Skip to main content

लघुकथा - आनंद

1 minute

आनंद
----------------------------------------------------------------------------------------------------
कपडे चढवताना तिने त्याला खुषीत डोळा मारला .
“मजा आली ! ”
तिच्या या वाक्यावर तो चमकला. एक धंदेवाली असं म्हणते ?...
त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तीच पुढे म्हणाली , “प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा असं माझं तत्व आहे. जग दुःखाने भरलेलं आहे . आपण का दुःखी व्हायचं ? हे काम करताना पैसाही मिळतो . पण मी त्या कामाचाही आनंद लुटते –मनापासून ! इतर पोरींसारखं नाही “…
ती एक कॉलेजतरुणी होती , ऐश करण्यासाठी पैसा मिळवायला हे काम करणारी.
खच्च्यॅक !
तिच्या मानेतून लालभडक रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या .
त्याचा चाकू तिच्या मानेत रुतला होता. तिच्या डोळ्यात अविश्वासाची भावना होती.
तो सीरिअल किलर म्हणाला , “ तुझ्यासारख्या रांडांना गाठून त्यांना खलास करण्यात मलाही आनंद मिळतो- मनापासून ! कळलं?” …
---------------------------------------------------------------------------------------------

Node read time
1 minute

'न'वी बाजू Fri, 27/09/2019 - 01:51

खच्च्यॅक !
तिच्या मानेतून लालभडक रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या .
त्याचा चाकू तिच्या मानेत रुतला होता.

(हे रूपक मानल्यास) महाअश्लील!!!