगेत फरक काय?
ठाण्यात भांग कुठे भेटेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झाडपाल्यामधलं खरोखर नशा आणणारं द्रव्य अत्यल्प असेल ( अमुक मिलीग्राम एक किलोमध्ये) तर फारसे परिणाम करणार नाही. प्रमाण वाढत गेलं की अपायकारकता वाढेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुना लेख

http://mr.upakram.org/node/3868

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धागालेखकाचा आशय सर्वच अंंमली पदार्थांना मान्यता द्यावी जेणेकरून व्यसनाधीन होण्याची शक्यता असणारी माणसे गचकतील आणी गुणी लोक जगू शकतील अश्या फिल्टरसंबंधी होता. आहारी गेलेल्या लोकांना मारणे हा उद्देश गांजामुळे पूर्ण होइळ असे वाटत नाही. गांजा फुकून मेलेल्या लोकांची संख्या खुप कमी आहे कारण. बाकीचे पदार्थ लिथल आहेत याच्याशी सहमत.
गांजाने असे कोणते संकट समाजावर कोसळते जे दारू, सिगारेटने कोसळत नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

दारु पिउन गाडी चालवतो आहे का चालक हे तपासणारा ब्रेथ ॲनालायझर असतो तसा गांजासाठी कसला ॲनालायझर असतो का? जो लगेच तपासेल की कोणी गांजाच्या इन्फ्लुएन्सखाली आहे का नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तसा गांजासाठी कसला ॲनालायझर असतो का? जो लगेच तपासेल की कोणी गांजाच्या इन्फ्लुएन्सखाली आहे का नाही?

माझ्या माहितीनुसार ब्लड टेस्ट करावी लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Pupil dilation is an indicator.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सहमत, मात्र त्यामागे इतर अनेक कारणं असू शकतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

डोळ्यांच्या वार्षिक तपासणीत अनेकदा retinopathy वगैरे आहे/नाही हे तपासण्यासाठी (डोळ्यांत ड्रॉप्स वगैरे घालून) रीतसर pupil dilation करतात. त्याचा इफेक्ट नंतर काही तासांकरिता टिकतो. (दिवसाच्या वेळेत असल्यास नंतर गाडी चालविताना वगैरे उजेडाचा त्रास होऊ नये म्हणून तात्पुरत्या काळ्या कचकड्या देतात.)

पुढील खेपेस डोळ्यांच्या तपासणीहून घरी परतताना गांजा ओढून गाडी चालविण्याच्या आरोपाखाली अटक झाली नाही म्हणजे मिळवली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं मान्यता मिळावी आणि रेग्युलेशन व्हावं.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला वाटतं अवश्य मान्यता मिळावी व सरकारला याचे कोणतेही रेग्युलेशन करता येणार नाही व हा मुद्दा सरकारच्या (आणि परमेश्वराच्या सुद्धा) अखत्यारीबाहेर असेल असं कलम त्या कायद्यात असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

'काय बोलतोस काय ? का सकाळी सकाळीच गांजा ओढून आलायस ?'
असली वाक्यं येता जाता फेकणारे जातिवंत मध्यमवर्गीय, कधी त्याच्या वासाला तरी उभे राहिले असतील, असे वाटत नाही. मग अनुभव घेण्याची गोष्टच दूर ! माझ्यावरही ती वेळ अचानकच आली.
नुकताच डेमॉन्स्स्ट्रेटर म्हणून नोकरीला लागलो होतो. मुलांचे प्रॅक्टिकल चालू झाले होते. अचानक दाराशी, मला माझा एक गुंड मित्र दिसला. त्याने लांबूनच काही बोलून शोभा करु नये, म्हणून लगबगीने मी दाराशी गेलो. त्याने हळुच लपवलेली चिलीम बाहेर काढली आणि आव्हानच दिले," खऱ्या xxxचा असशील तर आत्ता माझ्याबरोबर या बाजूच्या मुतारीत ये आणि दोन कश मारुन दाखव !" आम्हीही सहज घोड्यावर बसणारे!! गेलो शेजारी , आणि कुणी नाही असं पाहून मारले दोन कश! मग मात्र त्याला घालवून दिले आणि बॅच पूर्ण केली! मोठेच रिस्क घेतले होते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

तिमा तुम्ही ???? बापरे नशीब निभावलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तो पतंजलि फ्लेवर होता. इतका कडक नको अधिकृत व्हायला..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तुम्ही दोघेही डँबिस आहात. Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोडवरचं जाहिरातीतलं चिकनं पोस्टर पाहिल्याने डोले विसफारले तर किती वेळ मोठे राहतील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जितकं चिकनं तितका जास्त वेळ
(नै बाजू के कमेंट के डर से ड्रा रैट)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

तुमचा एंटरटेनमंट क्वोशंट वाढतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गांजा दिवसाच्या शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गांजाला भारतात कायदेशीर मान्यता दिली जावी असे माझे मत सरकारला गांजावर कर आकारता येईल. भेसळयुक्त किंवा रसायने फवारलेल्या गांजामुळे इस्पितळात जाणाऱ्यांची संख्या कमी होईल. कदाचित चांगल्या प्रतिचा गांजा (हिमाचल प्रदेश) निर्यात करता येईल. वगैरे वगैरे. सेवन करणाऱ्या लोकांसाठीचे फायदे (प्रत, किंमत आणि कायदेशीर मान्यता) विस्तारभयास्तव देत नाही. गांजा हा दारु किंवा इतर व्यसनांपेक्षा कमी हानिकारक असावा असा अंदाज आहे.
ऐकिव किस्सा: मित्र मनालीला गेलेला असतांना तिथल्या हॉटेलच्या वॉचमनला त्याची बायको सांगत होती की तू या टुरिस्टांसारखा गांजा का पीत नाही? दारु पिऊन रोज मारण्यापेक्षा गांजा पिऊन गप्प झोपशील.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. अफू,गांजा, चरस
२. ओपियम , मॉर्फीन
३. कोकेन
या ती वनस्पतीजन्य ड्रग्स बद्दल कोण तद्न्य तौलनिक माहिती सांगू शकतील ?
( माझा इंटरेस्ट म्हणजे कुठले धार्मिक बाबे यातील कुठली औषधे प्रेस्क्राइब करायचे ... वगैरे )

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या धाग्यावरची चर्चा वाचून प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवलं नाही.
१) मुंबई-पुणे आदी जिल्ह्यांत गांजा ओढण्याचं प्रमाण जबरदस्त आहे. धाग्यात लिहीलंय तसं टीव्हीएफ, बीईंगिंडीयन, अर्रे इत्यादी चेपु पानांच्या गांजाबाबतच्या चर्चेत उघडपणे एकमेकांना टॅग करणारी तरुणाई पाहिली, तर त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा एक लसावि काढता येतो. जरा आर्थिक स्थैर्य, आणि योग्य मित्रमंडळ असल्यास गांजा मिळवण्यात काहीही कठीण नाही.
२) सिगरेट, दारू ह्यांपेक्षा गांजाची 'लाथ' सौम्य असते. वर्णन केल्यासारखं आकडी येणे, व्यसन लागणे इत्यादी प्रकार होत नाहीत. गांजाचा वास अगदीच वाईट, कुजकट असा असतो. ओढल्यानंतर थोड्या वेळाने अतिशय सुखद अशी ग्लानी जाणवते. झोप उत्तम लागते. अजून ओढावासा वाटत नाही. गांजात तंबाखू घालून ओढल्यास वेगळी 'किक' मिळते, आणि त्याचा वास सिगरेट ओढणाऱ्या मंडळींसाठी जरा सुसह्य असतो. तंबाखूचा वास तसाही किळसवाणा असतोच.
३) गांजाचे चवदार प्रकारही मिळतात, ज्यांचा भाव बराच जास्त असतो. ह्याला हॅश म्हणतात. अबापट ह्यांच्या पृच्छेसाठी:
४) गांजा विकणं कायदेशीर करणं हा गरजेचा राक्षस असावा असं माझं मत आहे. वरकरणी तरी निरुपद्रवी दिसणाऱ्या, अर्ध्या भारतीयांचं दिवास्वप्न असलेल्या; कनैड्डासारख्या देशात कायदेशीर असणाऱ्या ह्या पदार्थामागचं 'निषिद्ध वलय' काढून घेतलं, तर त्यामागचं 'थ्रिल' कमी होण्याची शक्यता बरीच आहे.
५) अर्थात दारू/सिगरेट प्रथम कायदेशीररीत्या विकायला सुरुवात केली गेली तेव्हा अत्यंत पांढरपेशा मंडळींनी हलकल्लोळ केला असणारच. बरेचदा ऐकली गेलेली भीषण वर्णनं अतिशय एकांगी आणि धक्कादायक असतात. ह्या संस्थळाकडून तशा प्रतिक्रिया मिळण्याची अपेक्षा नव्हती.
६) धागालेखकाने मांडलेल्या प्रत्येक मताशी मी सहमत आहे. गांजाचं 'पॅसिव्ह स्मोकिंग' (दुसऱ्याने सोडलेला धूर श्वासाद्वारे आत घेतल्यास) केल्यास लगेच ग्लानी चढते, म्हणून अतिशय कडक कायद्यांचं बंधन असावं. सार्वजनिक ठिकाणी बंदी, स्वत:च्या घरात सोडून बाकी कुठेही गांजा ओढणं अजामीनपात्र गुन्हा ठरवावा. मुंबईत बऱ्याच ठिकाणी आजही उघड उघड गांजासेवन चालतं. आज गांजा जवळ बाळगणं गुन्हा आहे.
७) गांजासेवन करुन/करत असताना लैंगिक संबंध ठेवल्यास अतिशय सुखद, बराच काळ टिकणारी अशी, 'तृप्ती' होते. तिचं व्यसन लागू शकतं, पण ते 'चांगलंच' कसं ह्याबाबत तुमच्याकडे विदा असेलच! गांजाचे सिगरेट/दारूसारखे लैंगिक क्षमतेवर दुष्परिणाम होत असल्याबाबतचा एकही दावासुद्धा वाचण्यात आला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नगरकरांच्या वायू ब्यांडवरच्या पुस्तकात वाचले होते.
(किबोर्ड अपडेट केल्यापासून शुद्धलेखनाच्या चुका होताहेत, तो ठेका आहे कुणाचातरी इथं)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

७ वा प्वाईंट खूपच विंट्रेस्टिंग वाटला.
जे का रंगले गांजाले, त्यांसी म्हणावे आपुले!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

रिया, शौविक आणि मंडळी सरकारी पाहुणे झाल्यापासून गांजाबद्दल चर्चा पुन्हा सुरू झालीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************