एप्रिल फूल -

रंग नाही, रूप नाही, सुगंध नाही
पान नाही, पाकळी नाही, देठही नाही -

अजबसे फूल, देते हूल, कुठे दिसेना
आकर्षण आहे तरी तयाचे सर्वांना ;

फजितीत फसवते, स्वत:लाच हसवते
एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते -

एक तारखेचे "एप्रिल फूल" भारी जीव जडवते,
मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली पाहता पाहता उडवते !

field_vote: 
0
No votes yet