मागणं

मागणं

डायरीची काही पानं अजून कोरीच दिसतात
आयुष्याची काही वर्षंही आज गुलदस्तात

काय लिहावं या कोऱ्या पानांवर,
जुन्या आठवणी? नको, त्यात कडू गोड आणि बरंच काही,
काही प्रश्न अनुत्तरित, उत्तरं नाहीत अजूनही!

लिहावं एखादं हळवं गीत, शब्दांत गुंतवणारं,
पूरियाच्या स्वरांसारखं हलकेच मनाला शांतवणारं!

काय लपलं असेल आयुष्याच्या अवगुंठित क्षणांत?
सुखदु:खाचे तरंग तर असायचेच जीवनप्रवाहात!

पण दुःखाचे डोह नकोत आणि नकोत सुखाच्या लाटा;
पुढच्या प्रवासासाठी हे इतकंच मागणं आता!

समुद्रात सामावताना सारे प्रवाह एक व्हावेत,
तुफानं, वादळवारे, लाटांचे खळाळ शांत व्हावेत!

नकोत मोठी जहाजं अन् गलबतं,
काही छोट्या नावा तेवढ्या असाव्यात तरंगत, साथ करत, शेवटपर्यंत..........!

कांचन सापटणेकर

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

डायरीची काही पानं अजून कोरीच दिसतात

काही छोट्या नावा तेवढ्या असाव्यात तरंगत, साथ करत, शेवटपर्यंत..........!

गटाराच्या पाण्यात छोट्याछोट्या कागदी नावा, होड्या सोडायला मजा येते.

डायरीची पाने (कोरी किंवा भरलेली) फाडून, त्यांच्या नावा बनवून गटारात सोडायला हरकत नाही.

तेवढाच वेळेचा सदुपयोग... आणि कागदाचा!

(डायरीच्या पानावर कविता लिहिलेल्या असल्यास उत्तम!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणा एका क्षुद्र जुन्या बाजूच्या ढम्म्म्म रिकाम्या न्हाव्याने आपल्या दुकानातल्या एका भिंतीला तुंबड्या लावण्याच्या आपल्या अप्रतिम कौशल्याचे विनामूल्य प्रदर्शन करून लोकांवर खूप उपकार केले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक मराठी असामी

इथे त्या जगजीतसिंग नावाच्या पंजाब्याने जर 'वो काग़ज़ की कश्ती, वो बारिश का पानी' वगैरे लिहिले असते, तर तुम्ही - एका मराठी असामीने - त्याला डोक्यावर घेतले असतेत. आणि मी तेच फक्त माझ्या शब्दांत मराठीत लिहिले, तर माझी (तीही नसलेली) जात काढलीत. असो चालायचेच.

(अवांतर/सहज कुतूहल: न्हाव्यांशी नक्की काय वाकडे आहे हो तुमचे?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता चांगली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक मराठी असामी

धन्यवाद, एक मराठी असामी! तुमच्या प्रतिसादांमुळे कविता प्रकाशित करण्याचा आत्मविश्वास निश्चितच वाढला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर आहे कविता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या कवितांना appreciate केल्याबद्दल मनापासून धन्यवाद, सामो. नवीन सभासदांना अशा प्रोत्साहनाची गरज असते. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"मी तेच फक्त माझ्या शब्दांत मराठीत लिहिले" असे "नवी बाजू"ने माझ्या उल्लेखासकट लिहिले आहे.

मी स्तुतीपर लिहिले होते कोणा एका क्षुद्र जुन्या बाजूच्या ढम्म्म्म रिकाम्या न्हाव्याने लोकांवर केलेल्या उपकारांबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक मराठी असामी

मला आता हसावं की रडावं कळेनासं झालंय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगली आहे हो कविता. हसत रहा.

आणि राहता राहिला न बा यांच्या प्रतिसादाचा प्रश्न. तर नबा काय चीज आहेत ते समजायला खूप काळ जावा लागेल. नबा मनाने चांगलेच आहेत असं ३४.५३% खात्रीने म्हणता येईल.

पण स्वभावाला काय करणार.. नवी बाजू यांनी काही कौतुक वगैरे केलं तरच काहीतरी काळंबेरं आहे असं समजावं. एरवी ऑल ओके.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबा मनाने चांगलेच आहेत असं ३४.५३% खात्रीने म्हणता येईल.
हा आकडा तुम्हाला कसा कळला ? याचे कुतुहल आज लंगडा च कसा लागला ( सामान्य भाषेत इंग्रजी सात कारण याला एकच पाय असतो म्हणुन मटकापटु यास लंगडा म्हणत असत असे जनरल नॉलेज वरुन माहीत आहे ) याचे कोडे अट्टल मटकापटु ला पडते तसे मला पडलेय.
यामागे काही गुढ गणिती प्रमेय सिद्धांत आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

मुळात नबांना मन आहे, या गृहीतकामागील आधार काय?

चांगलेवाईटपणा, टक्केवारी वगैरे तर फार पुढची गोष्ट झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो, तीही शक्यता १२.७८% आहेच. नबा हे वास्तविक नबॉट असणं शक्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबा हे वास्तविक नबॉट असणं शक्य आहे.

आपण यांना पाहिलेत काय? आमचे मानसगुरुबंधू तथा आमच्यापुढील परमादर्श!

यांची ही रचना सुप्रसिद्ध आहे.

असो.

----------
येथे 'गुरुबंधू' ही संज्ञा 'वडील बंधू' या अर्थाने (रादर अनऑर्थॉडॉक्सरीत्या) वापरली आहे.

वैधानिक इशारा: पीडीएफ उतरवून घेण्यास बऱ्यापैकी वेळ लागू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रथम नवी बाजु विरोधात आर्ग्युमेंट्स करतो
इथे त्या जगजीतसिंग नावाच्या पंजाब्याने जर 'वो काग़ज़ की कश्ती, वो बारिश का पानी' वगैरे लिहिले असते, तर तुम्ही - एका मराठी असामीने - त्याला डोक्यावर घेतले असतेत. आणि मी तेच फक्त माझ्या शब्दांत मराठीत लिहिले, तर माझी (तीही नसलेली) जात काढलीत. असो चालायचेच.

काहीही हं नबा
तुम्ही अगोदर जातिवंत खवचटपणाने म्हणालात की " गटाराच्या पाण्यात होड्या सोडायला मजा येते " इथे तुम्ही गटार हा शब्द जो प्रचलित अर्थाने भिकार च्या जवळ जाणारा व हीन सुचवणारा असा वापरला होता. जगजित लायन म्हणतो " वो कागज की कश्ती इथपर्यंत ठिकाय पुढे तो म्हणतो वो बारीश का पानी "
गटर का पानी नाही म्हणत तो काही. कुठे पावसाच्या पाणी कुठे आषाढस्य प्रथम दिवसे कुठे पोथीच्या पानावर बागडणारा पाण्याचा थेंब कुठे दवबिंदु अन कुठे गटार का पानी ? त्याच एक दुसर गाण आहे त्यात तो तेरे खत मै गंगा मे बहा आया हु म्हणतो तेरे खत मै गटर मे बहा आया हु असे नाही म्हणत्
बर हे सोडा मागे एकदा मी खुप पुर्वी एक इंडियन एक्सप्रेस ची एक सुंदर जाहीरात पाहीलेली आठवते ( चुकभुल देणे घेणे ) ज्यात पान भर एक मोठी मिरची चे चित्र असायचे बहुधा लाल मिरची चे एक सिंगल आणि खाली असा मजकुर की आम्ही काळाबरोबर बदलतोय वगैरे पण एक गोष्ट जी कधीच आमच्या बाबतीत बदलणार नाही ती म्हणजे आमच्यातली मिरची आमच्यातला तिखटपणा तर
तुम्ही नंतरच्या प्रतिसादात जी सारवासारव केली जी स्पष्टीकरणे दिली जो जातोमिशनल ड्रामा केला त्याने मी अधिकच व्यथित झालो. इथे एक प्रेरणदायी कथा आठवली ज्यात तो साधु पुन्हा पुन्हा पाण्यात जातो विंचु पुन्हा पुन्हा चावतो शिष्य म्हणतो ये आप क्या कर रे हो गुरुजी मग गुरु म्हणतो तो विंचु जर आपला चावण्याचा धर्म सोडत नाही तो एक्सप्रेसवाला जरए आपली मिरची सोडत नाही तर मी माझा धर्म का सोडु ?
तर नबा तुमचा प्रतिसाद केविलवाणा वाटला
एक मराठी असामी तुमचा ही दुसरा सारवासारवीचा प्रतिसाद आवडला नाही कारण आमच्यातल्या जुन्या जाणत्या जेष्ठ खवचटपितामहांना तुम्ही ज्या तडफेने तुल्यबळ खवचट प्रतिसाद दिला त्यावरुन तुम्ही आम्हाला अजित पवारांइतके तरुण तडफदार वाटलात. मला वाटलं की हो आता एक तरुण तडफदार नेत्याचा जन्म झाला पण तुम्हीही लगेच धडधडीत सारवासारव पॉझीटीव्ह वगैरे झालात
जेव्हा की तुम्ही म्हणाला होता स्पष्टपणे की
कोणा एका क्षुद्र जुन्या बाजूच्या ढम्म्म्म रिकाम्या न्हाव्याने आपल्या दुकानातल्या एका भिंतीला तुंबड्या लावण्याच्या आपल्या अप्रतिम कौशल्याचे विनामूल्य प्रदर्शन करून लोकांवर खूप उपकार केले आहेत.
यातील जुनी बाजु हा नव्या बाजु ला उद्देशुन होता हे समजण्या इतके आम्ही अजुन जुन झालेलो नाहीत हो.
तर तुम्हीही वृश्चिकवृत्तीचा वृश्चिक धर्माचा त्यागच केला असे मला वाटते
कांचन ताई तुम्ही हतबल होउ नका या दोघांनी केला तरी तुम्ही काव्यधर्माचा त्याग अजिबात करु नका अशी विनम्र विनंती आहे. तुम्ही तुमच्या कविता
करत रहा
करत रहा
करत रहा
मी तुमच्या कवितांसाठी ऐसी अक्षरे वर
पुन्हा येइन
पुन्हा येइन्
पुन्हा येइन्
आज च्या धर्मभ्रष्ट युगात तुम्ही च एक ती काय आशा आज उरलेली आहात्
असो

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

मी इथे नवीन सभासद आहे. त्यामुळे इथल्या चालीरिती मला अजून नवीन आहेत. माझ्या एका साध्याश्या कवितेवरून इथे जो वाद चालू आहे, तो माझ्या आकलनाबाहेरचा आहे. एखादी कविता आवडणं, न आवडणं हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत आवडी निवडीचा भाग असतो. एखादी कविता आवडली नाही, तर आपण तिला पूर्ण दूर्लक्षित करू शकतो. गटार वगैरे शब्द वापरून प्रतिक्रिया देत बसत नाही. विशेषत: त्यात कुठलेही आक्षेपार्ह विधान नसताना! यामागचा हेतु म्हणूनच कळत नाही. असो. या वादात ज्यांनी माझी बाजू घेतली— मी नाउमेद होऊ नये म्हणून असेल कदाचित— त्यांचे मी मनापासून आभार मानते.
कांचन सापटणेकर

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे राम.. !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भगवान श्रीकृष्ण म्हणून गेलेत... कविता पाडणे/टाकणे हा तुमचा अधिकार आहे; येणाऱ्या (किंवा न येणाऱ्यासुद्धा) बऱ्यावाईट प्रतिसादांची चिंता तुम्ही करू नयेत. असो.

हॅविंग सेड दॅट, तुमच्या (किंवा कोणाच्याही) कवितेवर, कथेवर वा अन्य कशावर, यथामगदूर बरेवाईट प्रतिसाद पाडण्यावर प्रतिसादकांचाही तितकाच पुरेपूर अधिकार आहे. एखादा प्रतिसाद आवडला नाही, तर (तुम्हीच म्हटल्याप्रमाणे) तुम्ही त्याला पूर्णपणे दुर्लक्षित ('दू'र्लक्षित नव्हे!) करू शकता. किंवा, पर्यायाने, एखादा उलटा प्रतिसाद ठेवून देऊ शकता - मर्जी तुमची! मात्र, कोणी बरेवाईट प्रतिसाद - सकारण किंवा अकारण - देणारच नाही अथवा देऊच नये, ही अपेक्षा फोल आहे.

गटार वगैरे शब्द वापरून प्रतिक्रिया देत बसत नाही. विशेषत: त्यात कुठलेही आक्षेपार्ह विधान नसताना!

गटारात तरी आक्षेपार्ह असे नक्की काय आहे? नुकताच पाऊस पडून गेलेला असताना, रस्त्याच्या काठी झालेल्या गटारांत कागदी होड्या सोडणे, यात मला बालपणीची निरागसता दिसते. (आणि हो, हे पूर्णपणे अवांतर आहे, परंतु, मला भिंतीवरच्या पालीसुद्धा आवडतात! पालींमध्येसुद्धा बालपणीच्या निरागस आठवणी दडलेल्या आहेत. असोत.) बालपणीच्या निरागसतेत नक्की काय आक्षेपार्ह आहे बरे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पालींमध्येसुद्धा बालपणीच्या निरागस आठवणी दडलेल्या आहेत.

बालपणी भिंतीवरची पाल बघून, किंचाळून कुणीतरी नबांच्या गळ्यात फिल्मीश्टाईल मिठी मारली अशी ब्लॅकंडव्हाईट चित्रफित मनात येऊन गेली. उगीच का पालीविषयी हेव्वडी कळकळ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी