बाकी इतिहास

फुटक्या बुरुजाखाली सावली शोधणार्‍या पिकनिकी गर्दीला थोपवून पोटार्थी गाईड पोपटपंची करतोय :

"मंडळी,
ही तेजतर्रार नावाची तोफ वापरून "आपल्या" सैन्याने "त्यांच्या" सैन्याच्या अमुक इतक्या सैनिकांना अमुकअमुक सालच्या युध्दात निमिषार्धात घातले कंठस्नान"

वर्तमानाच्या विवंचना विसरून
डोळे विस्फारून ऐकणार्‍या गर्दीच्या
कानामनात अचानक झंकारतंय
अज्ञात इतिहासातलं
गारूड टाकणारं
वृंदगान:

"रण स्थंडिल हे धगधगते
रणचंडी तांडव करिते
उकळते रक्त जणू लाव्हा
वीरांनो मुजरा घ्यावा
टापांची उडते धूळ
रणभेरी करी कल्लोळ
तळपती वीज - समशेर
गनिमाची नाही खैर
विजयाचा अविरत डंका
कानावर येतो, ऐका
मृत्यूही थिजूनी जावा
कळिकाळा घाम फुटावा
धड धडाड गर्जे तोफ
युद्धाचा चढता कैफ
क:पदार्थ वाटे प्राण
जो रणी न होई कुर्बान"

रोमारोमात दंतकथा भिनून
क्षणोक्षणी धूसरतोय
गर्दीचा
वर्तमान

भारलेल्या आईबापांचा
हात सोडून तोफेकडे एकटक बघणार्‍या
गर्दीतल्या त्या लहानग्याला मात्र दिसतायत फक्त
तोफेच्या अवजड बत्तीझाकणावरची
ओतीव लोखंडात
नजाकतीने घडविलेली
दोन टवटवीत फुलं
अन मधे एक
कवळं
पान

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चिखल केल्याशिवाय कमळं कशी फुलणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिखल हाताने करायचा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय प्रतिसाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवजात निरागसता आणि निर्ढावलेला निबरपणा.
निबरपणात भरीला वीरश्रीचे नशापाणी.
इतिहासातल्या वीरश्रीच्या चुडीने पेटवलेला वर्तमान.
आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अप्रतिम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.