Skip to main content

गरगर गरगर

गरगर गरगर फिरतो पंखा
आजोबांना येतात शिंका

घरघर घरघर फिरतो मिक्सर
आजी म्हणते "आली चक्कर"

शूs शूs शिट्टी कूकर देतो
"भात शिजला" मम्मिला म्हणतो

टिंग्टाँग टिंग्टाँग वाजते बेल
पप्पा येतात घेऊन भेळ...

सगळे जेव्हा जातात झोपी
घड्याळ करते टिकटिक मोठी

- ग्लोरी

राजन बापट Sat, 07/04/2012 - 23:59

पुनःश्च स्वागत.

कविता पूर्वी इतक्या कवितांइतकी गमतीशीर वाटली नाही. पण या निमित्ताने तुम्ही परत आलात. उत्तम झालं.