जागतिक अन्न दिवस

आज (१६ ऑक्टोबर)जागतिक अन्न दिन आहे. प्रत्येक व्यक्तीचा अन्न हा मूलभूत अधिकार आहे. पोषक आहार, ताजी हवा आणि शुद्ध पाणी हे जगण्यासाठीचे मूलभूत घटक आहेत. परंतु भारतासारख्या देशात मोठे भेदभाव असणारे चित्र दिसते, जेथे काही लोक संस्कृती आणि प्रतिष्ठेच्या नावावर जेवणाचा आनंद घेतात. तर काहीजण पोटाची खळगी भरण्यासाठी पुरेसा पोषक आहार घेऊ शकत नाहीत. एस.डी.जी.चे एक महत्त्वपूर्ण लक्ष्य आहे अर्थात जगात 2030 पर्यंत “कोणीही भुकेला राहणार नाही”. स्त्रिया, मुले, आजारी लोक, आदिवासी, गरीब असा समुदाय अन्नाच्या बाबतीत असुरक्षित दिसतो. एकीकडे जंक फूड, प्रक्रिया केलेले, साठवून ठेवलेले अन्न पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून लठ्ठपणा, कुपोषण, आरोग्य समस्यांचा थैमान आहे.
नुसते दिवस साजरे करून आपण अन्न व त्या संबधित समस्या सोडवू शकू का? निदान समाजात खान पानाच्या योग्य सवयीविषयी जागृती घडू शकलो तरी खूप आहे असे वाटते.

field_vote: 
0
No votes yet