वळूनी मागे मी बघता , शल्य बोचते मनाला

वळूनी मागे मी बघता

शल्य बोचते मनाला

एक वेडा वाट चालला

एक वेडा वाहात चालला

वेळ दिसे काट्यावरी

कधी ना परतणारी

वाट पाहून कोमेजून गेली

वाटेवर फुललेली फुले सारी

शिंकण्यात पण झाला गुलाम तू

धरे नित्य हाती रुमाल तू

आठवतेय का ती शाळकरी शिंक तुला ?

खळाळून बाहेर पडलेला शेमबुड पिवळा

ताप खोकला सर्दी पडसे

सर्वाचीच काढली होती तू पिसे

ठेच लागता लावे माती

हसता हसता जोडे नाती

त्या नात्यांचे भान विसरला

जसा जसा कमावता झाला

धुंडाळ नव्या वाटा पुन्हा नव्याने

जुनी वाट केव्हाची हरवला

ते दिवसं मनात कायमचं घर करून गेलेत

घरातलं मन चोरून गेलेत

डोळे बंद करतो जेव्हा जेव्हा

त्या मनातल्या घरात खेळ असतो

त्याच लहान वाटेवर पुन्हा पुन्हा लोळत असतो

{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमचा शेमबुड तुमच्याकडेच ठेवा की. इतरांना इन्फेक्शन कशाला म्हणते मी. एनीवे परत काही तुमच्या कवितेच्या वाटेला जाणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL मस्त आहे आपला प्रतिसाद , तुमचं याईक्स बोलणं आवडलं बरं का शुचि ताई ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0