सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही. सॅम पित्रोडा म्हटलं तर मात्र ब-याचजणांना आठवण येइल त्यांच्या वैषिष्ट्यपुर्ण केशरचनेमुळे डॉक़्टर ए पी जे अब्दुल कलामांची आठवण करून देणा-या एका भन्नाट व्यक्तीमत्त्वाची. भारतातील संचारक्रांतीचे प्रणेते, दूरसंचार क्षेत्रातील अनेक नव्या आविष्कारांचे जन्मदाते, नव्या कल्पनांचे जनक, आणि सध्या पंतप्रधानांचे तंतज्ञानविषयक सल्लागार असलेल्या सॅम पित्रोडांचं नाव नुकतंच पुन्हा एकदा चर्चेत आलं ते येत्या जुलै महिन्यात होणा-या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांच्या निमित्ताने.

चर्चा आहे की पित्रोडांचं नाव कॉंग्रेसतर्फे पुढं केलं जाण्याची दाट शक्यता आहे. जर तसं झालं, तर या नावाला क़ुणाचाच विरोध असण्याचं काहीच कारण असणार नाही. भारताला डॉक्टर कलामांनंतर आणखी एक परिणामकारक आणि प्रभावी राष्ट्रपती प्राप्त होईल यात शंकाच नाही. शिवाय पित्रोडांचा स्पष्टवक्ता तसेच मार्मिक स्वभाव, विविध विषयांवरील त्यांचा प्रगल्भ व्यासंग आणि मुख्य म्हणजे संवाद साधण्याची अचंबीत करणारी क्षमता या सगळ्या गोष्टी त्यांना एक 'डायनॅमिक' प्रेसीडेंट बनवायला मदतच करतील. जन्म गुजराती कुटुंबातला असल्यामुळे मातृभाषा गुजराती; कुटुंब ओरिसातल्या तितलागढ येथे स्थायिक झालेले असल्यामुळे ओरीया आणि बंगाली; आधी शिकागो आणि मग दिल्ली ही कर्मभुमी असल्यामुळे ईंग्रजी आणि हिंदी; शिवाय आयुष्याच्या अनुभवाने आलेल्या जर्मन आणि रशियन सह अन्य अनेक भाषांमध्ये पित्रोडा बिनधास्त संवाद साधू शकतात. मुळात संवाद साधणे हाच या माणसाचा मुळ पिंड आहे. म्हणुनच आपल्या कल्पना आणि संकल्पशक्तीच्या जोरावर अवघ्या भारत देशाला संवाद साधणं सोपं करून देण्यात ते यशस्वी झालेत.

पित्रोडांचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे सुतारकाम. त्यांच्या वडिलांना या कामानिमित्त गुजरात सोडून ओरिसात स्थायिक व्हावं लागलं होतं. तेथेच १९४२ साली सत्यनारायणचा जन्म झाला. शिक्षणासाठी मात्र वडिलांनी मोठ्या भावासह त्यांना गुजरातमध्ये पाठवलं. याचं कारण म्हणजे गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव. गुजरात ही गांधीजींची जन्मभुमी असल्यामुळे मुलांना गांधी विचारांचं बाळकडू शिक्षणाबरोबरच मिळेल या उद्देशाने वडिलांनी त्यांची रवानगी वडोद-याला केली.ईथल्या सयाजीराव विद्यापिठातुन भौतिकशास्त्रात पदवी घेऊन सत्यनारायणने थेट शिकागो गाठलं. सांगायचं कारण होतं उच्च शिक्षणासाठी! मात्र मुळात २२ वर्षाच्या या तरूणाला ओढ लागली होती ती अमेरिकेच्या चांद्रमोहिमेची. अमेरिका मानवाला चंद्रावर पाठवणार या कल्पनेनंच तो भारावून गेला होता. या मोहिमेत आपणही काहीतरी करून सहभागी व्हावं याच उद्देशाने त्याने शिकागोच्या ईलिय़ॉनिस ईन्स्टीट्युटमधून ईलेक्ट्रॉनिक ईंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. अमेरिकेचं नागरिकत्त्वही मिळालं. सत्यनारायण पांचाल चा सॅम पित्रोडा झाला. शेवटी चंद्रावर मात्र निल आर्मस्ट्रॉंग गेला. सॅमने घेतलेलं शिक्षण डिजिटल टेलिकॉम स्विचिंगचं मशिन बनवण्याच्या कामी आलं. काही दिवस वेगवेगळ्या ईलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी काम करता करताच १९७०च्या सुरूवातीला काही मित्रांसमवेत त्यांनी स्वतःची ‘वेसकॉम’ नावाची कंपनी स्थापन केली. एकामागोमाग एक अशी पन्नासहून अधीक टेलीकॉम उपकरणे त्यांनी तयार केली. त्या सर्वांचं पेटंटही घेतलं. दहा वर्षांनंतर ही कंपनी रॉकवेल ईंटरनॅशनल्स मध्ये विलीन करतांच सॅम पित्रोडा करोडपती झाले. त्यानंतर सहज म्हणुन भारत भेटीवर आले असता तो प्रसंग घडला, ज्याने पित्रोडांचं जीवन आणि आपलं संचारविश्व बदलवून टाकलं.

ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पित्रोडा थांबले होते, तीथून त्यांच्या पत्नीला काही केल्या फोन लागेच ना. शेवटी त्यांना घरी जाऊनच बायकोला भेटावं लागलं. तेव्हाच त्यांनी निश्चय केला, की आता बास झालं पैशाच्या मागे धावणं. आता मातृभुमीसाठी काम करण्याची वेळ आली. भारतातली संचारसेवा अद्ययावत करण्याची एक प्रभावी योजना त्यांनी तयार केली, आणि ती ऐकवण्यासाठी सरळ पंतप्रधानांचीच म्हणजे ईंदिरा गांधींची भेट मागीतली. त्यांची भेट १० मिनिटांच्या वर मिळे ना, आणि पित्रोडांना हवा होता एक तास! मग मंत्रालयाच्या वा-यांवर वा-या सुरू झाल्या. अनेकदा वाट पाहून परत जावं लागलं, तर अनेकदा ईंदिराजींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ठरलेली मिटिंग रद्द झाली. दरम्यानच्या काळात नुकतेच राजकारणात आलेले, देशोदेशी फिरलेले आणि तंत्रज्ञान ब-यापैकी कळणारे राजीव गांधी पित्रोडांच्या संपर्कात आले, आणि दोघांची मैत्री झाली. राजीवजींच्या मध्यस्तीने त्यांनी ईंदिराजींची भेट मिळवली आणि आपलं पहिलंवहिलं प्रेझेंटेशन केलं. यानंतर ईंदिराजींनी त्यांना आपल्या नवरत्नांमध्ये स्थान दिलं, ते नेहमी करीताच. "मॅडम, तिकडे शिकागोला माझ्याकडे लोकांना भेटायला वेळ नाही. सहा सहा महिने लागतात माझी अपॉईन्टमेन्ट मिळवायला. आणि ईकडी मी तुमची वेळ घेण्यासाठी सहा महिन्यांपासुन अक्षरश: फे-या मारल्यात," अशी शालजोडीतून सुरवात करून सुरू केलेलं पित्रोडांच पहिलंच प्रेझेंटेशन गांधीं मातापुत्रांचं मन जींकून गेलं. यानंतर घडला तो ईतीहास.
राजीव गांधीच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अमेरिकन नागरिकत्व सोडून ते पंतप्रधानांचे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार बनले. हे काम त्यांनी तब्बल दहा वर्षे दरसाल अवघा एक रुपया नाममात्र वेतन घेऊन केले. वीस वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेल्या 'पीसीओ ' क्रांतीचे पित्रोडा शिल्पकार ठरले.

आज गावोगावी , गल्लोगल्ली दिसणाऱ्या ' पब्लिक टेलिफोन बूथ ' च्या मागे दूरभाष सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठीची पित्रोडा यांची कल्पकता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबलेल्या तंत्रज्ञांच्या पलटणींचे परिश्रम आहेत. राजीव गांधींच्या घातपाती मृत्यूनंतर , जवळची सर्व बचत संपत आल्यानंतर पित्रोडा १९९३ साली अर्थार्जनासाठी अमेरिकेला परतले व तेथे स्थायिक झाले. संयुक्त राष्ट्रसंघाने मागास देशांत टेलिकॉम सेवेचा प्रसार करण्यासाठी स्थापलेल्या ' वर्ल्डटेल ' या संस्थेचे ते अध्यक्ष झाले. या संस्थेच्या अनेक उत्पादनां ची पेटंट्स त्यांचीच आहेत. शिकागोत स्वत:च्या मालकीच्या काही छोट्या तंत्रज्ञान कंपन्या पित्रोडा आपल्या कुटुंबाच्या (पत्नी व दोन मुलांच्या) चरितार्थासाठी चालवित होते. भारतातील घडामोडींवरही त्यांची नजर होतीच. शिवाय त्यांच्यावर नजर होती भारतातील नेतेमंडळींची. म्हणुनच डॉक्टर मनमोहनसिंग पंतप्रधान झाल्यावर पित्रोडांना परत एकदा भारतात येण्याचं निमंत्रण मिळालं. विज्ञान महामंडळाचे ते अध्यक्ष झाले. पंतप्रधानांचे तत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागार बनले. आता वेळ होती मोबाईल आणि ब्रॉडबॅण्ड क्रांतीची! ही क्रांती आपण अनुभवतो आहोतच. अगदी वानगीदाखल सांगायचं झालंच तर आज लक्षावधी लोक मोबाईलवरून आर्थीक व्यवहार (फंड ट्रान्सफर, ऑनलाईन बॅन्कींग, बिल पेमेन्ट ई.) करण्यासाठी वापरतात ते 'वन वॉलेट' तंत्रज्ञान पित्रोडांचंच पेटंट आहे.

'पॉलीसी मेकींग़' अर्थात योजना बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. म्हणुनच भारत सरकारच्या रेल्वे नविनिकरणापासुन ते ऑनलाईन लायब्ररीपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. सध्या त्यांचा एक पाय भारतात, एक अमेरिकेत असतो. शिवाय लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतही शिक्षणविषयक योजनांकडे ते लक्ष देतात. भारतातही शाळांचे संगणकीकरण, ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅण्डने जोडणे, भारतीय पारंपारीक वैद्यकशास्त्राचे पुनरुज्जीवन ईत्यादी सामाजीक महत्त्वाचा तांत्रीक कामामध्ये हल्ली त्यांनी लक्ष घातले आहे. तंत्रज्ञानातून सर्वांगीण प्रगतीचा हेतू साध्य करणारे पद्मभुषण सॅम पित्रोडा पुढे येऊ पाहणा-या मोठ्या जबाबदारीलाही याच आत्मविश्वास आणि स्मीतहास्यासह सामोरे जातील, यात शंका नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

सॅम पित्रोडा सर्वार्थाने योग्य असे नाव सध्याच्या चर्चेत आले आहे याचे समाधान आहे. होतील की नाहीत हे शेवटी संसद सदस्य आणि विविध विधानसभागृहात बसलेली आणि नेत्यांच्या आदेशाचे मुकाट पालन करणारे मतदारच ठरविणार आहेत. पण या निमित्ताने विविध चॅनेल्सवर काही चांगल्या चर्चा चालू आहेत तिथे फक्त एकदाच 'सॅम' चे नाव आले होते. सीएनएन-आयबीएनकडून या चर्चेत आणि देशातील अनेकविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे नागरीक तसेच खासदार-आमदार यांच्याकडूनही या संदर्भातील मते [इंग्रजीत 'Mood' अशी शब्दयोजना अ‍ॅन्करने केली] एकत्रित केली जात आहेत. संभाव्य नावात १. प्रणब मुखर्जी आणि २. ए.के.अ‍ॅण्टोनी ही दोन राजकारणातील आणि ३. नारायणमूर्ती हे सॅम यांच्या परंपरेतील अशी तीन नावे सध्या आहेत. [वैशिष्ट्य म्हणजे संभाव्य नावात कुठेच 'महिला' नामाचा उल्लेख नाही.]
अर्थात यात सॅम पित्रोडा यांचे नाव कालअखेरपर्यंत नव्हते. पण आज [रविवार] दिवसभर स्टार न्यूज आणि आजतक या दोन चॅनेल्सवर या नावाचा उल्लेख झाला. [तसे आजचे बातम्यांचे फूटेज झरदारी यानीच खाल्ले असल्याने, उद्यापासून या नावांवर परत तू तू मै मै होत राहण्याची प्रक्रिया चालू होईल.

बाकी श्री.चैतन्य यानी दिलेली सॅम पित्रोदा यांची माहिती प्रभावी आहे.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याकडे कसं सगळं व्यक्तीकेंद्रित आहे. जे काम एका संस्थेने केले पाहिजे होते त्याचे सगळे श्रेय एका माणसाला दिले जाते. संस्थात्मक विचार कधीच करता येणार नाहीय का?
सॅम पित्रोडा, नारायण मूर्ती हे थोर आहेतच आणि त्यांनी राष्ट्रपती व्हायला वगैरेही हरकत नाही (तसाही त्या पदावर बसून काय करतो माणूस हा प्रश्नच आहे), पण एकेका क्षेत्रात एकेका माणसाला अवाजवी ग्लॅमर मिळू नये असे वाटते. रॉकेट म्हटलं की कलाम, फोन म्हटलं की पित्रोडा आणि आयटी म्हटलं की मूर्ती असं का? अमेरिका चंद्रावर गेली तर त्याचे श्रेय नासाला मिळाले, तिथे कोणी एकच माणूस अमेरिकेच्या अंतराळ कार्यक्रमाचा पिता होऊन वेटोळे घालून बसला नाही.
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी योग्य बोललास बघ निरंजना तू. अगदी पूर्वीपासून हे होतेय. ५० च्या दशकात तर काय विचारता? नेहरूच देशभर मोठ्मोठी धरणे बांधायचे,परराष्ट्रनितीही ठरवायचे. नेहरूवाद का म्हणतात तो.बांग्लादेशचे युद्ध जि़कले ते इंदिरा गांधींनी. त्याबद्दल त्यांना भारतरत्न पण.
आपला समाजच व्यक्तिकेंद्रित असल्याने असे होते बहुतेक.
अवांतर- कोणाला दुखावण्याचा वा अपमानित करायचा हेतू नाही पण कलाम हे DRDOमध्ये तांत्रिकी कामापेक्षा व्यवस्थापन कौशल्याबद्दल जास्त ओळखले जायचे. फ्रंटलाईनमध्ये ह्यांनी मध्यंतरी लेख वाचून दाखवला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>नेहरूच देशभर मोठ्मोठी धरणे बांधायचे,परराष्ट्रनितीही ठरवायचे.

हा हा हा. हल्ली नरेंद्र मोदी असेच हायवेवर स्वतःच डांबर ओतून ते गुळगुळीत करतात म्हणे. वीजनिर्मितीही करतात.

असो. नेहरू धरणे बांधायचे (मोदी हायवे बांधतात) याचा अर्थ रमाबाईंसारख्या बुजुर्ग मावशींना कळतच असावा असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सॅम पित्रोदा यांची उत्तम माहिती वाचायला मिळाली. दूरसंचार क्षेत्रातील सी डॉट एक्स्चेंज हे ग्रामीण भाग व छोट्या कंपन्यांसाठी वरदान ठरले. त्याचे श्रेय पित्रोदांना जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

जर एखादी व्यक्ती कर्तृत्त्ववान असेल तर तिला राष्ट्रपती करावं का असा प्रश्न मला अनेकदा पडतो. आपल्या प्रशासन पद्धतीत राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख आहे. त्याला फारसे अधिकार, कर्तृत्त्व दाखवायची शक्यता नसता तिथे कर्तृत्त्ववान व्यक्ती का ठेवावी? त्यापेक्षा त्या वक्तीची आपल्या कुशलतेने देशाच्या प्रश्नात थेट गुंतवणूक अधिक फायद्याची नाहि का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी मनातले बोललात ऋषिकेशराव. एखादी व्यक्ती एका क्षेत्रात उत्युंग कर्तुत्व दाखविलेली असली तरी ती व्यक्ती सगळ्याच क्षेत्रात तितक्याच भरार्या मारेल हे म्हणणेच मुळात चुकीचे आहे. राष्ट्रपती पदाला आपल्या राज्यव्यवस्थेत फारसे अधिकार नसतात. अशा ठिकाणी इतका शिकलेला आणि कर्तबगार माणूस कशाला हवा? नोबेल पारितोषिक मिळवायची पात्रता असलेला एखादा माणूस जर उद्या पोस्टात काऊंटरमागे बसून पोस्टाची तिकिटे विकायला लागला तर ते योग्य होईल का? कलाम, पित्रोदा असे राष्ट्रपती म्हणजे तितकयाच पात्रतेचा माणूस पोस्टाऐवजी राष्ट्रपती भवनात बसून शिक्के मारायचे काम करणारा माणूस ठरेल. अशा माणसाला राष्ट्रपतीपदासारखे भपकेदार पण पोकळ पद कशाला द्यावे? त्यापेक्षा त्यांना त्यांच्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करायला वाव दिला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

सहमत आहे.

कलाम यांनी राष्ट्रपती म्हणून विशेष भरीव कामगिरी* केल्याचे दिसत नाही.

*(सोनिया गांधींना पंतप्रधान होण्यापासून रोखले असा काल्पनिक दावा मात्र आहे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पित्रोडांच्या कर्तृत्वाबाबत प्रश्न नाही. पण ऋषिकेश म्हणतात त्याप्रमाणे कामाची गरज आणि त्या कामासाठी लागणारी गुणवत्ता पाहता पित्रोडांचे नाव वाचून काही विशेष होईल असे वाटत नाही. हं! देशाच्या इतिहासात त्यांचे नाव औपचारिकपणे काही काळ राहील इतकेच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"त्या कामासाठी लागणारी गुणवत्ता पाहता पित्रोडांचे नाव वाचून काही विशेष होईल असे वाटत नाही."

~ सविता,
एक लक्षात घ्या. 'राष्ट्रपती' या पदावर निवड झालेल्या व्यक्तीला काय अधिकार आहेत, किंवा त्याच्याकडून काय अपेक्षित आहे याविषयी कितीही उलटासुलटा खल घातला आणि शेवटी त्यातून सार असे निघाले की, देशाच्या धोरणाच्या वा प्रगतीच्या दृष्टीने त्या पदावरील व्यक्तीचे महत्व 'शून्य' आहे; म्हणून तिथे विराजमान होणारी व्यक्ती कुठल्यातरी झेड.पी. सदस्य पातळीवरील तरी असू शकणार नाही ?

डॉ.राजेन्द्र प्रसाद, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ.झाकीर हुसेन यांच्यासारख्या आदरणीय नावानंतर जरूर राजकारणातील चढउतारांचा लेखाजोखा लक्षात घेऊन अन्यांना अप्रिय वाटू शकणार्‍या काही व्यक्तींची त्या पदासाठी निवड झाल्याची उदाहरणे आहेत. पण राजकारणी लोकांना तसा विचार करावा लागत असल्यास तो त्यांचा दोष मानता येणार नाही. ते पद महत्वाचे नसून 'प्रतिष्ठे' चे आहे हे जर गृहित धरले तर त्या पदावर निवड होणार्‍या व्यक्तीचा सी.व्ही.देखील तितक्याच दर्जाचा असावा इतकी माफक अपेक्षा. सॅम पित्रोडा यांची निवड होवो वा ना होवो, पण त्यांचे नाव चर्चेत आले म्हणजे त्यानी कोणत्यातरी क्षेत्रात तितकी प्रतिष्ठा प्राप्त केली आहे, हे तरी मान्य व्हावे.

उद्या इथल्या एखाद्या सदस्यास 'पद्म' पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित केले, तर त्याला/तिला श्रीमती प्रतिभा पाटील यांच्यापेक्षा सॅम पित्रोदा यांच्याकडून तो पुरस्कार स्वीकारताना आनंदच होईल. पुरस्कारापेक्षाही तो ज्यांच्याकडून दिला जातो ती व्यक्ती त्याच तोलामोलाची आहे हे पाहिले गेले तर सध्या त्या पदाबाबत चाललेला विचारविनिमय योग्य म्हटला पाहिजे.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशोकभाऊ, राष्ट्रपती पदाला एक प्रकारची प्रतिष्ठा आहे - निदान असावी - याबाबत दुमत नाही. पित्रोडा आले तर त्यांच्या हातून सन्मान स्वीकारणे कोणालाही आवडेल - आणखी कोणा निव्वळ राजकारणी व्यक्तीच्या हातून घेण्यापेक्षा. पण पित्रोडांना असल्या कामात रस वाटेल का? आणि त्या पदाच्या मर्यादा लक्षात घेता ते त्या पदावर राहून खरच काही भरीव काम करू शकतील का? - असे प्रश्न माझ्या मनात होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॅम पित्रोदांना राष्ट्रपती पदामध्ये रस वाटेल असे मलाही वाटत नाही, कारण त्यांच्यासारख्या व्यक्तीला कामासाठी २४ तासही अपुरे वाटतात. आणि त्या पदावर तर दिवसातील सारा वेळ केवळ सन्माननीय पाहुण्यांच्यासमवेत हस्तांदोलनातच जाणार. तरीही त्यांचे नाव अचानकच चर्चेत आले आहे म्हणून त्या दृष्टीने प्रोज अ‍ॅण्ड कॉन्सचा विचार. शेवटी फॉर्मवर सही करण्यापूर्वी त्याना त्या पदाभोवती असलेल्या जाळ्या विचारात घ्याव्याच लागतील आणि जर सही केलीच तर मग त्याना त्या कामात रस आहे असे म्हणणे आपल्याला भाग पडेलच.

पाहू...घोडामैदान आता एक-दोन महिन्याच्या अंतरावरच आहे.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0