मॅट्रिक ते मॅट्रिक्स्

ही कथा वा निबंध बऱ्याच पूर्वी पूर्वप्रकाशित आहे. आय.डी. अर्थातच वेगळा होता. कदाचित, बहुसंख्य ऐसीकरांनी या आधी वाचलाही असेल. पण, ज्यांनी नसेल वाचला, त्यांच्यासाठी!

“द मॅट्रिक्स” हा प्रसिद्ध इंग्रजी सिनेमा पाहिल्यावर असे मनांत आले की, हा सिनेमा जर कोणी गांवाकडच्या व्यक्तिने पाहिला तर तो त्याची गोष्ट कशी सांगेल ? या कल्पनेवर ही कथा लिहिली आहे.

म्या सदा येळकाढूकर, मुक्काम मुंबै !! माज्या बापाची गांवी शेती हाये. पन् म्या शिकावं अशी माज्या आयबापाची लई विच्छा. तसा म्या गेलो साळंत, पन् म्यॅट्रिकला गाडी फेल ! लई धडका मारल्या बगा पन् काईच उपेग नाय जाला. टकुर्‍याचा भुगा व्हायची येळ आलती. म्हंजी व्हायाचं काय की मला झ्वाप यायची कंदीबी, झ्वापलेला असताना काय भन्नाट सपानं यायची राव ! पर कोनाला सांगाया ग्येलं तर येडं हाय म्हनायची. शेवटी बा थकला. मुंबैहून बारक्या आलावता गांवाकडं, त्याला म्हन्ला, याला चिटकव गड्या कुठतरी तिकडच, आता शेतीतबी काय र्‍हायलेलं न्हाई.
म्या आलो मंग हिकडच् बारक्यासंगट. बारक्याच्याच हापिसात लागलो. हापिस येकदम् झ्यॅक बगा. निसत्या चौकोनी छोट्या छोट्या उघड्या खोल्या येका साईडीला अन् दूसरीकडं ही केबिनांची रांग. खोल्यांमदी बसल्येली मानसं उबी र्‍हायली तरच दिसायची. हापिस येकदम आरश्यावानी चकाचक, अन् बाप्ये पन. बाया तर हिरवीनीसारकी कापडं घालून टकाटका चालायच्या. माजं काम सक्काळी साफसफाई, पानी भरनं आन् समद्या काचा पुसनं. सायेब लोकंबी चांगली. म्हंजी दुपारी थोडी डुलकी लागली तरी बोलायची न्हाईत. फायली येळच्यावेळेत नेउन दिल्या की जालं. माजी सपानं बगन्याची संवय चालूच व्हती. पन् सांगनार कुनाला अन् आईकनार कोन् ? बारक्या तर मला येडाच म्हनायचा.
येक दिवस बारक्या म्हनला, ये सद्या, लेका तुला म्यॅट्रिक व्हतां आलं न्हाइ कंदी. आता म्यॅट्रिक नांवाचा पिक्चर आलाय् आन् समदी लोकं खुळी जालीत त्याच्यापायीं. आपल्या सायबाची टायपिस एन वक्ताला रुसली म्हनून मला दोन तिकटं दिलीत त्यानं. तर येनार का बगायला फुकटात ? तो बगितल्यावर तरी म्यॅट्रिक व्हशील लेका. म्या म्हनालो, जाऊ की, काय नाय तर थंडगार हवेत झ्वाप तरी मिळंल निवांत.
थेटर बगूनच गपगार झालतो, पिक्चर तर काय जबरी व्हतं राव माला जे समजलं तसं सांगतो तुमास्नी. पैल्याछूट येका बिल्डिंगीवर पोलिस आन् काळ्या गोगल घातलेल्या मानसांचा वेढा, मंग गोळीबार. येक काळ्या कापडांतली बया कांपुटरवर, काळे चष्मेवाले तिला पकडायला बगतात. त्येच्या मायला, ती बया पळाया लागते, येका बिल्डिंगीवरुन दुसरीवर. गावंतच न्हाइ, जाते पळून. मंग येक पोरगा दिसतो, त्येला कांपुटर उठवतोय्, ते मंग हापिसात जाताय तेच्या. थितं फोनवर येक बाप्या सांगतो, तुज्या मागावर मानसं लागलीयात् तंवा पळ काढ लेकां. त्ये खाली वाकून पळतंय येका केबिनमंदी. थितं फोनवाला बाप्या तयाला खिडकीभाईर जायला सांगतो. ह्ये जातंय् पन् मोबाईल पाडतंय् खाली. मंग घाबरुन आंत येतं. काळे चष्मेवाले पकडतात आन् आडवा करुन येक र्‍हइमानी किडा त्याच्या प्वाटांत घालतात. त्ये बोंबलू पाहतं तर व्होठ शिवलेलं. जागं हुतं तर घरात खाटल्यावर. मायला, म्हंजी हा माज्यासारकाच दिसतुय, सपान बगनारा.

पन् त्ये फोनवालं ब्येनं काइ पाठ सोडत न्हाई. परत फोन यितु. हा जातोय रस्त्यावर. येक गाडी येते आन् हा बसतोय आंत. तर आतल्या दोन बया त्याचं जबरी आप्रेशनच करुन टाकतात. र्‍हईमानी किडा भाईर ! तेला नेतात येका हबशाकडं. त्ये तर लई भारी असतंय. त्ये म्हनताय कसं, मजा बगायची असल तर गुलाबी गोळी गिळायची, न्हाईतर निळी गोळी गिळून गपगुमान् वापस. पन् पोरगं डेरिंगबाज निघतं. ते बिनधास गुलाबी गोळी गिळतय.

हबशा त्याला कांपुटर रुममधी बशिवतं. येक बया मशिनच्या वायरी चिटकवते. उजवीकडं आरसा असतोय. हा आरशाला हात लावतो तर ते चिटकूनच येतंय हाताबरुबर. गळ्यापर्यंत पसरताय. मंग बगतो तर येका चिकाट घानींत बुडाल्येला. आजुबाजुला छोटी बाळं पन् तशीच बरबटल्येली. येक मोठ्ठा कोळी येऊन तेचं डोस्कंच खातं. हा येकदम पान्यात. जागा होतो, हबशी विचारतो, मजा वाटतीं का? डोकीवर हात फिरवतो तर मागं ह्ये टेंगुळ ! हबशी म्हनतो तुला आता कोंतीबी वायर जोडता येईल. मंग हबशी तेच्याबरुबर लई खेळ खेळतंय. ज्युडो कराटे असं कायबीं. हेला काईच सुदरत नसतं. हबशी सांगतो आपुन जे खातो पितो ते कायबी खरं नसतं. ना वास ना चव ना पर्श.

ह्येच्या म्होरं जे सांगितलं ते डोसक्यांत शिरंना. मंग सपानात सपान असं सर्व फास्टमफास्ट फिराया लागलं. कोन कोनाच्या इरुध हाय त्येच कळंनासं जालं. येवडंच कळलं की त्यो पोरगा हिरो व्हता आन् त्याकडं टक लावून पहानारी ती हिरवीन्. शेवटी तिनं तेचा मुका घेतला तवा तर नक्कीच जालं. शेवटी भन्नाट जादू असलेली फायटिंग! त्यात काळं चष्मेवाले हरले आनि पोरग्याचा दनदनीत विजय!
लास्टला म्यां उबं र्‍हाउन येक सनसनीत शिट्टी हानली तर सर्व्या थेटरातली मानसं माज्याकडं भूत बगितल्यागत बगाया लागली. बारक्या उगा माज्यावर कावला. आयला, म्यॅट्रिक होवून फुडं शिकलो असतो तर पिक्चरमंदी काय बोलत होते तेबी समजलं नसतं का ??

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

तिरसिंगराव , आवडले हे लिखाण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढचं शिकणं सोडून द्या, पण पुढचा पिच्चर पाहिला असता, तर हा सीन गावाकडच्या मुलाला कसा दिसला असता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हाण तेज्यायला ! ज्याम भारी !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा लोकांबरुबरच शिनुमा बगायला जावं.
लई मज्जा यिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिरशिंगराव, असे आणखी सिनेमे सांगा की आम्हाला. 'बेसिक इनस्टिंक्ट' आणि 'द ममी' ही दोन नावं आठवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हिंदी डबींग मधली नावे आणि डायलॉग टाकले तर आणखी मजा येईल. मॅट्रिक्स 'महामायाजाल' म्हणून आला होता माळी थेटर ला. आम्ही इंजिनियरींग ला असून सुद्धा पहिल्यांदा बघताना काही कळला नाही. इन्सानोंकी खेती वगैरे प्रकार होते त्यात. बाकी मॉर्फियस चा 'हबशी 'हा उल्लेख मस्त आहे. सिंदबाद नंतर आत्ताच वाचला.

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0