Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०१

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 12/05/2019 - 03:34

हे आमचं लाडकं अनियन.

रस्ता चुकवणाऱ्या फ्रेंडबद्दल लिहिलं आहे ते ठीक; तिथे फोटो, नाव वगैरे बरोब्बर पुरुषाचे आहेत. मोगँबो खुश हुआ.
Friend Dishonorably Discharged From Navigation Duties After Missing Exit

'न'वी बाजू Sun, 12/05/2019 - 07:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(चुकून 'लाडकं बनियन' वाचले. असो चालायचेच.)

राही Tue, 14/05/2019 - 17:16

प्रश्न असा काही नाही पण एक विचार आला. मजजवळ "साष्टीची बखर ऊर्फ वसईचा दुर्धर धर्मसंग्राम" या नावाच्या १९३५ साली प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकाची मूळ छापील प्रतीवरून मीच काढलेली झेरॉक्स नक्कल आहे. ह्या नकलेवरून आणखी काही नकला काढता येतील. येथे कोणास रस असल्यास मी नक्कल करून भारतामध्ये कुठेही पोस्टाने पाठवण्यास तयार आहे. किंबहुना मला हे करण्यात आनंदच होईल. अनेक वाचनालये धुंडाळण्याच्या सवयीतून एका छोट्याश्या वाचनालयात हे पुस्तक जीर्णावस्थेत सापडले. याच पुस्तकाची एक थोडीशी वेगळी वर्शन काव्येतिहाससंग्रह मालेत १८८२ साली प्रसिद्ध झाली होती. त्यात काही कमतरता आढळल्याने या नवीन आवृत्तीच्या लेखकाने सुमारे पन्नास वर्षे परिश्रम करून काही अधिक माहिती मिळवून ही आवृत्ती छापली. साष्टी बेट, तत्कालीन ठाणे व कल्याण प्रांत, सध्याची नवी मुंबई, दमण, तारापूर, अशेरी, या संबंधातल्या पोर्ट्युगीज अंमल, पेशवे, मराठे यांच्या कारकीर्दीतल्या काही काळाचे सनावळ्या आणि कालनिश्चिती करून लिहिलेले हे लिखाण अत्यंत रोचक आहे. कोणास नक्कल हवी असल्यास पोहोचविण्याचा पत्ता व्य.नि.त कळवावा. नक्कल रेजिस्टर्ड पोस्टाने पाठविली जाईल. एकापेक्षा अधिक प्रती जवळपासच्या आपसांत माहितीच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचा प्रसंग उद्भवल्यास एकाच सोयीच्या ठिकाणी पाठवता येण्यासारखे असेल तर बरे.
'ऐसी'ची जागा वैयक्तिक बाबीसाठी वापरण्यास मिळण्याबद्दल 'ऐसी'चे आभार.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/05/2019 - 17:51

In reply to by राही

पुस्तक प्रताधिकारमुक्त असेल तर स्कॅन करून ऐसीच्या सर्व्हरवरही ठेवता येईल. पैसे घेऊन स्कॅन करून देतात का कोणी?

राही Wed, 15/05/2019 - 08:06

स्कॅन व्यावसायिक रीत्या सहजी करता येईल. प्रताधिकार प्रकाशकांकडे आहेत. पुस्तक प्रकाशित होऊन ८४ वर्षे झाली आहेत. त्यामुळे प्रताधिकाराची मुदत बहुतेक संपली असणार. पण एकवार खात्री केलेली बरी. प्रकाशनसंस्थेचा ८५ वर्षांपूर्वीचा पत्ता आज तोच असेल असे नाही. आजमितीला ही संस्था पुस्तकप्रकाशनाच्या व्यवसायामध्ये नाही. किंबहुना अशी संस्था अस्तित्वात आहे की नाही ह्याचीच शंका आहे. तेव्हा थोडे इकडेतिकडे विचारून चौकशी करून प्रत्यक्ष तिथे जाऊन संस्था अस्तित्वात असेल तर तिच्या विद्यमान मुख्याधिकाऱ्याला भेटून पाहीन. तोवर स्कॅन करून ठेवीन.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 15/05/2019 - 19:21

In reply to by राही

लेखकांच्या मृत्युनंतर ६० (का ८०?) वर्षांनी प्रताधिकार संपतो.

अशी पुस्तकं फक्त स्कॅन करून न थांबता, पुढे त्याचं युनिकोडीकरणही करता येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 20/05/2019 - 04:21

सध्या एक पुस्तक ऐकत आहे; Everybody Lies. दुसऱ्या बाजूनं निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. म्हणून भारतीय नेटीझन्स काय शोधतात, ह्याबद्दल उगाच गूगल ट्रेंडवर चाळे करत होते. त्यात ही गंमत दिसली. गूगलणाऱ्या भारतीयांना ना मोदी सर्वाधिक प्रिय आहेत, ना (कोणतेही) गांधी. मी ज्या चार गोष्टी शोधल्या, त्यात नोकऱ्या सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत.

अस्वल Thu, 23/05/2019 - 02:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्यात 'पॉर्न" ही सर्चसंद्न्या समाविष्ट न केल्याबद्द्ल निषेध.
पॉर्नपेक्षा भारतीय जास्त काही शोधत असतील ह्यावर माझा विश्वास नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 23/05/2019 - 07:40

In reply to by अस्वल

ऑक्टोबरच्या मध्यात पॉर्नपूर का आला असावा? हे आकडे नॉर्मलाईज्ड आहेत, त्यामुळे इतर काही कमी झालं असणार. पण त्यापेक्षा पॉर्नपूर आल्यामुळे बाकीचे कमी दिसत असावेत असा अंदाज आहे. ह्याचे कच्चे आकडे मिळाले तर बरं होईल.

अस्वल Thu, 23/05/2019 - 11:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नोव्हेंबरात पॉर्नपूर आहे - दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे होत्या वाट्टं!
उलट ऑक्टोबरात गांधीजयंती म्हणून पॉर्नचा शोध कमी झालाय. आणि लोकांना उगाच वाटतं गांधीबाबांना जग विसरलं.

बिटकॉइनजी बाळा Thu, 23/05/2019 - 12:44

In reply to by अस्वल

गुरूष्णवासा दिग्धाङ्गो गुरुणाऽगुरुणा सदा| शयने प्रमदां पीनां विशालोपचितस्तनीम्||१६||
आलिङ्ग्यागुरुदिग्धाङ्गीं सुप्यात् समदमन्मथः| प्रकामं च निषेवेत मैथुनं शिशिरागमे||१७||
(चरक सूत्रस्थान तस्यशितीय अध्याय)

In the winter season, one should always wear thick and warm clothes and the body should be anointed with thick paste of aguru (Aquilaria agallocha Roxb) (eagle-wood). A man who has taken alcohol and possesses strong passion should sleep in the bed at night embracing a healthy woman having well developed, plump breasts and herself anointed with the paste of aguru. One may indeed indulge in sexual intercourse up to full satisfaction. [16-17]

अस्वल Thu, 23/05/2019 - 22:03

In reply to by बिटकॉइनजी बाळा

अशी मोलाची माहिती खरं तर शाळा कॉलेजात शिकवायला पाहिजे.
तेव्हा आम्हाला मूल्यशिक्षण नावाचा विषय शिकवायचे आणि "विषय सर्वथा नावडो" ही ही.
#पारंपारिकपॉर्न

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/05/2019 - 00:15

In reply to by अस्वल

मी म्हणणार होते, ऑक्टोबरात नवरात्र (दसरा - १९ ऑक्टोबर २०१८) येऊन गेलं. नोव्हेंबरात थंडी वाढल्यावर गर्मी बाहेरून वाढवावी लागली.

आणि हे आकडे zero-sum-game नाहीत. एक वाढलं म्हणून दुसरं कमी होत नाही. आधी लिहिताना अंमळ चूक झाली होती.

सामो Tue, 21/05/2019 - 23:48

मिहीर यांना व्यनि केला. पण इथेच विचारते. न्यु जर्सी/ न्यु यॉर्कात कोण कोण आहेत? करायचा का एखादा कट्टा? राघा व मिहीर आहेत एवढे माहीते. मी कसंतरी जमवेन. अवघड आहे परवानगी मिळणं लेकिन कुछ जुगाड कर सकती हूं (शायद).
जर्सी सिटी मला सोईची आहे बट आय ॲम ओपन फॉर सजेशन्. :)
जर्नल स्क्वेअरला तर ढीगाने भारतीय रेस्टॉरंटस आहेत.

कुहु Thu, 23/05/2019 - 02:26

In reply to by सामो

सारिका , I live in new Jersey , I am ready for katta :) , would love to meet you all. lets decide.
P.S - Sorry marathit type nahi karta ala.

अस्वल Thu, 23/05/2019 - 01:59

In reply to by चिमणराव

विमानाचं तिकीट, मुद्दाम शिवून इतरांना दाखवायला घातलेले डिझायनर कपडे, स्वत:च पैसे देऊन केलेले पब्लिसिटी वगैरे सगळं धरलं तर कोटींमधे जात असेल खर्च.
त्यापेक्षा केदारनाथला गेलात तर कार्पेटसकट लाखांत काम होईल. मोदीजींच्या ध्यानगुहेत रहायचं असेल तर ९०० रू लागतात दिवसाला.

चिंतातुर जंतू Thu, 23/05/2019 - 12:16

In reply to by अस्वल

विमानाचं तिकीट, मुद्दाम शिवून इतरांना दाखवायला घातलेले डिझायनर कपडे, स्वत:च पैसे देऊन केलेले पब्लिसिटी वगैरे सगळं धरलं तर कोटींमधे जात असेल खर्च.

तुम्ही दीपिका, ऐश्वर्या वगैरे असलात तर हा सगळा खर्च तुम्ही ज्यांचे ब्रँड अँबॅसॅडर आहात ते लोक करतात. किंबहुना रेड कार्पेटवर चालणारे बहुतांश लोक इतरांच्या पैशानं चालतात; स्वतःच्या नव्हे.

सामो Thu, 23/05/2019 - 21:03

https://www.cnn.com/2019/05/23/business/taco-bell-india/index.html
.
टाको बेल भारतात् ६०० रेस्टॉरंटस उघडणार्
.
मला आवडतात टाको बेलचे पदार्थ. मला वाटतं हिट होणार कारण आपल्या स्टेपल अन्नाशी त्या पदार्थांचे साधर्म्य आहे .

१४टॅन Fri, 24/05/2019 - 21:20

In reply to by सामो

तेच ते (ओव्हर)लोडेड नाचोज्. अतिश्रीमंत लोकांचा 'भत्ता'. हे जमवून तासन्तास गप्पा मारणे हा उद्योग झक्कास आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/05/2019 - 18:13

In reply to by सामो

ऑस्टिनात स्थानिक टेक्स-मेक्स फार छान मिळतं. सांता फे, आल्बुकर्की आणि अगदी डीसीमध्येही चांगलं मेक्सिकन मिळतं. अशा ठिकाणी खायला लागल्यापासून मला टाको बेल अजिबात आवडत नाही. पण त्या निमित्तानं 'ओल्ड एल पासो' कंपनीचे टाको आणि मसाला भारतात सहज उपलब्ध झाला तर बरं होईल. चांगले टाको घरीच बनवता येतील.

सामो Fri, 24/05/2019 - 19:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगं टेक्सास तर 'मेक्सिकन खाण्याची' पंढरी आहे बाई!!! त्यापुढे टाको बेल एकदमच गंगाभटाची तट्टाणी!!

'न'वी बाजू Sat, 25/05/2019 - 11:21

In reply to by सामो

अगं टेक्सास तर 'मेक्सिकन खाण्याची' पंढरी आहे बाई!!!

मेक्सिकन नव्हे. टेक्समेक्स. फरक आहे.

त्यापुढे टाको बेल एकदमच गंगाभटाची तट्टाणी!!

शामभटाची. बाकी चालू द्या.

अबापट Sat, 25/05/2019 - 12:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कधी काळी चुकून पुण्यात आलात तर तुम्ही उत्तम दर्जाचे 'टेक्ष मेक्ष रोस्टी पोटॅटो स्टेक' खाऊ शकाल, आगरवालाच्या सूर्या हाटेल उर्फ डेक्कन रॉनदेवु मध्ये. बरे असते. हे सदाशिव पेठेच्या जवळ असल्याने जगात भारी टेक्स आणि मेक्स हेच असणार यात कुठलीही शंका नाही. ( हवं तर जंतू यांना विचारा)
बाकी तुमच्याकरिता आष्टीन नामे एक क्याफे पण भांडारकर रस्त्यावर उगवले आहे. तिथे चावण्याची कॉफी मिळते.
असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 25/05/2019 - 21:43

In reply to by अबापट

आमच्यात ष्टेक खात नाहीत हो! आमच्यात फक्त शाकाहारी आहार घेतात.

आणि टेक्समेक्सात बटाटा फक्त न्याहारीच्या पदार्थांत असतो. ऑफिसात जाताजाता पोटात ढकलण्यासाठी. निवांत बसून खायचं तर आव्होकाडो, काळे वाटाणे वगैरे जिन्नस लागतात. पुण्यात येऊन टेक्समेक्स कसलं विकत घ्यायचं! मोदक वगैरे मिळाले तर बोला!

आदूबाळ Sun, 26/05/2019 - 00:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण त्या निमित्तानं 'ओल्ड एल पासो' कंपनीचे टाको आणि मसाला भारतात सहज उपलब्ध झाला तर बरं होईल.

ओल्ड एल पासो हा 'जनरल मिल्स' कंपनीचा ब्रँड आहे. जनरल मिल्स आणि भारताचा पुराना रिश्ता आहे - पिल्सबरी आटा. हल्ली हल्ली मी हुचचभृ ठिकाणी त्यांचं हागेन दास आईस्क्रीमही पाहिलं आहे.

मेक्सिकन खाणं घरी बनवणं फारसं लोकप्रिय नसल्याने ही क्याटेगरी भारतात नाही. टाको बेलमुळे आपोआप यांचंही काम होईल. तसंही आपल्याकडे 'घर्च्याघरीपौष्टिक'ला वलय आहेच.

धर्मराजमुटके Sun, 26/05/2019 - 14:05

In reply to by आदूबाळ

आमचे एक मित्रवर्य जनरल मिल्स मधे कामाला आहेत. त्यांनीच या आईसक्रीम ची माहिती दिली.
पण ह्या आईसक्रीम्स नॉनवेज असल्यामुळे खाऊ शकत नव्हतोच.
मात्र "हागेन दास" नावाचे शाकाहारी आइसक्रीम खायचे म्हनले तरी नावामुळे पहिला विचारच केला असता.
शिवाय किंमतीदेखील हुच्च आहे असे कळते.
असो. मला स्वता:ला "नॅचरल" चे "मृदू शहाळे" पसंत आहे.

धर्मराजमुटके Tue, 28/05/2019 - 10:34

In reply to by अबापट

हगेन दाझ च्या बहुतेक सर्वच आईसक्रीम मधे. आता काही शाकाहारी आईसक्रीम्स भारतात उपलब्ध आहेत असे पण दिसतेय.

नॉनवेज कंटेट असलेली आईसक्रीम

कंपनीच्या वेबसाईटवरील माहिती

अबापट Tue, 28/05/2019 - 15:40

In reply to by धर्मराजमुटके

Mango Raspberry (तुम्ही दिलेलं)यात अंड दिसत नाहीये मला हो..
आईसक्रिम मधे अंडे घालण्याचे (कुंपणीचे) लॉजिक मला कळत नाही

धर्मराजमुटके Tue, 28/05/2019 - 16:16

In reply to by अबापट

अहो अंड बॉक्सच्या आतमधे आहे :)
विनोद पुरे पण आपल्याला फोटो च्या डाव्या बाजूला मांसाहारी पदार्थांसाठी वापरला जाणारा लाल ठिपका दिसतोय काय ? नसेल तर अजुन एक चित्राचा दुवा देतो.
चित्रावर टिचकी मारुन झुम करुन बघावे.

हा दुवा :

लॉजीक चे म्हणाल तर बहुतेक पदार्थांना घट्टपणा येण्यासाठी घालत असावेत. नक्की माहित नाही.
परदेशातील बऱ्याच चॉकलेट मधे पण अंडे असते त्यामुळे शाकाहारी व्यक्तींनी तोंडाला पाणी आणून चॉकलेटस ला लगेच हो म्हणू नये.

अबापट Tue, 28/05/2019 - 17:40

In reply to by धर्मराजमुटके

आहे बुवा लाल ठिपका. मान्य. पण लेबलवरच्या कंटेंट्स मधे उल्लेख नाहीये अंड्याचा.( जगभर कायद्याने हे लिहिणे compulsary असते)
भारतात आईस क्रिम तयार करताना अंड्याचा वापर करत नसावेत.

गवि Tue, 28/05/2019 - 18:18

In reply to by अबापट

कोणताही प्राणीजन्य पदार्थ उदा. जिलेटिन, एंझाईम्स (चीज वगैरेसाठी), added प्राणिजन्य जीवनसत्त्वे किंवा मिनरल्स असं काहीही असलं तरी लाल / तपकिरी ठिपका येतो

धर्मराजमुटके Tue, 28/05/2019 - 19:10

In reply to by अबापट

आहे की हो उल्लेख !
हा दूवा बघा ना प्लीज :
दोन फोटोज आहेत. दुसरा फोटो बघा.

भारतात आईस क्रिम तयार करताना अंड्याचा वापर करत नसावेत.

बऱ्याच कंपन्या नाही करत. फारच थोड्या करतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/05/2019 - 04:59

सगळ्या मतदारसंघनिहाय मतांचे आकडे, कोणत्या उमेदवारांना किती मतं मिळाली, कुठे मिळतील?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/05/2019 - 08:05

In reply to by चार्वी

सगळे कच्चे आकडे आहेत, हवेत तसे. आता ते स्क्रेप करण्यासाठी कोड कसा लिहायचा ह्याचा विचार करायचा आहे.

आकडे मिळाले की काय करता येईल ह्याचा थोडा विचार केला आहे. तिथपर्यंत कृती केली की पुढचे प्रश्न विचारेन.

--

एका जुन्या ओळखीच्याशी गप्पा मारताना हे आकडे त्याच्या ओळखीच्याकडून फुकटात मिळाले. पण वाढीव काम डोक्यावर आल्यामुळे ...

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 25/05/2019 - 21:49

ऑफिसाच्या जवळ इथिओपियन ढाबा आहे. ढाबा म्हणावा अशीच जागा आहे. आंबट डोशासोबत पालकाची भाजी, मसालेदार आणि कमी-मसालेदार मसूरची उसळ वगैरे जिन्नस होते. बाकी मांसही होतं, पण आमच्यात ते खात नाहीत.

लिहिण्यासारखी गोष्ट म्हणजे, अगदी किरकोळ आकाराची जागा. शहरातल्या एकमेव आणि मोठ्या हायवेच्या शेजारी - हा हायवे (Interstate 35) बांधला तेव्हा कृष्णवर्णीय लोक हायवेच्या पलीकडच्या बाजूला आणि गोरी जंता, सरकारी कार्यालयं, विद्यापीठ, सगळं अलीकडच्या बाजूला अशा रीतीनं आखणी केली गेली. हा ढाबा हायवेच्या गोऱ्या बाजूला, पण अगदी शेजारी आहे.

आत प्लास्टिकचं गवत वाटावं असे गालिचे होते. इथिओपियन प्रकारचे स्त्री-पुरुषांचे शर्ट, लहान मुलांचे कपडे, थोडी मातीची भांडी, काही कोरडा खाऊ वगैरे गोष्टी विकायला होत्या. आम्ही दुपारचे जेवायला गेलो होतो; बुफे होता. इथल्या भारतीय बुफेंमध्ये असते तशी पाटीसुद्धा होती, नव्या, स्वच्छ ताटलीतच सगळे पदार्थ वाढून घेणे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 25/05/2019 - 22:32

कॉलेजात असताना वडील मला साटल्यानं सुचवत होते, मी भौतिकशास्त्राच्या ऐवजी गणित शिकावं. बाबांचे एक मित्रसुद्धा तिथेच होते. त्यांनी गोष्ट सांगितली.

एका माणसाची इच्छा असते, मुलाला गणिती बनवण्याची. तो त्याच्या ओळखीच्या गणितज्ञाचा सल्ला घेतो. सल्ला असा मिळतो, "मुलाला रोज गाडीनं शाळेत सोडायला जायचं. पण एकच पथ्य, ब्रेक मारायचा नाही आणि हॉर्न वाजवायचा नाही."

आता हेच बहुतेक लोकमाध्यमांबद्दल म्हणता येईल. गणित किंवा काहीही समजून घ्यायचं असेल तर, फेसबुक, ट्विटर वगैरे बघायचं, पण कशावरही प्रतिक्रिया द्यायची नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 25/05/2019 - 22:58

In reply to by मारवा

फुलानं चड्डी पेहरण्याबद्दल त्याचे अनंत आभार. लोकलज्जा असो किंवा काही, काही गोष्टी न दिसलेल्याच बऱ्या असतात.

अजो१२३ Sun, 26/05/2019 - 11:36

चंद्राच्या त्र्यिजेचे वर्तुळ भागिले चन्द्र ते पृथ्वी अंतराइतक्या स्फिअरचे अर्धे क्षेत्रफळ किती येते?
चंद्र तितके टक्के दृश्य आकाश व्यापताना दिसतो का?

सामो Tue, 28/05/2019 - 19:35

माउंट एव्हरेस्टवरती ओव्हरक्राउडिंग होउन बरेच गिर्यारोहक मृत्युमुखी पडले.
गर्दीमुळे ऑक्सिजन (प्राणवायु) कमी पडतो असे काही होते का? त्यामुळे मृत्युमुखी पडतात का?
___________
मला वाटतं गर्दीमुळे फार उशीर होतो आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते. एकच पॅसेज आहे वाटतं.
__________________
परवा ओव्हरक्राउडिंग अर्थात तेथील ट्राफिक जॅमचा फोटो पाहीला. वैष्णो देवीला जावे तसे लोक माउंट एव्हरेस्ट वर जात होते :(
.
https://www.outsideonline.com/sites/default/files/styles/img_850x480/public/2018/04/04/meeting-of-sherpa-guides_h.jpg?itok=8oNo1_so
.
.
https://i.pinimg.com/originals/01/12/cc/0112ccfaebccec2029b6d343fd6689ca.jpg

ओंकार Wed, 29/05/2019 - 11:33

In reply to by सामो

वर जाताना ऑक्सिजन बरोबर घेउन जायला लागतो. पण गर्दीमुळे उतरायला उशीर होतो. त्यामुळे वेळेचे गणित चुकून ऑक्सिजन संपायला लागल्यामुळे काही जीव गेलेले आहेत. अर्थात हे बातम्यांमधून कळलेले.

- ओंकार.

नितिन थत्ते Wed, 29/05/2019 - 11:23

गिर्यारोहण करणे हा मानवी संस्कृतीचा, इतिहासाचा आणि बुद्धीचा अपमान वगैरे आहे. :)

संस्कृतीचा संपूर्ण इतिहास हा मानवी कष्ट (शारिरिक तसेच मानसिक) कमी करण्याच्या प्रयत्नांनी व्यापला आहे. असे असताना शिखरावर पायी चालत/चढून जाणे हे गारगोटीने आग पेटवण्यासारखे आहे.

धर्मराजमुटके Wed, 29/05/2019 - 20:39

In reply to by सामो

एक आगावू प्रश्न विचारतो, रागावू नका !
पण तुम्ही नेहमी आयडी का बदलता ? म्हणजे आयडी बदलला तरी तुम्हाला ओळखणे अगदी सोप्पे असते.
अर्थात तुम्ही ते नाकबूल केले तर प्रश्न नाही पण मग नक्की काय फायदा होतो तुमचा ?

सामो Wed, 29/05/2019 - 20:48

In reply to by धर्मराजमुटके

आगव प्रश्न नाहीच आहे. रास्त प्रश्न आहे.
इथे आय डी संपादित करुन वेगवेगळे आय डी घेण्याची सोय आह ना? मग तिचा उपयोग केला तर काय बिघडले?
माझा प्रश्न हा आहे की - शुचि/सारीका काय वाट्टेल ते नाव घेतल्याने, सतत आय डि संपादित करुन बदलल्याने की फर्क पैंदा??

मनीषा Sat, 08/06/2019 - 13:07

In reply to by सामो

अगदी बरोबर आहे. बदलायची सोय आहे, मुभा आहे तर त्याचा वापर का करायचा नाही?

मला उपनेत्र लावणे जरूरीचे असते हल्ली. मग मी विविध प्रकारांचे, आकारांचे चश्मे करून घेतले आहेत. जेव्हा जो बरा वाटेल, सोयीस्कर असेल तो वापरायचा. मेरी मर्जी ...

कासव Wed, 29/05/2019 - 21:31

In reply to by धर्मराजमुटके

आयडी बदलला तरी तुम्हाला ओळखणे अगदी सोप्पे असते.

मलाही खूप उशिराने कळाले. जेव्हा अदिती म्याडमनी मामींना इथे सुतारफेणी खायला सांगितली, तेव्हा कुठे लक्षात आले.

सामो Wed, 29/05/2019 - 21:32

अरे कोण आहे रे संपादक मंडळात जे कोणी ढूंढ ढूंढ के, ही गाणी लावतात ना त्यांना नमस्कार :)
गाण्यांची, अतिशय उत्तम ओळख आहे. मला फार आवडतात.

कासव Wed, 29/05/2019 - 21:43

In reply to by सामो

गाण्यांची, अतिशय उत्तम ओळख आहे.

मलाही हेच म्हणायचे आहे. कोणी तरी उत्तम जाणकार आहेत. योग्य वेळ-काळ पाहून अचूक गाण्यांची निवड केली जात आहे. धन्यवाद.

नितिन थत्ते Mon, 03/06/2019 - 14:04

भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही काळातच भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग पत्करला.

स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था होती? भांडवलशाही की स्टेट कंट्रोल्ड इकॉनॉमी? तेव्हाचे भारतात व्यवसाय करणारे इंग्रज किंवा युरोपीय व्यावसायिक काय विचार करीत होते? तसेच भारतातील भांडवलदारांचा वर्ग काय अपेक्षा ठेवत होते.
म्हणजे इंग्रजी वर्तमानपत्रांतून बजेटच्या पूर्वी कोणत्या प्रकारची चर्चा चाले? याविषयी काही माहिती आहे का?

(हा प्रश्न भारतीय नेते काय विचार करत होते याविषयी नसून भारतातले व्यावसायिक - मग ते देशी असतील किंवा परकीय- काय विचार करीत होते?

यडमाठराव Sat, 08/06/2019 - 09:45

झी चॅनलच्या एका शो ची तक्रार करायची असेल तर ई-मेल आयडी कोणता? आणि त्या शो चालवणाऱ्यांचा ई-मेल आयडी पण मिळतो का? मी Google केलं पण सापडला नाही.

नितिन थत्ते Mon, 10/06/2019 - 10:00

In reply to by यडमाठराव

सर्व कार्यक्रमांमध्ये एक स्क्रोल पट्टी चालू असते. "या कार्यक्रमाबाबत तक्रार असल्यास अमूक क्रमांकावर तक्रार करावी" अशा अर्थाची. ती पहा.

हारुन शेख Tue, 11/06/2019 - 14:48

In reply to by यडमाठराव

कार्यक्रमाचा संदर्भ देऊन सद्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांना ट्विट करून पहा.

सामो Tue, 11/06/2019 - 18:26

परवा शतायुषीच्या दिवाळी अंकात 'नागिण' या विषाणूजन्य आजाराबद्दल वाचले. जर कांजीण्यांची लस घेतलेली असेल तर कांजीण्यांचे विषाणु अशक्त करुन शरीरात सोडले जातात बरोबर? नंतर उतारवयात आपली प्रतिकारक्षमता नगण्य झाली की हे विषाणु हल्ला करु शकतात त्यातून 'नागिण' होते.
मग याचा अर्थ लस टोचायला नको किंवा लशीला विरोध करणारे लोक बरोबरच आहेत असा होत नाही का? :(

कासव Tue, 18/06/2019 - 08:23

In reply to by सामो

★ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मराठी शब्दकोशात देण्यात आलेले अर्थ :

◆ अंगण (न.) = घरापुढील अथवा मागील मोकळी जागा; आवार. घरापुढील झाडून सारवून तयार केलेली जागा.

◆ ओसरा, ओसरी (स्त्री.) = माजघराच्या पुढील अगर मागील, तीन बाजूंनी भिंत असलेली मोकळी जागा; ओटी; पडवी; सोपा

★ वा. गो. आपटे यांच्या ‛विस्तारित शब्दरत्नाकर’मध्ये देण्यात आलेले अर्थ :

◆ अंगण (सं. न.) = घरापुढची मोकळी जागा

◆ ओसरी (स्त्री.) = पडवी, सोपा, ओटी.

◆ पडवी (स्त्री.) = ओसरी, खांबाचा तळखडा, धातूचा रस ओतण्याचा साचा, घराचे पाठीमागील तळमजल्याचा भाग.

चिमणराव Tue, 11/06/2019 - 19:27

देशावर, कोकणात वाडे असत(आहेत) त्यात या तीन जागा असतात.
-------
१)अंगण :- वाड्याचे दार ओलांडून आत आलो की तुळशी वृंदावन / एखादे छोटे पारिजातक/अडुळसा/भोकर झाड. एखादा जाईजुईचा वेल. अपरिचित लोक अंगणात येऊन हाक देतात ताई/दादा/भाऊ वगैरे.
२) ओसरी :- घरातले बाहेर येऊन बसा म्हणतात ते घरातल्या ओसरीत. दोन स्तरांवर रचना असते. एक तीन फुटी कट्टा असतो. स्त्रिया ओसरीच्या/माजघराच्या दारातून बोलतात. ओळख असल्यास कट्ट्यावर बसतात. ओसरीच्या आतली खोली माजघर. बहुधा याला बाजूला जोडलेली असते पडवी.
३) पडवी :-बाजूच्या एका खोलीस एक मोकळी जागा काढलेली असते तिथे घरातल्या स्त्रियांचा ,मुलामुलींचा मुक्त वावर असतो. उखळ, जाते असते. धान्य निवडणे, गप्पा इथे होतात. पडवीलाही छप्पर असते. दोन पडव्या असतात कधी.
४) चौक: खूप मोठ्या घरात वाड्यात चौक असतात. इथे सर्व बाजूनी आपलेच घर ,मध्ये आकाश दिसणारा उघडा भाग. बंगळुरात काही लोकांनी असे घर बांधून घेतले आहे ,फक्त वरच्या बाजूस काचा लावल्यात.

१-२-३ हे ४०फुट गुणिले ४०फुटांत बसते, चौकवाल्या घरासाठी ६०बाइ६० किंवा अधिक जागा लागते.

सामो Tue, 11/06/2019 - 19:39

In reply to by चिमणराव

धन्यवाद च्रट्जी. छान माहीती दिलीत. ओसरी मालिकांमधुन पाहीलेली होती पण का कोण जाणे मागचे अंगण की काय असा विचार डोक्यात आला.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 16/06/2019 - 23:34

In reply to by चिमणराव

वाडाच असायला पाहिजे असं काही नाही. बारक्या घरांनाही अंगण, ओसऱ्या आणि पडव्या असतात. शुचे, अमेरिकी घरांच्या बाबतीत फ्रंटयार्ड, पोर्च आणि पॅटिओ म्हणजे अंगण, ओसरी आणि पडवी.

मी बघितलेल्या, रायगड जिल्ह्यातल्या घरांना जोती असतात. जोतं म्हणजे घर थोडं उचलून बांधलं जातं, दोन-तीन बारक्या पायऱ्यांची उंची. अगदी बारक्या, ४०० स्क्वे फूटाचं घर नसेल अशा गरीबांच्या घरांनाही ओसऱ्या बघितल्या आहेत. (ह्या ज चा उच्चार जमिनीतल्या जचा.)

कासव Tue, 18/06/2019 - 08:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

★ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‛मराठी शब्दकोशा’त (तिसरा खंड) देण्यात आलेला शब्द व त्याचा अर्थ :

* जोते (न.) = चिरेबंदी कडा, काठ. याच्यामुळे घराची गच्ची किंवा ओटा सुरक्षित राहतो. चौथरा; गच्ची; उंच केलेली जागा; चिऱ्यांनी बांधलेला ओटा; इमारत बांधण्यापूर्वीचे चिरेबंदी काम

★ ‛विस्तारित शब्दरत्नाकर’नुसार :

* जोते (न.) = घराचा चौथरा.

चिमणराव Tue, 18/06/2019 - 09:38

मोजो ब्लूज.
कर्नाटकातल्या कूर्ग (हल्लीचे माडिकेरी)च्या उत्तरेस असणाऱ्या मोजो गावातून ब्लूज संगित निर्माण होण्याचे कारण ब्रिटीशांचा हिल स्टेशन वावर?
( हॉकी, पोलो, सैन्यदलभरती याप्रमाणेच?)

कुणी कूर्ग पर्यटन केलय का?

अबापट Tue, 18/06/2019 - 11:03

In reply to by चिमणराव

हे कुठं वाचलं आचरटबाबा ? हे असलं काही ऐकण्यात नाही.
( एक तर ब्लुज चा उगम विलायतेतील नाही. तो अमेरिकेतील.
आणि त्या काळात ते विलायती गोऱ्यांमार्फत कूर्ग ला पोहचून वाढण्याची शक्यता जरा म्हणजे फारच कमी वाटते. म्हणून कुतुहुल)

नितिन थत्ते Tue, 18/06/2019 - 16:26

In reply to by चिमणराव

>>कर्नाटकातल्या कूर्ग (हल्लीचे माडिकेरी)

कुर्ग म्हणजे माडिकेरी नव्हे.

कुर्ग जिल्ह्याचे नाव कोडुगु असे आहे.
माडिकेरी हे गावाचे नाव आहे (कन्नड लोक माडिग्रे म्हणतात).

चिमणराव Tue, 18/06/2019 - 11:47

फोटो पाठवले वाटसपला पाहा. कॉपीराइट आहे पुस्तक.
इतरांसाठी -
आउटलुक मासिकाच्या Outlook traveller gateways, trekking holidays in India या पाचशे पानी पुस्तकात माडिकेरी /कर्नाटक ट्रेकसमध्ये उल्लेख आहे.
मलयालम kappa चानेलवरही आज mojo music program दिसतो आहे.

अबापट Wed, 19/06/2019 - 09:00

In reply to by चिमणराव

ही शक्यता तर्काच्या आधारावर अवघड वाटते. ब्लुज हा (अधिकृत रित्या, म्हणजे जेव्हा एखादी रेकॉर्ड तयार व्हायला लागली वगैरे...) तसा जेमतेम शंभर वर्षापूर्वीचा फॉर्म. अमेरिकेतील माजी गुलामांच्या पुढच्या पिढ्यांकडून जागा ठेवला गेलेला. जॅझ प्रमाणेच याला अभिजन मान्यता मिळायला उशीर लागलेला.( आणि जॅझ, रॉक अँड रोल वगैरेएवढी प्रसिद्धी , लोकप्रियता न मिळालेला)
या पार्श्वभूमीवर तो इकडे कूर्ग मधील आदिवासींपर्यंत पोचून, रुजून त्याचे संवर्धन होणे हे अशक्य नसले तरी अवघड वाटते.
अशी शक्यता जास्त , की मोजो रेनबो रिसॉर्टचा मालक जो ब्लुजप्रेमी आहे आणि त्याच्याकडे बरेच कलेक्शन असणे व त्याने ( गेल्या दहावीस वर्षे )त्या भागात .... वगैरे ?
अजून शोध घ्यायला पाहिजे.
तुम्हाला आदिवासी परंपरा वाढवली वगैरे का वाटले ते सांगा, तिथून सुरुवात करू,।

चिमणराव Wed, 19/06/2019 - 09:57

आदिवासी असं मी लिहिलं तिथले अगोदरचे रहिवासी या अर्थाने पण 'लोनली प्लानीट ' पु स्तकातली माहिती सांगते की //तिथले कोदावू लोक हे ब्रिटिशांनी आफ्रिका किंवा दुसरीकडून आणलेल्या कुर्द गुलामांचे वंशज असण्याची शक्यता आहे. ते बरेचसे ब्रिटीश आवडीनिवडी राखून राहिले. भारत स्वतंतर झाल्या्वर त्यांची संस्कृती वेगळी असल्याने वेगळ्या राज्याची मागणी करत होते तरीही १९५६ मध्ये कर्नाटकात टाकण्यात आले. //

जो रेनबो रिसॉर्टचा मालक जो ब्लुजप्रेमी आहे आणि त्याच्याकडे बरेच कलेक्शन असणे व त्याने ( गेल्या दहावीस वर्षे )त्या भागात .... वगैरे ?

- होय. लेखातल्या ओळींचा अर्थ लागला. Mojo नावाचे गाव नसून Mojo Rainforest Retreat या हॉटेल मालकाकडे त्या गाण्यांच्या बऱ्याच रेकॉर्डस आहेत. कालच मलयालम चानेलवर मोजो म्युझीक लागल्याने गोंधळ पक्का झाला.

एकूण माडिकेरी, कोडगू प्रांतात मुक्काम ठोकल्याशिवाय खजीना हातात लागणार नाही.