कटू सत्य

जीवन साफल्याचे एक सूत्र आहे की, छोट्यांकडे पाहून जगावे, मोठ्यांकडे पाहून चांगले होण्याचा प्रयत्न करावा आणि वाईटाला तोंड देण्यासाठी सिध्द व्हावे.
तुमच्याकडे जर स्कुटर असेल तर तुमची नजर सायकलीवर असू द्यावी , मोटारकारवर नाही. तुम्ही सुखी राहाल.
मोठ्यांपासून मोठे होण्याची प्रेरणा घ्यावी, कारण जगातील महापुरुष हे केवळ पुजनिय नाही तर ते प्रेरकही असतात.चांगल्यासाठी प्रयत्न करावेत, ते प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. वाईटाला तोँड देण्याची तयारी ठेवावी, कारण पुत्र आणि मित्र केव्हाही आपल्याला सोडून जाऊ शकतात.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे सत्य आहे पण कटू नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माफ करा पण , हे असे "अ‍ॅसॉर्टेड" सुविचार एका परिच्छेदात लिहून , चर्चा प्रस्तावकाला कशा प्रकारच्या चर्चेची अपेक्षा आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर्तमान आधुनिकोत्तर काही तरी दिसतंय. धनंजय, काय आहे हे नेमकं? थोडं विवेचन करच. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्याकडे जर स्कुटर असेल तर तुमची नजर सायकलीवर असू द्यावी , मोटारकारवर नाही. तुम्ही सुखी राहाल.

सध्या एवढंच कळलं की तुमच्याकडे एक ग्रेट "धनंजय वैद्य" असतील तरी इतर सर्वसामान्य, कै च्या कै, रोचक, मार्मिक, खोडसाळ "धनंजय वैद्यांवर" नजर असू द्यावी. तुम्ही अपडेटेड राहाल. Wink

अवांतरः धनंजय वैद्य हे नाव इतकं कॉमन असेल हे माहित नव्हते असे विनम्रपणे नमूद करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रुपाली ताई मी ई. 12 चा विद्यार्थी असुन मी धनंजय वैद्य आहे याची तुम्हाला शंका आहे का ? तरी छोटा भाऊ मानुन मला सहकार्य करावे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं, मी शंका घेत नाही. तुम्ही म्हणता ते शक्य आहे. पण मला मी रुपाली असण्याबद्दल शंका आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोड्या विस्ताराने मांडलेत तर आवडेल.

अवांतरः हा लेख समीक्षा विभागात का टाकलेला आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जीवन साफल्याचे सूत्र.. इयत्ता बारावी...
हे वाचून आमच्या एका दुसर्‍या जालीय मित्राची आठवण झाली..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरा सल्ला.

शिवाय हा सल्ला काही बाबतीत मनाला संकुचित करू शकतो, त्याबद्दल काळजी घ्यावी. आपल्या स्कूटरचे सुख वाटावे, म्हणून सायकलस्वाराच्या बिच्चारेपणाकडे लावून ठेवले, तर सायकलस्वाराबाबत समान माणूस म्हणून आदर कमी होऊ शकतो. तसा होऊ नये.

सल्ला जरा त्रोटक झाला आहे, आणि कलमे थोडी विस्कळित झाली आहेत. म्हणजे "थोरांकडून प्रेरित व्हावे" नंतर "मित्र-पुत्र वार्‍यावर सोडून देतील त्याची तयारी असावी" हे दोन्ही चांगले सल्ले आहेत. पण एका परिच्छेदात असंबद्ध वाटतात.

स्वागत आणि नवीन वैचारिक लेखनाबाबत शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या बंधुंनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! बंधुंनो हे मी पुण्य नगरी पेपरमधुन तरुणसागर यांचा लेख लिहीला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यशस्वी जीवनाचे एक सूत्र आहे की मोठ्यांकडे पाहून जगावे. छोट्यांकडे पाहून बालपणीचे खडतर दिवस आठवावेत व चांगल्याला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हावे.
तुमच्याकडे जर स्कूटर असेल तर तुमची नजर मोटारकारवर असू द्यावी, सायकलवर नव्हे तरच तुम्ही जीवनात पुढे यशस्वी व्हाल. हे कटू असले तरी सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

अहो वैद्य. उत्तम विचार आहेत.पण एक मनापासून सांगू?

बारावीत असाल खरंच तर...हे तरुणसागर किंवा तत्सम काही पुढची साठेक वर्षं वाचू नका हो.

अहो हे म्हणजे भावी अजीर्णाच्या भीतीने आधीच उपाशीपोटी हाजमोला घेण्यासारखं आहे हो.

सखाराम गटणेचे जीवनोन्नतीचे सहा सोपान आठवले.चौखुरे गुरुजीच ना ते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही उच्चच.
*
आताच हे स्थळ जरा फिरून पहायला सुरुवात केली होती.
एकदम पसंत आहे बुवा. यावेच लागणार.
असो.
धन्याशेट, शान्या मान्साने उगाच टेन्शन घेउ ने. खौन पिउन सुखी र्‍हावे.

*
कळकळीची विनंती करतो. "तुझे आहे तुजपाशी" बघून घ्या हो एकदा.

--मनोबा देवासकर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गविशी बाडिस

त्यांचीच ब्राउ मालिका वाचा त्यापेक्षा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.