मोकळं मोकळं वाटतंय
दुटांगी धोतर
1 minute
टाचांच्या भेगा झोंबत नाहीएत
गुडघे दुखत नाहीएत
पाठीतून कळ येत नाहीए
सततचा खोकला थांबला एकदाचा
जवळचं लांबचं सगळं व्यवस्थित दिसतंय आता
हातपाय थरथरत नाहीत
छातीत दुखत नाही
सारखं लघवीला लागल्यासारखं वाटत नाहीए
डोकं जड जड झाल्यासारखं वाटत नाहीए
प्रकाशाचा त्रास होत नाही
कान किटत नाहीत
भाजतसुद्धा नाहीए अजिबात...
मोकळं मोकळं वाटतंय
Node read time
1 minute
खपल्यावर
मोकळ मोकळ वाटतय असय वाटत हे?