पाषाणसंगीत रॉक्स ... अँड चॅट्स अर्थात संगीत रॉकगफ्फा

तर मंडळी असं झालं की तरुण तडफदार इंग्लीससंगीतप्रेमी चौदावे यांनी माझ्यासारख्या न लिहू शकणाऱ्या आणि निस्त्या गफ्फा हाणणाऱ्या इसमाला लय म्हणजे लय पिडलं कि बोला बोला ...................आणि मग खरडफळ्यावर चौदावे ,मिहीर , पुम्बा , दस्तुरखुद्द गविशेठ आणि विषयात फारसा इंटरेस्ट नसूनही पोरांच्या उत्साहाला स्फूर्तीदाते आचरट बाबा यांच्या गफ्फा सुरु झाल्या .
चालकमालक संघटनेचे पुण्यातील डावे उदारमतवादी गुप्तहेअर चिंतातुर जंतू ( यांना लाल सलाम ) आणि कॅपिटॅलिस्ट ट्रम्पलँड मधील मालक अदिती ( नमः ) यांनी "काय चाललंय हे खफवर , धाग्यावर लिहा धाग्यावर लिहा " असा वारंवार धोशा लावून खफच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केल्याने .........

चौदावे,गविशेठ, पुम्बा, मिहीर आणि आचरट बाबा यांच्या गफ्फा इथे धागा म्हणून देत आहे. (धाग्याचे संपूर्ण संपादन कष्ट आणि श्रेय आचरट बाबांचे आहे . त्यांना धन्यवाद . )
तेव्हा मंडळी ऐका ....

१४टॅन : अबापट,
तुमचं ८०-९० च्या रॉकबद्दल बाकीए, त्याबद्दल होतं ते. मी खर्तर त्यातच जास्त इंट्रेष्टेड आहे, पण तुम्ही लै बिज्जी. असो. संन्यास घ्यावा लागणारसं दिसतंय.

अचरटबाबा : मला अबापट यांनी बरीच वेगवेगळ्या प्रकारची गाणी पन्नासेक सुचवली होती ती सर्व डालो करून मी ऐकली होती. ( अमचा कानच तयार नाही ते सोडा.) पण लेखामध्ये विचारा ते तुमच्या कलाचे सुचवतीलच.
आणखी काय सांगू?

अबापट : अहो ते रॉक च काय लिहू? असा प्रश्न आहे. ( इथे रॉक बद्द्ल कुतुहूल फक्त तुम्हाला आहे म्हणून विचारलं?)

३_१४ विक्षिप्त अदिती : ड्वेन जॅानसनचे फोटो डकवा.

अबापट : आरारा!

गवि : ( इथे रॉक बद्द्ल कुतुहूल फक्त तुम्हाला आहे म्हणून विचारलं )
मलाही वाचायला आवडेल. कृपया लिहा.
रॉक म्हणजे नेमकं काय. त्यात आणि अन्य पॉप्युलर म्युझिकमध्ये काय सीमारेषा आहे?
इन फॅकट् एकूणच सर्व जॉनर्स आणि त्यातला फरक हे एका लेखात यावे अशी इच्छा आहे.
रॉक, पॉप, ब्लूज, बालड्स, जॅझ, मेटल, आल्टरनेट आणि इतर अनेक.
त्या त्या जॉनरमधलं एक प्रसिद्ध गाणं उदा म्हणून.
रेगी, कंट्री, टेक्नो राहिले.
असे अधिकृत प्रकार आहेत का?

१४टॅन : अँड बी, सोल हेही.
मिहिर : गविंना +१. मलाही वाचायला आवडेल हे.

३_१४ विक्षिप्त अदिती : अण्णा, सेलिन दीआँवरही एक लेख लिहा.

गवि : आनि बाकी एकेका पर्कारावर कसा- एक एक शेपरेट लेख...

नाय नाय. सर्व पर्कारांचा एकत्र आढावा.. (हे जरा संस्थेच्या वार्षिक स्मरणिकेसारखं झालं का?)

१४टॅन : आसं बगा.. म्हंजे, ते राकवर झ्याक असा मेन फोकस पायजेल, तुमचा ष्टडी आहे म्हनल्यावर- आनि बाकी एकेका पर्कारावर कसा- एक एक शेपरेट लेख...

गवि : बापटण्णा , आणखी किती मतं पाहिजेत?

अबापट : मारताय मला.ठीक. विचार करून लिहितो आठवड्यात. मंडळी टेन्शन देताय.पण लिहिणार.

अबापट : ++ तुमचा ष्टडी आहे++
चौदावे, गविशेठ, मिहीर आणि अदिती.
इथे काही भयाण गैरसमज झालेला दिसतो की मी कुणी फार तज्ज्ञ आहे वगैरे.
मी ते नाही हे कॅटॅगॉरिकल विधान. फार तर बरीच वर्षे चारदोन गाणी ऐकतोय एवढेच.
कृपया मला असे झाडावर चढवून ( खाली आपटवू नका. )
++एक एक शेपरेट लेख...++सर्व पर्कारांचा एकत्र आढावा++अधिकृत प्रकार++एकूणच सर्व जॉनर्स आणि त्यातला फरक ++
हे असलं तज्ज्ञछाप लिहिण्यापेक्षा रॉक मधलं मला काय आणि का आवडतं हे लिहिलं तर चालू शकेल काय?
मला उमजलेले रॉक वगैरे छाप?
*****************************************************************************************

बाकी गविशेठ, तुम्ही जग हिंडणारे आणि मला असले प्रश्न विचारून विकेट घेता काय?
आणि अदिती. सेलीन डिओं? सिरियसली? आपला सेलीन डीऑन वगैरे अम्रिकन भावगीतांचा अभ्यास नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती : माला सेलिन दिआँ, माला टेलर स्विफ्ट, माला अॅडम लेव्हिन.
१४टॅन : नाही. सेलियन डायन.
****************************************************************************************
अचरटबाबा : १) हौसॅाप बाम्बू ~~ बाम्बुच्या घर्रात र्हायला हवे हे कोणते बाम्बु आपलं रॅाकवरून आलं हे लगे हात विचारुन घेतो.
२) मराठीतली कोणती गाणी रॅाकरिदमच्या जवळपास जातील? जगात हसरे तारे मी पाहु कशाला नभाकडे वगैरे.
३) किंवा कोणत्या मराठी गिताचं रॅाक केलं असतं तर चांगलं झालं असतं?
४) अजय-अतुलना हे जमेल का? मराठी रॅाक?
५) पंजाबी गातात ते ढांकचिकी ढांकचिकि बल्लेबल्ले कोणत्या प्रकारात मोडतं?
हे प्रश्न फक्त अबापटांसाठी नाहीत. कंटाळा घालवण्यासाठी फक्त.

पुंबा : एका कोथ्रुडातील बारमध्ये इथे फक्त इंग्लिश गाणी वाजवली जातील आणि ती पण फक्त रॉक असा फटकारा पडला. रॉक म्हणजे नक्की कोणती गाणी हे न कळल्याने आवडती गाणी देखिल फर्माइश करता आली नाही. आण्णा रॉकवर लिहीतील तर आमचे द्न्यान वाढेल.

अबापट : @पुम्बा : ++ती पण फक्त रॉक++
जागा सांगा. जागा जाऊन बघण्यात इंटरेस्ट आहे.
@ आचरट बाबा :
१. हौसॅाप बाम्बू : मन्ना डे. घरकुल. हेच म्हणत असाल तर त्याचे तेच शब्द असलेले मूळ विंग्रजी गाणे आहे. ते रॉक नाही. ते रॉक अँड रोल.
२. ++रॅाक केलं असतं++ असं सांगता येणार नाही.
३. अजय-अतुलना हे जमेल का? का नाही? अजय अतुल काय तुम्हाला किंवा मला पण जमू शकेल. रॉक मध्ये घराणे शाही नाही.
४. पंजाबी ढांकचिकि बल्लेबल्ले हे 'पंजाबी ढांकचिकि बल्लेबल्ले' या प्रकारात मोडते.

अबापट : पुम्बा, सर्व थोर रॉक गाण्यांची लिस्ट मी खफवर आणि धाग्यावर पण टाकली होती. त्यातली कुठलीही गाणी सांगा त्या बार मध्ये.
बार चं नाव सांगा. बरं रॉक वाजवला जाणारा बार कोथरुडात सापडत नाही. शोधात आहे. जाऊन येईन.

पुंबा : तिथे गाणी वाजवणारा वाद्यवृंद, गायक असे काही नाही. म्युझिक सिस्टीमवर वाजवतात. छोटी जागा आहे. मला आवडते खुप.
हिडन प्लेस, 1st Floor, Rahul Complex, Near Ajanta Avenue, Beside Krishna Hospital, Paud Road, Kothrud

अबापट : हे माहितीय. ( गेलो नाहीये तिथे कधी. ) कॉलेज पोरं जास्त/फक्त असतात तिथे असं माझा मुलगा मला म्हणाला. ( म्हणजे कंसात, तुम्ही तिकडे तडमडू नका. ) तिथे फक्त रॉक असतं हि माहिती नवीन आहे. माझ्यासाठी तरी.
**********************************************************************************************************
गवि : खालील गाण्यांपैकी रॉक कोणती?

-वी विल वी विल रॉक यू
-रॉक अराऊंड द क्लॉक
-लिव्हिंग ऑन द इज (एरोस्मिथ)
-इन दीज आर्म्स
-फ्रायडे आय एम इन लव्ह
-बिली जीन
-ब्लेझ ऑफ ग्लोरी
-सल्टन्ज ऑफ स्विंग
-गोल्डन आय
-कॅट्स इन द क्रेडल

अबापट : गवि शेठ,
-वी विल वी विल रॉक यू : १०० टक्के रॉक
-रॉक अराऊंड द क्लॉक : १९५० चे दशक. रॉकचा जन्म झाला नव्हता. हे आहे रॉक अँड रोल. क्लासिक
-लिव्हिंग ऑन द इज (एरोस्मिथ) : ( गरीब) रॉक
-इन दीज आर्म्स : ऐकलं नाहीये, म्हणून क्षमस्व
-फ्रायडे आय एम इन लव्ह : ऐकलं नाहीये, म्हणून क्षमस्व.
-बिली जीन : लोकं उगाचच रॉक मध्ये टाकतात.
-ब्लेझ ऑफ ग्लोरी : ऐकलं नाहीये, म्हणून क्षमस्व.
-सल्टन्ज ऑफ स्विंग : रॉक, सॉफ्ट रॉक. काय भारी गिटार. लाईव्ह व्हर्जन्स मध्ये.
-गोल्डन आय : माहित नाही.
-कॅट्स इन द क्रेडल : (नक्की ) अर्ली रॉक.

गवि : प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अज्ञान पुरेसं उघड झालं का?

अबापट : गवि, -इन दीज आर्म्स : ऐकलं नाहीये, म्हणून क्षमस्व.
-फ्रायडे आय एम इन लव्ह : ऐकलं नाहीये, म्हणून क्षमस्व.
-बिली जीन : लोकं उगाचच रॉक मध्ये टाकतात.
-ब्लेझ ऑफ ग्लोरी : ऐकलं नाहीये, म्हणून क्षमस्व.

गवि : वाईट वाटलं. आता ऐकाल शोधून?

अबापट : गवि शेठ १.मी परीक्षेत उत्तीर्ण झालो का?
२. लेख लिहिणार, जरा वेळ द्या.थोडे दिवस, कृपया.

अबापट : बिली जीन खूप वेळा ऐकलंय (आमच्या काळाचं ) १९८४ . बाकी ऐकणार, नक्की.
*****************************************************************************************************
गवि : पॉप असं खरंच जॉनर आहे की काहीही लोकप्रिय म्हणजे पॉप?
मला जरा गोडसर मेलडी (मिठास) आणि गोड रिदम यांचं कॉम्बिनेशन म्हणजे पॉप असं वाटायचं.
फार्फार पूर्वी दूरदर्शनवर एक युरोपॉप्स म्हणून कार्यक्रम असायचा. त्यात गोड गायिका गोड बीट्सवर लोलक, मिरर इमेज, प्रतिबिंब आदी (शिवाजी फुलसुंदर फेम) व्हिडिओत गात असायचे.
आठवतं का कोणाला? की मी एकटाच ऑब्सोलीट झालोय?

अबापट : स्वस्त, गॉड गॉड, उथळ आणि लोकप्रिय पॉप.
बाकी युरो पॉप्स, आणि (इंपोर्टेड) टॉप ऑफ द पॉप्स मीही बघितलंय.
मीही ऑबसोलिटच आहे.

गवि : मग ABBA, बोनीएम आणि अन्य जुने मेलडीवाले स्वस्त गोड गोड पॉपमध्ये टाकायचे का? नाही पटत. -
आय हॅव या ड्रीम
आय डू आय डू आय डू
नीना प्रेटी बॅलेरिना
हनी हनी
फर्नांडो
स्टिल आय एम सॅड
बाय द रिवर्स ऑफ बॅबिलोन
नो वुमन नो क्राय
अशी गाणी स्वस्त चीप गोग्गोड पॉप अशात टाकवत नाहीत.

अबापट : हे ते डिस्को हो.

गवि : "हे ते डिस्को हो!"
Hence write the article.
I rest my case.
********************************************************************************************************
३_१४ विक्षिप्त अदिती : अण्णा, तुमचा सिलिन दिआँवर किती का राग असेना, ती आमची न-चिरकी लता मंगेशकर आहे. म्हणजे आवाजात दम आहे, तरुण राहिलेली नसली तरीही आवाज तगडा आहे, शैली आहे; गाण्यांचे शब्द किती का पांचट असेनात - 'रसिक बलमा दिल क्यूं लगाया' - छाप पोंचट!

याउलट आमची जोनी मिचेल. हुकमी गाणं हवं, अशी मागणी आल्यावर 'You turn me on, I am a radio/ I am country station, I am little bit corny' असा डांबरटपणाही करून दाखवते.

अबापट : मी कोण रागावणारा? मला माहीत नाही फार एवढेच म्हणतो. बाकी बबनराव नावडीकर, जी एन जोशी, गजाननराव वाटवे यांच्याबद्दल लिहा ना तुम्ही.
बाकी 'कसा गबाई झाला, कुणी गबाई केला, राधे तुझा सैल अंबाडा' आणि 'फांद्यावरी बांधिले मुलींनी हिंदोळे' वगैरे गाणी फार प्रिय हो.

अश्लील विडंबन करण्यासाठी फार हॉट होती ही गाणी. असो.

अचरटबाबा : अण्णा, तुम्ही एक दोन मिनिटांचं बोलणं रेकॅार्ड करून टेस्ट करा. आवाज लहान मोठा करून दहादहा मिनिटांचे ओडिओ क्लिपमध्ये लेख भराभर देता येतील. त्याचे प्लेअर इथे देता येतील. टाइपिंगचा वेळ वाचेल.

१४टॅन : अचरटबाबा, साधं सरळ सांगायचं तर ब्लुटूथ स्पीकरात सराऊंड साऊंड नाही, किंवा बेस इतका जास्त आहे की ते जाणवत नाही. आजकाल मोनो स्पीकर बनत नाहीत. जुना झाला असेल तरी बराच लॉस होतो ऑडिओ क्वालिटीचा.

३_१४ विक्षिप्त अदिती : बबनराव नावडीकर, जी एन जोशी, गजाननराव वाटवे यांच्याबद्दल लिहायचं तर आधी ते ऐकावं लागेल. एवढे कष्ट कोण घेणार!

अबापट : हेच ते. अमेरिकेत जाऊन आपली संस्कृती विसरणे. मराठी मध्यमवर्गीयांची हीच खरी शोकांतिका आहे.
**********************************************************************************************************
मिहिर : अण्णा, रॉकमध्ये इलेक्ट्रिक गिटार असणे गरजेचे आहे का? सॉफ्ट रॉक म्हणजे नक्की काय? लेननचं इमॅजिन हे रॉक का आहे?

अबापट :: @मिहीर
१. गरजेचं असतं का म्हणजे काय? अगदी घराणेबंद भा शा संगीतातही असं काही गरजेचं (पेटी/सारंगी) वगैरे नसावं, त्यात रॉक हा तर evolve झालेला मुक्त फॉर्म. तर उत्तर असं आहे की इलेक्ट्रिक गिटार ही 'गरजेची' वगैरे नसते, पण सर्वसामान्यपणे असते. डीप पर्पल च्या बऱ्याच गाण्यांमध्ये जॉन लॉर्ड Hammond ऑर्गन वर जे रिफ आणि लीड वाजवतो ते सुद्धा कधी इलेक्ट्रिक गिटार सारखं भासतं. अर्थात जॉन लॉर्ड फारच थोर होता, (ऑर्गन वाजवताना सुध्दा मिन्ड चा आभास निर्माण करू शकते. तर असो
)
२. आमचे प्रातःस्मरणीय जॉन बाबा लेनन यांचं इमॅजिन हे रॉक चं. ( रॉक चा मूळ संबंध फक्त संगीतशैली, वाद्य यापुरता मर्यादित नसून content शी पण संबंधित आहे.)
*****************************************************************************************************8
अबापट : चौदावे, गवि शेठ, मिहीर,पुम्बा,अदिती मालक ( नमः ), आचरट बाबा.
मी काय म्हणतो, आपल्या मस्त गफ्फा चालू झाल्या आहेत या विषयावर. तर अशा गफ्फाच चालू ठेउयात का ? ( आणि मग आदरणीय चिंतातुर जंतू यांना त्याचा धागा बनवायची विनम्र विनंती करूयात ? )
निबंध लिहायचा कि अशा गप्पांचा धागा बनवायचा ?
काय म्हणता मंडळी?

गवि : ठीक आहे. गप्पाही उत्तमच.

रॉकमध्ये काय समान वैशिष्ट्यं असतात / काय पॅटर्न असतो ते सांगून तोंड फोडा (गप्पाना.)

अबापट : प्रथमतः रॉक चे आईबाप कोण त्याबद्दल. पैतृक घराणे म्हणजे रॉक अँड रोल ( साधारणपणे एकोणीसशे पन्नास चे दशक ) आणि मातुल घराणे म्हणजे ब्लूज, ऱ्हिदम अँड ब्लूज आणि कंट्री. यातील पहिल्या तिन्ही जॉनर्स वर आफ्रिकन अमेरिकन संगीताचा प्रभाव.
रॉक चा मूळ स्वभाव आहे प्रस्थापित संगीत , व्यवस्था वगैरे विरुद्ध 'बंड' बंडाची सुरुवात रॉक अँड रोल पासून (यातील मूळचे आदरणीय कलाकार हे गरीब व मुख्यतः आफ्रिकन अमेरिकन ओरिजिनचे. कमी शिकलेले. ग्रामीण. शोषित. नंतर गोरे आले यात ( उदा . एल्विस ) पण तेही ग्रामीण, गरीब. नउच्चभ्रू.

रॉक /रॉक अँड रोल / ब्लूज / आर अँड बी ऐकताना, समजावून घेताना या कलाकारांची / या काळाची सामाजिक पार्श्वभूमी समजावून घेतली तर हे संगीत असे का हे समजायला मदत होते.

मंडळी, ठीक लायनीवर चाललंय काय?

गवि शेठ, आम्हाला इमानांविषयक स्टोर्या हव्यात तुमच्याकडून. देणार ना?

गवि : उत्तम माहिती. धन्यवाद. आता उदाहरणे प्लीज.

"आम्हाला इमानांविषयक स्टोर्या हव्यात तुमच्याकडून. देणार ना?"
लगेच देण्याघेण्याची बोलणी नकोत. आपला भाग पूर्ण करा आधी.

उदाहरणे कृपया.

गवि : कन्ट्रीचा रॉकशी संबंध असेलसे वाटत नव्हते.

अस्सल रॉकची उदाहरणे दिल्यास चित्र स्पष्ट होऊन पुढील शङ्का विचारता येतील. मग रॉकबापटगीता पुढे सुरू राहू शकेल.
"अबापट उवाच"

अबापट : उदाहरणे :-
रॉक अँड रोल चे मुख्य मूळ पुरुष ( माझ्या मते ) चक बेरी. यांची युट्युबवरची गाणी ऐका. इतर काही नाही ऐकलेत तरी निदान 'जॉनी बी गुड' ऐका. ( जमल्यास या गाण्याच्या लाईव्ह व्हर्जन मधला डक वॉक बघा.) भारी आहेत गृहस्थ व त्यांचे संगीत. नंतरचे अनेक रॉक म्युझिशियन्स या गृहस्थांना प्रातःस्मरणीय मानतात. ( सभ्य भाषेत यांच्या संगीताचा प्रभाव बऱ्याच रॉक संगीतकार/गायकांवर आढळतो. )
उर्वरित मूळ पुरुष म्हणजे जेरी ली लुईस , लिटल रिचर्ड, फॅट्स डॉमिनो ( ब्लुबेरी हिल्स ऐकायला विसरू नका, रॉक अँड रोल पण ब्लूज च्या अंगाने, ) बडी हॉली, चबी चकर आणि अर्थातच एल्विस प्रिसली. एल्विस च्या मुळे रॉक अँड रोल सेक्सि आणि मेनस्ट्रीम बनलं ( आणि अमरिकन आयबाप पिढीच्या पोटात मोठा गोळा आणणारं.)
++देण्याघेण्याची बोलणी++
गविशेठ हाणत्यात आज ..

गवि : Fats Domino ही व्यक्ती आम्ही "ऑन द बायो" (Jambalay) या गाण्यासाठी फार पूर्वीपासून जाणून आहोत. पण ते रॉक आहे हे आज कळले.

ऑन द बायोच्या व्हर्शनस खूप दिग्गजांनी बनवल्या आहेत. त्यातल्या अनेक फॅट्स डोमिनोपेक्षा उत्तम आहेत.
क्लिफ रिचर्ड्स कशात बसतो मग?

अबापट : गवि शेठ, मी फॅट्स डॉमिनो चं ब्लु बेरी हिल्स म्हणालो आणि ते आहे रॉक अँड रोल ( ब्लुज च्या अंगाने) रॉक नव्हे. Jambalay ऐकून खुप दशके झाली. परत ऐकून बघायला पाहिजे.
बाकी अण्णा चितळकर सोडले तर हिंदीत कुणाला रॉक अँड रोल झेपला नाही. थोडा आर डी ला. शंकर जयकिशन ने तर रॉक अँड रोल बीट चा पार खेमटा करून टाकला , वजन बदलून पार धिं ता ता धिं ता (मस्त बहारो का मै आशीक छाप) हाणायला पाहिजे. बाकी जण हितार्थ माहिती : शुभा मुद्गल च्या अब के सावन ला चांगला रॉक अँड रोल बीट आहे. शुद्ध.
बाकी मेरा नाम चीन चीन चू मध्ये गिटार इन्ट्रो हा खरा रॉक अँड रोल च्या बीट मधील बेस गिटार चा रिफ आहे. (वेगळा पीस म्हणून इथे वाजवलाय पण मूळ आर अँड आर मध्ये कायम मागे चालू असतो, बेस गिटार वर.)
फार गुतडा होतोय का मंडळी?
अबापट : गवि शेठ, अस्सल रॉक ची उदाहरणे मी धाग्यात आणि खरडफळ्या वर टाकली होती त्यात आहेत. न सापडल्यास परत देईन.
अचरटबाबा :
ट्राइअल :
John Lenon
Empty Chair
6 MB
Link:http://jmp.sh/MxCiNpc
फक्त ओडिओ.

अबापट : आचरट बाबा, त्या पेक्षा जॉन लेनन च इमॅजिन किंवा रिव्होल्यूशन ( बीटल्स मध्ये असतानाचं ) ते घ्या.
अचरटबाबा : गाण्याच्या सिलेक्शनबद्दल सांपल दिलं नाही. त्या लिंकमधून १) गाणं वाजतं का, २) डाउनलोड करता येतं का, लॅागिन न करता, ३) क्वालटी कशी आहे हे पाहायचं आहे.
* mp3 असल्याने फोन स्क्रीन लॅाककरून गाणं ऐकता येतं तसं व्हिडिओतलं करता येत नाही.
*********************************************************************************************************

अबापट : जरा थोडं तात्पुरतं डायव्हर्जन घेतोय .
मिहीर ने विचारलं कि लेनन च इमॅजिन 'रॉक 'का म्हणावं.
बऱ्याच वेळा असा गैरसमज असतो की रॉक म्हणजे इलेकट्रीक गिटार पाहिजेच, किंवा ज्यामध्ये distortion गिटार नाहीये त्याला रॉक कसं म्हणावं? हे बहुतांशी खरे, की रॉक मध्ये इलेट्रीक गिटार असते आणि नंतरच्या हार्ड रॉक मध्ये distortion गिटार असतेच असते. धनाधन ४ x ४ बीट , इलेक्ट्रिक आणि distortion गिटार, मोठा आवाज, फुल थ्रोटेड गाणं म्हणजे रॉक वगैरे. पण हि काही प्रीरीक्वीसीट नाही. इमॅजिन हे इलेक्ट्रिक आणि बेस गिटार च्या साथीनं म्हणता येतंच, पण या गाण्यात 'संदेश 'महत्वाचा असल्याने इलेक्ट्रिक आणि बेस गिटार हे सायलेंट आहे ( हे बहुधा विचारपूर्वक करण्यात आलं होतं. )
हे गाणं रॉकच आहे ( थोडं सोल, आर अँड बी च्या अंगानं म्हणलेलं. )

गवि शेठनी विचारलं की अस्सल रॉक म्हणजे कुठली गाणी, तर माझ्या मते हि घ्या :
१. स्टेअरवे टू हेवन, २. फ्री बर्ड, ३. स्वीट होम अलाबामा,४. हॉटेल कॅलिफोर्निया,५. बोहेमिअन र्हाप्सोडी, ६. सलटन्स ऑफ स्विंग ( हि ओरिजिनल पेक्षा अनेक लाईव्ह परफॉर्मन्सेस मधील एक्सटेंडेड व्हर्जनच ऐकणे . यु ट्यूब वर आहेत सर्व)७. स्मोक ऑन द वॉटर,८. हायवे टू हेल,९. वि विल रॉक यु,१०. अनादर ब्रिक इन द वॉल,११. माय स्वीट लॉर्ड,१२. इमॅजिन,१३. बॉर्न टू रन,१४. ब्रिज ओव्हर ट्रबलड वॉटर्स, १५. पॅरानॉईड,१६. ले डाऊन सॅली,१७. कोकेन,१८. टॅंगल्ड अप इन ब्लू,१९. आयर्न मॅन,२०. अमेरिकन पाय,२१. हायवे स्टार.
आता यात बघितलत तर बऱ्याच गाण्यांमध्ये distortion गिटार नाहीये ,(४, ६, ११,१२,१६,१८,२० वगैरे ) काही गाणी स्लो टेम्पो वाली आहेत (४,१०,११,१२,१८ वगैरे )
पण आहेत अस्सल रॉक . ...........................

मंडळी, ट्रॅक चालू राहू देत का बदलायचा ते सांगा .
********************************************************************************************************************

अबापट : आदरणीय चिंतातुर जंतू जी ,
माझे लिहिणे हे खडबडीत असते, जास्त करून गप्पा मारल्यासारखे. ते वाचनीय करण्याकरिता संपादकीय संस्कारांची गरज असते. आपण या पामराला असे झिडकारून लावू नका. (देशाकरता ) या वर संपादकीय संस्कार करून वाचनीय बनवा आणि धाग्यात टाका, सगळं झाल्यावर अशी विनम्र विनंती.

गवि : हॉटेल कॅलिफोर्निया आणि अमेरिकन पाय हे रॉक असतील असं वाटलं नव्हतं.

अबापट : हॉटेल कॅलिफोर्निया अस्सल रॉक. (म्हणूनच रॉक बद्दलचे गैरसमज मगाचच्या डायव्हर्जन मध्ये थोडे सांगितले ) अमेरिकन पाय जास्त रॉकच पण रॉक अँड रोल चा प्रभाव जास्त.

अबापट : रॉक जॉनर च्या बऱ्याच गाण्यांमध्ये बरीच गुंतागुंत आढळते. उदाहरणार्थ बोहेमिअन र्हाप्सोडी ज्यात बॅलड आहे, क्वासी ऑपेरा आहे आणि अस्सल क्लासिक रॉक पण आहे. ( फ्रेडी नमः, काय आवाज काय आवाज, आणि (डॉ ) ब्रायन मे नमः, काय गिटार काय गिटार. )
इगल्स च्या संगीतावर मूलतः कंट्री / फोक रॉक चा प्रभाव असल्याने त्यांची स्टाईल वेगळी वाटते पण हॉटेल कॅलिफोर्निया आहे अस्सल क्लासिक रॉक.

चिंतातुर जंतू : "माझे लिहिणे हे खडबडीत असते, जास्त करून गप्पा मारल्यासारखे."

बापट ह्यातच तुमचा चार्म आहे, असा ‘ह्या’ संपादकाचा दावा आहे. तद्वत, नो संपादकीय संस्कार. काय म्हणता, इतर मंडळी?

३_१४ विक्षिप्त अदिती : "बापट ह्यातच तुमचा चार्म आहे, असा ह्या संपादकाचा दावा आहे."
... असा स्ट्रेंज* संपादकीय दावा आहे.
मात्र जंतूला संपादकीय पाठिंबा देण्याशिवाय मला पर्याय नाही. तेव्हा लगे रहो अण्णा.
*या भौतिकशास्त्रीय विनोदाबद्दल मंडळ दिलगीर आहे.
**************************************************************************************************************
१४टॅन : अबापट ह्यांनी विड्या न ओढता शिग्रेटी, किंवा आजकाल मिळणारा हुच्चभ्रू पालापाचोळा ओढल्यास ते बरीच वर्षं झकास लिहू शकतील आणि आपली मतं बिन्दास ठोकायचं बैडैस्य त्यांच्यात येईल असं माझं मत आहे.
(त्यांनी लौकरात लौकर संगीत दगडी खारडफळ लिहायला घ्यावं ही आग्रहाची विनंती. त्यात त्यांनी प्रत्येक गाण्यांबद्दल सोताला काय वाट्टं हे विशेष आकर्षणही ल्ह्यावं हा तर हट्टच आहे माझ्याकडून. त्यांच्यानंतर मीही धातूसंगीताबद्दल लिहेन. )

मिहिर : अण्णा स्ट्रेंज डी मेझॉन आहेत हे माहीत नव्हतं. हाबिणंदन!

अबापट ; मिहीर नक्की कोणत्या श्या देत आहे ते या गरीब, फडतूस, अज्ञानी इसमाला कुणी समजावून सांगेल काय?

अबापट : मिहीर, तुला अदिती (नमः) ने दम दिला की आदरणीय जंतूंनी? की तू धाग्यातच च शंका विचारीन अशी धमकी देतोहेस?

मिहिर : श्या नाय हो. चार्म आणि स्ट्रेंज हे क्वार्क असणारा कण म्हणजे स्ट्रेंज डी मेझॉन, जो तुम्ही आहात असं संपादकमंडळ अप्रत्यक्षपणे म्हणतंय बहुतेक.

३_१४ विक्षिप्त अदिती : बैडैस्य :- Wink
अण्णा, क्वार्क नामक बारके कण जोड्यांमध्ये नांदतात. तीन क्वार्क मिळून एक प्रोटॉन बनतो, एका न्यूट्रॉनातही तीन क्वार्क असतात. दोन अप+एक डाऊन आणि दोन डाऊन+एक अप; कुठलं काय ते तपशील आता विसरले. क्वार्कांची नावं अप आणि डाऊन. तर अशा तीन जोड्या आहेत. त्यांतली एक जोडी स्ट्रेंज आणि चार्म. त्याचे बाकीचे तपशील मला अजिबातच आठवत नाहीत. पण कोणीही स्ट्रेंज आणि चार्म यांपैकी एक शब्द वापरला की आपण लगेच दुसरा शब्द वाक्यात वापरला नाही तर आपल्या भौतिकशास्त्र-शिक्षणावर शंका घेतील अशी भीती मला वाटते.

आता लिहिल्यावर या तपशिलांबद्दलही मला शंका येत्ये. गूगलायला वेळ नाहीये. चूक असेल तर सुधारायला मिहिर आहेच. किंवा नंदनचे अमुकदादा येतील. पण स्ट्रेंज-चार्म हा विनोद ठरावीक वर्तुळांत घालून घालून सैल झालाय.

******************************************************************************************************************

अबापट : तर मंडळी जेहेंत्ते काळाचे ठायी अमेरिकेत एकोणीसशे पन्नास चे दशक उजाडले. भरभराट होती. आबादीआबाद होती युद्ध जिंकलं होत. धर्मप्रेमी, वर्णप्रेमी,देशप्रेमी अशा प्रस्थापित समाजाला एकंदरीत अच्छे दिन होते. सगळं एकंदरीत अभिमानास्पद होतं.
मायला पण काही भालगडी हुत्या . एक तर हे असलं कष्टकरी वर्णाभिमानी, देशाभिमानी वे ऑफ लाईफ ला सगळी नव्या पिढीच्या गळी काही उतरत नव्हतं आणि दुसरं म्हणजे साले ते काळे .. दक्षिणेतल्या खेड्यांमधून नको इतक्या संख्येने आपापली भाषा, संस्कृती, आकांक्षा आणि संगीत घेऊन शहरांमध्ये येऊ लागले होते. तरी बरं या साल्या गुलामांच्या अवलादीला सगळ्या राज्यांमध्ये समान अधिकार नव्हते. ( नवंस्वतंत्र झालेल्या भारत नावाच्या फडतुसांच्या देशात मात्र सगळ्या नागरिकांना कायद्याने समान अधिकार मिळाले होते )- - आणि महाराजा तेव्हापर्यंत दहापाच वर्ष बिंग कॉसबी, फ्रॅंक सिनात्रा , डीन मार्टिन अशा तिकडच्या बाबुजीज, अरुण दातेजीज आणि वाटवेंजीस यांची ग्वाड ग्वाड भावगीतं, एला फिटजेराल्ड, लुई आर्मस्ट्राँग सारखे जॅझवाले, काही कंट्री आणि एकंदरीत तद्दन पॉप वाले यांचं राज्य होतं.
मधल्या काळात इलेक्ट्रिक गिटार आली, त्याचा ऍम्प्लिफायर आला, डबल बेस सारखं धूड जाऊन त्याच काम बेस गिटार वर भागू लागलं आणि एकंदरीत वाद्य सुटसुटीत होऊ लागली.

:तर अशा या शांत श्रीमंत आणि सुस्त सांगीतिक वातावरणात अवतरले एनर्जेटिक, नाचण्याकरिता सुयोग्य ठेका असणारे, आईवडिलांच्या पिढीला फाट्यावर मारणारे, ऍम्प्लिफायर मुळे मोठ्या आवाजात वाजू शकणारे, बंड करणारे रॉक अँड रोल ... यात काळे गोरे सगळे कलाकार होते चक बेरी, बिल हेली , एल्विस प्रिसली. ( शम्मी कपूर च्या एकंदरीत हावभाव, नाचण्याची स्टाईल यावरचा एल्विस चा प्रभाव स्पष्ट दिसतो ) भारतभूषण च्या पिढीला शम्मीकपूर आल्यावर जो धक्का बसला असेल तसंच काहीसं .. फक्त खूप मोठ्या प्रमाणावर ...
*************************************************************************************************************************
गवि :
https://www.youtube.com/watch?v=mGgMZpGYiy8
हे कोणत्या प्रकारात बसतं?

अबापट : ऐकलं नव्हतं हे कधी. टिपिकल लेट एटीज अर्ली नाईंटीज पॉप चा साऊंड वाटतोय. ( आणि मेकप सुद्धा. ) हे पॉप मध्ये टाकावं असं वाटतंय.

१४टॅन : अण्णा, तरीही समाधान नाही झालंय. म्हंजे, रॉक अजूनी वेल डिफाईन्ड वाटत नाही. कविता बंडखोर पाहिजे, चाल चटपटीतच पाहिजे का, आणि इलेक्ट्रीक गिटार आवश्यक आहेच का?
ह्यातल्या कविता प्रांतातलं थोडं कळतं म्हणून- तू ऐल राधा तू पैल संध्या, दिवस तुझे हे फुलायचे अशा पार्श्वभूमीवर; आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदेपोहे हे रॉक का? की शिक्षणाच्या आयचा घो/'पर जलानेको फिरंग है यहाँ और बुझानेको गांधी' हे?
स्मेल्स लाईक टीन स्पिरीट, स्वीट चाईल्ड, हेल्स बेल्स वगैरे गाण्यांच्या चाली फक्त हेडबँग करणेबल आहेत, नाच वगैरे हास्यास्पद दिसेल.

अबापट : चौदावे,
++समाधान नाही झालंय.++
हे असंच चांगलं असतंय.
आता मला उमजलेले उत्तरे - -
१. ++रॉक अजूनी वेल डिफाईन्ड वाटत नाही++
चालतंय की !! अहो चौदावे, रॉक हा आपाप १९५०-६० पासून आजपर्यंत इव्हॉल्व्ह होत गेलेला फॉर्म आहे, तो काही भा शा किंवा पा शा संगीतासारखा घट्ट बांधलेला प्रकार नाही.
२. कविता बंडखोर पाहिजे,
कविताविषय शक्यतो बंडखोर प्रवृत्तीचा पाहिजे. कविता साधी असेल तरी चालेल
३. चाल चटपटीतच पाहिजे का
असली तर चालतंय, पण नसली तरीही चालतंय.
४. इलेक्ट्रीक गिटार आवश्यक आहेच का?
नाही. उदाहरण इमॅजिन ( वरच्या २, ३ आणि ४ ला हेच गाण्याचे उदाहरण.)
५. आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदेपोहे हे रॉक का?
इथे संदर्भ मराठीचा आहे, ज्यात ( तीन पैशांचा तमाशा सोडला तर ) रॉक चा अभाव. यात कविता अज्याबात रॉक नाही पण साऊंड, गिटार आणि चाल आणि दम रॉक. असं बघा याला रॉक म्हणणं म्हणजे थोडंसं गरिबांचा अमिताभ बच्चन अंकुश चौधरी सारखा प्रकार आहे. पण तेवढेच ज्ञानप्रकाशात.
६. हेड बँगिंग आहे हे ठीक पण आपल्याला थोडी भरतनाट्यम करायचंय.

थोडक्यात म्हणजे चिप चिप ग्वाड ग्वाड नसणे, (शक्यतो काहीतरी बंड ), अत्यंत चांगली आणि जोमदार गिटार ( म्हणजे फक्त distortion गिटार नाही ... हॉटेल कॅलिफोर्निया, Sultans ऑफ स्विंग, माय स्वीट लॉर्ड, कुठे आहे यात distortion ) फुल थ्रोटेड दमदार vocals, जमल्यास काहीतरी अँटी एस्टॅब्लिशमेंट, हा सगळं मसाला एकत्र आणा, थोडंफार रॉक होईलच ते ...
साचेबंदपणा हि प्री रिक्विसीट नाही.
अजून बरंच आहे बोलण्यासारखं, पण त्याकरता भेटा एकदा ...
वर लिहिलेल्या सगळ्यांना अपवाद आहेतच, पण तरीही.
अर्थात १९८० च्या शेवटी, नव्वदीच्या आधी रॉक मेनस्ट्रीम झाल्यावर केवळ पोषाखी आणि उथळ रॉक झालंच की कितीतरी ..

एक गम्मत. जॉन लेनन ला धर्मविरोधी बिनधास्त बोलतो म्हणून कॉमी लेबल लागू लागले, पण कॉमी लोकांचा हलकटपणा बघितल्यावर त्याने Revolution *लिहिले आणि गेले ( ज्यात त्याने कॉमींची ठासली ) किंवा जॉर्ज हॅरिसन च्या नादाला लागून महेश योगींच्या आश्रमात आला अक्रोस द युनिव्हर्स सारखी अनेक उत्तम गाणी लिहिली, पण महेश योग्याचा भोंदूपणा दिसल्यावर तडक त्यावर कठोर टीका करणारं सेक्सि सेडी लिहिलं आणि मोकळा झाला. याला म्हणतात वैचारिक रॉक, जो है सो है. असा बिनधास्तपणा, मग कमी असोत कि अध्यात्मिक बाबे असोत कि निक्सन किसिंजर असोत.

*Revolution जरूर ऐका लिरिक्स करता आणि Distortion गिटार करता.

अजूनही आहे ... विविधता , आर्टिस्ट्स ची, काळे, गोरे, सदर्न गावंढे, फोक, ब्लूज, कंट्री, कामगार, फडतूस, गंजाडी, वैचारिक, पर्यावरणवादी, ब्रिटिश ... आणि अजून ...
गृहपाठ : या सर्व कॅटॅगरीतील एकेक उदाहरणे सांगा.
अप योर्स हा Attitude महत्वाचा.
*****************************************************************************************************
गवि : जॉन बॉन जोवी (बॉन जोवी बँड नाव) जनरली रॉक गाणी बनवायचा का?
खालील बर्याच लक्षणात बसतात गाणी.
बेफिकीर, गॅम्बल टाईप लाईफस्टाइल, खणखणीत गिटार, मोकळा मुक्त कंठाने ओरडणारा आवाज.- - -

अबापट : जॉन बॉन जोव्ही ... रॉक ...

गवि.: बॉन जोव्हीच्या गाण्यांपैकी फेवरीट्स:
-Bad medicine
-In these arms
-Livin on a prayer
-Keep the faith
-I'll sleep when I'm dead
-Bed of roses
-Blaze of glory

गवि :
खेरीज Wanted dead or alive, यातला सुरुवातीचा गिटार तुकडा कसा जमवलाय कोण जाणे.
गवि :
https://www.youtube.com/watch?v=MfmYCM4CS8o
गवि :
https://www.youtube.com/watch?v=SRvCvsRp5ho
*********************************************************************************************************

गवि : आतापर्यंत जमा झालेल्या तुटक माहितीकणांपैकी काही :-

१. गाण्यात रॉक हा शब्द असणे म्हणजे उलट रॉक असण्याची शक्यता कमी आणि रोक्केंड्रॉल, पॉप वगैरेची शक्यता जास्त.

२. रिट्रो म्हणून सांद्रमंदिर रेस्टोमध्ये जे लावतात / गातात ते बहुतांशी डिस्को असतं. (Abba, बोनीएम, व्हॅम, जॉ.मा., मॉडर्न टॉकिंग, बाल्टीमोरा, स्मोकी, जॉर्ज बेनसन, Glenn Medeiros, व्हिलेज पीपल)

आता डिस्को म्हणवत नाहीत अशा जुन्या सेटपैकी (आमचं सगळं जुनं).. बिली जोएल, क्लिफ रिचर्ड्स, रॉड स्टिव्हर्ट, आर ई एम, गन्स अँड रोजेस, INXS, ख्रिस आयझॅक, ब्रायन अॅडम्स) असे असंख्य कशात बसवायचे?

मुख्य म्हणजे मा.जॅ.साहेब आणि मडोनाजी कशात येतात? आम्ही आजपावेतो पॉपमध्ये धरले (अंदाजानेच).
अबापट : गवि शेठ जोरात आलेत ... मस्त ..
लिस्ट मधील गाणी जोरदार आहेत ...
१. माझी जॉन बॉन जोवी ची फेव्हरिट गाणी .
आमच्या काळचं--- यू गिव्ह लव्ह अ बॅड नेम .. ८५ -८६ च्या आसपास चं असेल.
https://www.youtube.com/watch?v= KrZHPOeOxQQ
https://www.youtube.com/watch?v=vx2u5uUu3DE

२. Wanted dead or alive, यातला सुरुवातीचा गिटार तुकडा कसा जमवलाय
हा प्रश्न नीट कळला नाही. असं तुम्ही का म्हणताय? हा तुकडा वाजवायला फार कॉम्प्लेक्स नाहीये. (का मी वेगळंच काही ऐकतोय? )
३. यातील गिटार ऐकलीत तर तुम्हाला कंट्री चा इन्फ्लुएन्स, निदान गिटार वर तरी नक्की जाणवेल ..
४. बिली जोएल, क्लिफ रिचर्ड्स, रॉड स्टिव्हर्ट : पॉप.
५. गन्स अँड रोजेस : अहो रॉक , हेवी मेटल ( चौदावा नाराज होणार तुमच्यावर ... मेटल ला पॉप म्हणाल्यामुळे. )
६. ब्रायन अॅडम्स : पॉप आणि रॉक दोन्ही ..
७. मा.जॅ.साहेब आणि मडोनाजी : मुख्यतः पॉप , पण एमजे ने काही रॉक केलंय आणि मॅडोना जींनी काही लॅटिनो केलंय.
आणि वर्च्यांपैकी कुणीही फारसं डिस्को केलं नाहीये. तुम्ही दिलेल्या लिस्टीत अजून डिस्को ऍड करायचं असेल तर बिजीज बघा ( सॅटर्डे नाईट फिव्हर, ग्रीज छाप. )

१४टॅन :

https://youtu.be/w1zo9HbJmWA
हे पहा नबा.
(व्याख्येनुसार दगडी नाही, पण ऐकाच.)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

पाषाणह्रुदयींच्या शंका संपल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रॉक मधील झाकोळलेले परकशन
गॅप नंतर गेले द्यायचे राहून ते देऊन टाकतो .
बऱ्याच वेळा उच्च गिटारवादनकौशल्य आणि व्होकल्स च्या पुढे परकशन वाद्य झाकोळली जातात .ड्रम्स आणि बेस गिटार ... निदान रॉक मध्ये तरी हे दोनीही जरूर ऐकावे , अचंबित करणारे कौशल्य दिसते कधी.

Led Zeppelin या सत्तरीतील लोकप्रिय रॉक ग्रुप लीड गिटारिस्ट जिमी पेज आणि गायक रॉबर्ट प्लांट यांच्याबद्दल बरेच लिहिलं बोललं गेलं /जातं , पण या बँड ची एक विशिष्ट ओळख होण्यामागे जॉन बोनम वेगळ्या पद्धतींनी वाजवलेले ड्रम्स हेही एक महत्वाचे कारण होते . उदाहरणार्थ याच ग्रुप चे सर्वात प्रसिद्ध स्टेअर वे टू हेवन यातील मध्य भाग ऐका .. बोनम चक्क तबल्याच्या अंगानी ड्रम्स वाजवतो हे जाणवतं ( म्हणजे नुसतं ४ X ४ बेस वाजवायच्या ऐवजी त्याजागी छोट्या ट्रीप्लेट्स घेऊन समेवर येणं )

दुसरे असेच तबल्याच्या अंगानी वाजवलेल्या ड्रम्सचे उदाहरण म्हणजे डायर स्ट्रेट्स च सलटन्स ऑफ स्विंग (अल्केमी ) यातील शेवटची गिटार आणि ड्रम्स ची जोरदार जुगलबंदी ऐका , चक्क असा भास होतो कि ड्रमर तबल्याच्या अंगानी ड्रम्स वाजवतोय ( तबल्यासारख्या हरकती घेत )अगदी तबल्याचे बोल सुद्धा लिहिता येतात यातील ... ड्रमर टेरी विल्यम्स

क्वीन च अंडर प्रेशर , ( ज्याच्या वर नंतर बेतलेलं आईस आईस बेबी किंवा आपल्या गरीब बाबा सहगल चं ठंडा ठंडा पाणी ) ज्यात सगळ्यात लक्षात राहणारा भाग म्हणजे बेस गिटार वरची रिफ बाय जॉन डिकन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

jabaraa..
फार आवडले..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अण्णा, जॉन बोनहॅम तबल्याच्या अंगाने वाजवतो म्हणण्यापेक्षा तो नुसता ठेका न धरता गिटारीच्या अंगाने वाजवत जातो म्हणणे जास्त अचूक ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

चर्चा धागास्वरूपात आली हे छान. आता पुढचे प्रश्न विचारतो.

दुसरे असेच तबल्याच्या अंगानी वाजवलेल्या ड्रम्सचे उदाहरण म्हणजे डायर स्ट्रेट्स च सलटन्स ऑफ स्विंग (अल्केमी ) यातील शेवटची गिटार आणि ड्रम्स ची जोरदार जुगलबंदी ऐका , चक्क असा भास होतो कि ड्रमर तबल्याच्या अंगानी ड्रम्स वाजवतोय ( तबल्यासारख्या हरकती घेत )अगदी तबल्याचे बोल सुद्धा लिहिता येतात यातील ... ड्रमर टेरी विल्यम्स

म्हणजे नक्की काय? एखादं विशिष्ट उदाहरण देता का? इंग्रजी संगीतातल्या ड्रमवादनाकडे माझे तितके लक्ष जात नाही.
..
बीटल्सची कोणती गाणी रॉक म्हणता येतील? तुम्ही म्हणताय त्यानुसार सुरुवातीच्या काळातील प्रेमगीते (I want to hold your hand इ.) रॉक म्हणता येणार नाहीत असे वाटते, बरोबर?
While my guitar gently weeps, Come together, Here comes the sun ही?
जॉन लेननचं Watching the wheels हे? लेननची Jealous guy, Oh Yoko, Real love ही? रॉक नसतील तर कुठला जॉन्र? "तद्दन पॉप"? Blum 3
वर उल्लेख दिसला नाही म्हणून, पिंक फ्लॉइड?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिहीरशेठ ,
१. ++म्हणजे नक्की काय? एखादं विशिष्ट उदाहरण देता का? इंग्रजी संगीतातल्या ड्रमवादनाकडे माझे तितके लक्ष जात नाही.++

दोन उदाहरणे म्हणूनच वर दिलेली आहेत. आपण जर तबला किंवा कुठले इतर तालवाद्य शिकला असाल तर मी काय म्हणतो त्याची प्रचिती कदाचित येऊ शकेल .हे नसल्यास आपल्या पुढच्या भारत भेटीत आपण पुण्यात एखादा दिवस या विषयाकरिता टेकलात तर हि गाणी ऐकून आपण यावर चर्चा करू शकतो

म्युझिक विडिओ चा जमाना आल्यावर ( जो रॉक च्या पाठोपाठ आलाच ) रॉक मधील उर्वरित चित्तचक्षुचमत्कारीत गोष्टींकडे सहज लक्ष वेधले जाते . गिटार आणि व्होकलसकडे लक्ष जास्त जाणे हे नैसर्गिक असते . जरी ड्रम्स आणि बेस गिटार हे 'रॉक' च्या साउंड मध्ये अत्यंत महत्वाचे असले तरी व्हिजुअली ते लीड गिटार किंवा व्होकॅल्स सारखे 'सेक्सि 'नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते.
याकडे लक्ष वेधणे आणि त्यातील सौंदर्य दाखवणे हा मूळ उद्देश या पोस्टीचा .

२. Here comes the sun हे नक्की रॉक नाही आणि While my guitar gently weeps, Come together हे रॉक ( यात ब्लूज चा अंश जास्त )

३. पिंक फ्लॉइड हा खणखणीत रॉक बँडच. यांचं नाव आणि गाणी रॉकच्या मोठ्या नावांमध्ये यायला पाहिजेतच परंतु मी दिलेली लिस्ट हा माझा प्रेफरन्स ज्यात यांचा नंबर थोडा खाली येतो एवढेच . ( माझ्या लिस्ट मधील गाणी हि पिंक फ्लॉइडच्या गाण्यांपेक्षा मला जास्त आवडतात एवढेच )

++रॉक म्हणता येणार नाहीत असे वाटते, बरोबर?++
होय हे बरोबर . बीटल्स च्या उत्तर काळात जास्त रॉक केली त्यांनी
नंतर टाकतो त्यांची रॉक ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१०० हर्टझच्या कमी फ्रिक्वन्सीला वाजवणाय्रा (सोनी/फिलिप्समध्ये ३६हर्टझ असलेली) म्यु सिस्टम पाहिल्याचे आठवते. ढग्गासाठी ती लागते. आता १०० ह सर्वात कमी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापट, एरिक क्लॅप्टनविषयी काही मत? मी 'टिअर्स इन हेवन'बद्दल नाही, तर 'यार्डबर्ड्स' आणि 'द क्रीम'बद्दल बोलतोय.
लुईज (१९६४)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मत काय हो ? भारीच आहे की तो !!! म्हणजे त्याची गिटार.
'टिअर्स इन हेवन'बद्दल नाही.. का नाही ? आवडलं नाही तुम्हाला की वैयक्तिक दुःखाचे बाजारीकरण केल्याला तुमचा विरोध आहे ?
क्रिम आणि यार्डबर्ड्स फार तुरळक ऐकले आहेत म्हणून त्याविषयी काही मत नाही.
तुम्ही लिहा कि त्याच्याबद्दल !!!
बाकी जॉर्ज हॅरिसनच्या व्हाईल माय गिटार जेटली वीप्स मधील याने वाजवलेली गिटार खरंच रडते असे आपले वैयक्तिक ( उथळ ) मत.
कोकेन आणि ले डाऊन Sally, रायडींग विथ द किंग आवडतात , त्याच्या थोर गाण्यांच्या लिस्टीत नसूनही.
तो बरीच वर्षे भरवत असलेल्या "क्रॉस रोड्स "म्युझिक फेस्टिवल थोर .यु ट्यूबवर आहेत बरीचशी रेकॉर्डिंग्स . ब्लूज , कंट्री , रॉक , रॉक अँड रोल , ब्लुग्रास मधील लहान थोर मोठी मोठी मंडळी स्टेजवर गिटार चा दंगा , ऐश करताना ऐकताना लय मजा येते .
खरोखर श्रवणीय , वारंवार .
आता वैयक्तिक गॉसिप : स्वतःच्या अतिजवळच्या मित्राच्या बायकोशी लग्न करून , त्या मित्राशी तो जिवंत असेपर्यंत तशीच मैत्री टिकवणं कस्काय जमवतात लोकं ?

ती प्रसिद्ध ग्राफिटी "क्लॅप्टन इज गॉड " विसरलात काय ? ( डकवणार का इथे ? )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Clapton is God
धागा रॉकबद्दल आहे, पण 'टिअर्स इन हेवन' त्यात बसतं का? क्रीम आणि यार्डबर्ड्स ऐकलं नसेल तर ऐका. बीटल्सला समकालीन, पण संगीत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्वतःच्या अतिजवळच्या मित्राच्या बायकोशी लग्न करून , त्या मित्राशी तो जिवंत असेपर्यंत तशीच मैत्री टिकवणं कस्काय जमवतात लोकं ?

तुम्ही १९६८च्या लैंगिक क्रांतीकडे एखाद्या ममव प्राण्यासारखे दुर्लक्ष करताय! अनेक माणसं अनेक माणसांसोबत लैंगिक संबंध ठेवत. शिवाय, ड्रग्ज किंवा दारूच्या अमलाखाली अनेक गोष्टी होत असत. स्वतः जॉर्ज हॅरिसन पॅटी बॉइडशी विवाहित असताना त्याचे काय कमी लोकांशी संबंध होते? आणि एकदा ते विभक्त झाल्यानंतर तिनं काहीही केलं तरी काय फरक पडतो? आपण तिच्यासाठी लिहिलेलं लेला ऐकू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माहीत आहे हो ,पण मुख्य आश्चर्य , तरीही मैत्री टिकण्याबद्दल आहे . आणि ममव तर आहेच मी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

++त्यात बसतं का++
मी मूळ प्रश्न विधानातील कर्ता क्लॅप्टन मानला , तुम्ही रॉक मानलात .
तर तांत्रिक मुद्द्यावर तुमचं बरोबर आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याला बिस्मिल्ला खानची सनई आवडे आणि आपली गिटार सनईसारखी आणि ब्लूजमधल्या हार्मोनिकासारखी वाजवता यावी ही त्याची आकांक्षा होती हे माहीत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नाही , माहित नव्हते . रोचक आहे हे . सनईची सुरावट स्लाईड गिटारवर काढणे असाध्य नसावे . अर्थात बिस्मिल्लाह खान यांच्यासारखे वाजवणे सनईवर कठीण , तर स्लाईड गिटारवर ... म्हणून असेल .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या प्रिय गाण्यांच्या लिस्टवर जास्त लिखाण झाले . आज जंतूंच्या प्रश्नामुळे हे प्रकर्षाने जाणवले . इतरही अनेक थोर रॉक आर्टिस्ट आहेत . त्यांच्यावर जंतू , चि . चौदावे ( स्पेलिंग बरोबर आहे इथे ) , चि . मिहीर किंवा इतर कुणी यांनी काही लिहावे अशी नम्र विनंती .
अमुकराव कुठे आहेत सध्या ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही गाण्यांबद्दल विकिपीडियावर वाचल्यावर रॉकमध्येही प्रकार असल्याचे दिसले. पंक रॉक, आल्टरनेटिव्ह रॉक, इंडी रॉक इ. हे नक्की काय प्रकार आहेत, यांची वैशिष्ट्ये काय? हे खरेच रॉक आहेत की रॉकचे नाव ढापून काहीही खपवतात? पुरोगामी रॉक नावाचाही एक प्रकार असल्याचे कळते. ऐसीवर भरपूर पापिलवार होईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अल्टरनेटिव्हबद्दल मी खरडतो नंतर. पहिले माझ्या आवडत्या धातू गाण्यांबद्दल लिहीणारे.
(महामहिम अबापट ह्यांनी नोंद घ्यावी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

ऐसीवर भरपूर पापिलवार होईल!

का? माईकचा अनैसर्गिक वापर वगैरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

++पंक रॉक, आल्टरनेटिव्ह रॉक, इंडी रॉक++
आता १४ टॅन लिहिणार म्हणाले आहेत ना, मग बघूया वाट .( जोपर्यंत ते लिहीत नाहीत तोपर्यंत हे वाक्य ... वाट बघा !! असे वाचावे ) बाकी विकी वाचत आहातच आपण . या दोन्ही पलीकडे लिहिण्यासारखं माझ्याकडे काही नाही .
( आपला क्लासिक रॉक वाला ) बापट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे घ्या पुण्यातील माजी रॉक बँडच्या परवा झालेल्या शो तील एक व्हिडो . चौदावे ... बगा आमचे मित्र ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश याबद्दलचा लेख ' सर्वांगीण संगीतकोश' लेख आला आहे कालच्या ( रविवार २९ जुलै) मटा०'त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीबद्दल आभार.
उत्सुकांसाठी हा दुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर जे काय चर्चा-परिसंवाद-भाषण-मुलाखत झालेलं आहे ते फार भारी झालेलं आहे. चारपाच लोकांनी हे जर बसून वाचलं तर झक्कास श्रुतिका होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झक्कास श्रुतिका होईल.

काय मस्तं टोमणा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चेष्टा नव्हती. खाली आदूबाळने म्हटल्याप्रमाणे गाणी प्रत्यक्ष वाजवून दाखवता येतील. वाचताना ती स्वतः वाजवून बघावी लागतात, आणि लिंक तुटते. गप्पा मारणारांनी किंवा लेक् डेम करणारांनी ती वाजवून दाखवली तर तिथल्या तिथे त्यातले बारकावे सांगता येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>वाचताना ती स्वतः वाजवून बघावी लागतात, आणि लिंक तुटते. >>

आपण फोटो काढतो नंतर एक अॅप वापरून ते जोडतो. जोडताना फेड आउट/फेड इन वापरले तर एकसंध स्लाइडशो होतो.
आता त्याच प्रकारे माहितीचा ओडिओ, अपेक्षित म्युझिक पिसेस हे एखाद्या अॅपने जोडता आले फेडइन आउट पद्धतीने तर ऐकण्याची लिंक न तुटता काम होईल.
करून पाहावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आचरट बाबा, तुम्ही धन्य आहात. काहीतरी करून बघायला पाहिजे असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

" वाचताना ओडिओ /विडिओ प्ले करावे लागतात आणि लिंक तुटते."

- आपल्याला वाद्याची/वादनाची जी उदाहरणं द्यायची आहेत त्याच्या
१) युट्युब विडिओतून प्रथम ओडिओ मिळवायचा,
२) ओडिओ हवा तिथे कापून छोट्या क्लिप तयार करायच्या. ( TIMBRE APP)
३) या म्युझिक पिसेसबद्दल जे सांगायचं आहे त्याच्या कॅामेंटरीज रिकॅार्डिंग करायच्या.
४) ओडिओ जोइनर अॅपने ( TIMBRE APP) त्या ओडिओ क्लिप्स क्रमवारीने जोडून त्याची एकच ओडिओ फाइल तयार करायची.
५) तयार फाइल clyp_dot_it किंवा jumpshare_dot_com इथे अपलोड करून त्याची लिंक संस्थळावर/वाटसपवर द्यायची.

करून पाहिले.
आता फक्त तीन भाषणं आणि तीनचार छोटी उदाहरणं द्या, करून टाकतो.
पंधरा वीस मिनिटे टोटल होईल असे पाहा कारण ऐकणाऱ्याची सहनशक्ती वीस मिनिटांवर नसते. मोठा ओडिओ तांत्रिकदृष्ट्या असाध्य नाही पण त्यातली गंमत जायला नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>झक्कास श्रुतिका होईल.>>
अबापटअण्णांनी वीसवीस मिनिटांच्या तीन ओडिओ कराव्यात अशी याठिकाणी मागणी करण्यात येत आहे. युट्युब व्हिडिओमधली उदाहरणार्थ म्हणून देण्याची वाजलेली गिटार वगैरे ओडिओ*१ काढू बाहेर. पुढे मागे कॅामेंटरी. ऐसीची पाश्चात्त्य रॅाक-श्रुतिका.

*१- युट्युबवर असणे म्हणजे ओपन लायसन असं नसणार॥ पण खासगी वितरण चालेल बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि : पॉप असं खरंच जॉनर आहे की काहीही लोकप्रिय म्हणजे पॉप?

पॉप म्हणजे पॉप्युलर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0