मन

मन

मन भरून भरून आले
घनश्यामल नभ झाकळले

मन ओलेचिंब नहाले
आषाढसरी मेघ वर्षले

मन वाऱ्यासंगे भिरभिरले
अवखळ निर्झर खळखळले

मन पिसे बावरे खुळावले
जलदांनी इंद्रधनू लपवले

मन गहन गूढ हुरहुरले
जळ गडद डोहतळी साकळले

मन वेदनेत ठसठसले
आणि प्रपाती कोसळले

मन शांत निमग्न विसावले
ओंजळीतून अर्घ्य वाहिले.

कांचन

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! तुमची बायपोलर डिसॲार्डरची माहिती वाचून, २५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या या कवितेची आठवण झाली. मनाच्या अनेक अवस्थांचं वर्णन कवितेत होतं, म्हणून प्रकाशित केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0