डाव मांडावा नव्याने आणि द्यावी मात मी..

डाव मांडावा नव्याने आणि द्यावी मात मी
खेळ दैवा चाल! बघ केली नवी सुरुवात मी

पांढर्‍या काळ्या पटावर सज्ज सारे मोहरे
कोण चाले चाल तिरकी, तर कुणी मागे सरे
लावते बाजी नव्याने आत्मविश्वासात मी
खेळ दैवा चाल! बघ केली नवी सुरुवात मी

दुष्मनाची ओळखूनी चाल मीही खेळते
वाकडी वा थेट प्यादी मी पणा'ला लावते
चेक आणी मेट नाही व्हायचे इतक्यात मी
खेळ दैवा चाल! बघ केली नवी सुरुवात मी

घेरले चारी दिशांनी एकटीला तू पुन्हा
ठाव मजला जीवघेणा डाव हा आहे जुना
जीत इतुकी ना तुला रे द्यायचे स्वस्तात मी
खेळ दैवा चाल! बघ केली नवी सुरुवात मी

- प्राजु

field_vote: 
1.666665
Your rating: None Average: 1.7 (3 votes)

प्रतिक्रिया

दैव आणि बुद्धिबळ!

उमर खय्याम ची रुबाई (फित्झजेराल्डचे इंग्रजी भाषांतर) आठवले :
But helpless Pieces of the Game He plays
Upon this Chequer-board of Nights and Days;
Hither and thither moves, and checks, and slays,
And one by one back in the Closet lays.

पण इथे कवयित्रीला सोंगटी व्हायला नको, नशिबाची प्रतिस्पर्धी व्हायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता सुबोध आहे. आम्हालाबी कळतीया म्हंजे सुबोधच म्हनायच. कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कविता आवडली!
बर्‍याच दिवसांनी लिहिलीस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त. दैवाशी चार हात करण्यासाठी पुन्हा हुरुप आला कविता वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान
कविता आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आवडेश एकदम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

अप्रतिम... खूप आवडली कविता...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

कवितेतला सकारात्मक, आश्वासक, दृष्टीकोन आवडला. कठीण विषयावर सहज, सुंदर, आशयगर्भ काव्य करणं अवघड असतं, पण तुम्ही ती किमया उत्कृष्ट साधलीत. कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा इंग्रजी ब्लॉग : http://countrysideamerica.blogspot.com/

कविता आवडली. आव्हान देणारी खंबीर आणि आत्मविश्वासी अशी वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0