घर

घर

घर म्हणजे फक्त चार भिंतींचा निवारा नाही,
घर असतं थकल्या जीवाला जोजवणारी अंगाई!

वास्तवाच्या धुमश्चक्रीत दोन हात करून येता,
घर होतं जखमेवर फुंकर घालणारी आई!

छोटे डाव, मोठे फड जिंकून येता,
घराच्याच डोळ्यात काठोकाठ अपूर्वाई!

पंख फुटल्या पाखराला निरोप देताना,
घर असतं, हातावरचं चमचाभर दही;

घर म्हणजे फक्त चार भिंतींचा निवारा नाही!

कांचन

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

'घर खायला उठणे' हा वाक्प्रचार कधी ऐकला आहेत काय? घर हे नरभक्षक (किंवा नारीभक्षकसुद्धा) असू शकते!

त्यामुळे,

घर म्हणजे फक्त चार भिंतींचा निवारा नाही!

हे अगदी म्हणजे अगदी पटते!

फॉर वन्स, यू गॉट इट ॲब्सोल्यूटली राइट, हं, कांचनताई/सापटणेकरमॅडम (विचेवर यू प्रेफर)!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री.नवी बाजू,
इतक्या प्रतिसादांनंतर आपले आता बऱ्यापैकी bonding झाले आहे, त्यामुळे हा प्रतिसाद! आपला एकंदरच कवितांवर राग असावा. पण आपण म्हटल्याप्रमाणे मी कविता ‘पाडत’ नाही. गेली २५, ३० वर्षे ज्या ‘जुन्या बाजुच्या’ कविता मी लिहिल्या, त्यापैकीच काही इथे ‘टाकल्या’. त्याही मित्रमंडळींच्या आग्रहास्तव आणि त्यातल्याच एका हितचिंतकाने माझ्या वतीने registration केल्यामुळे. मला जर ‘ऐसी अक्षरे’च्या नव्या, जुन्या बाजु आधीच कळत्या, तर मुळात मी सुखाचा जीव दु:खात घातलाच नसता. या सर्व गोष्टींमुळे आपल्याला जो त्रास झाला किंवा होतोय त्याचे खापर आपण या मित्रमंडळींवर फोडू. अशा प्रतिसादांची आता सवय करून घ्यावी, हे आपले म्हणणे अगदी रास्तच आहे. कारण ज्याप्रमाणे, नरभक्षक वाघासारखे हिंस्त्र पशू आपला धर्म सोडत नाहीत, जसा साप दंश करणे किमान फुत्कारणे सोडणार नाही, किंवा पाली चुकचुकणे थांबवणार नाहीत, तसेच हे. तेव्हा ते दुर्लक्षित करणेच योग्य! मागच्या एका प्रतिसादात ‘दूर्लक्षित’ ही ‘नजरचुकीने’ झालेली चूक, तत्परतेने नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद! एकूणच ‘ऐसी अक्षरे’ ची सभासद झाल्यानंतर मला नवनव्या गोष्टी शिकवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत आपली भेट होईलंच. पण आपल्याच सूचनेअनुसार, प्रतिसाद दिला नाही तर राग मानू नये.
कांचन

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वप्रथम,

श्री.नवी बाजू,

नवी बाजू नव्हे, 'न'वी बाजू. (यात जुन्यानव्याचा काहीही संबंध नाही, तर 'न' या पूर्णांकदर्शक चलाशी (व्हेरिएबलशी) आहे. नाही म्हणजे, आता आपले इतके बऱ्यापैकी bonding झालेलेच आहे, म्हणून ही अतिरिक्त माहिती देण्याची जुर्रत करतो. असो.)

आपला एकंदरच कवितांवर राग असावा.

छे हो, रागबीग काही नाही.

मला जर ‘ऐसी अक्षरे’च्या नव्या, जुन्या बाजु आधीच कळत्या, तर मुळात मी सुखाचा जीव दु:खात घातलाच नसता. या सर्व गोष्टींमुळे आपल्याला जो त्रास झाला किंवा होतोय त्याचे खापर आपण या मित्रमंडळींवर फोडू.

आपला काहीतरी गैरसमज होतोय. मला त्रासबीस काही होत नाही. उलट, मजा येते. किंबहुना, प्रतिसाद पाडण्याची संधी दिल्याबद्दल मीच तुमचे आभार मानायला हवेत. अनायासे ती संधी आलेलीच आहे, तर साधून घेऊ काय? थँक्यू व्हेरी मच!

कारण ज्याप्रमाणे, नरभक्षक वाघासारखे हिंस्त्र पशू आपला धर्म सोडत नाहीत,

छे हो! मी इतकाही हिंस्र नाही. किंबहुना, रादर निरुपद्रवी आहे.

जसा साप दंश करणे किमान फुत्कारणे सोडणार नाही,

पुन्हा तुम्ही मला ओव्हररेट करताय! आणि, माझी तुलना सापांशी केल्यामुळे सापांच्या भावना दुखावल्या, याची तुम्हाला जाणीव अथवा कदर आहे काय? माफी मागा सापांची अगोदर!

मी फुत्कारत नाही. (दंश करत तर नाहीच नाही.) मी केवळ व्यक्त होतो. होता येते म्हणून. असो.

किंवा पाली चुकचुकणे थांबवणार नाहीत

पालींशी तुलना केल्यामुळे मात्र परमानंद झाला. त्याबद्दल तुमचे आभार! (माझ्यातर्फे, आणि पालींच्या वतीनेसुद्धा.)

तेव्हा ते दुर्लक्षित करणेच योग्य!

तो तुमचा जजमेंट कॉल आहे. त्याबद्दल मी काय (आणि काय म्हणून) म्हणू?

मागच्या एका प्रतिसादात ‘दूर्लक्षित’ ही ‘नजरचुकीने’ झालेली चूक, तत्परतेने नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

कसचे, कसचे! उलट, तेवढीच आमच्याकडून अनायासे काही सेवा घडल्याचा आम्हांस आनंदच आहे.

परत आपली भेट होईलंच.

१. दॅट्स द स्पिरिट!
२. आय लूक फॉर्वर्ड टू इट.

पण आपल्याच सूचनेअनुसार, प्रतिसाद दिला नाही तर राग मानू नये.

छे हो, राग कसला? अंतिमतः, ती आपली मर्जी आहे!

असो.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

आमचे येथे कशाचेही ७२० अंशात प्रथ्क्करण (तसला "प्र" सापडना प्रु) करून मिळेल. इती.
- श्री....
टँप्लीज

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती

अशी एक खूप वर्षांपूर्वी (दशकांपूर्वी?) अत्यंत प्रसिद्ध झालेली अजरामर कविता आठवली. ती कविता पूर्वी अनेक घरांमध्ये पोस्टर किंवा फ्रेम करुन लावलेली असे, इतकी ती लोकांना आवडली होती. त्या कवितेची जागा ही कविता घेऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनापासून धन्यवाद गवि! तुमच्या शब्दांमुळे दोन वेळा खूप दिलासा मिळाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती

बरोबर. नुसत्याच भिंती नकोत. भिंतींवरती पालीसुद्धा पाहिजेत.

पूर्वी 'कालनिर्णय'ची जाहिरात असे, 'भिंतीवरी कालनिर्णय असावे'. (कदाचित अजूनही असेल.) मात्र, हा दावा चुकीचा (तथा निव्वळ व्यापारी हितसंबंधांतून आलेला) आहे, असे आमचे नम्र प्रतिपादन आहे. भिंतीवर कालनिर्णय अनिवार्य नाही. मात्र, पाल हा भिंतीचा अविभाज्य घटक, अटूट अंग आहे. किंबहुना, भिंतींवरील पालींविना घराला घरपण येत नाही. असो.

ती कविता पूर्वी अनेक घरांमध्ये पोस्टर किंवा फ्रेम करुन लावलेली असे, इतकी ती लोकांना आवडली होती.

पूर्वी (कवितांची) पोस्टरे किंवा फ्रेमा घरांच्या भिंतींवर असत. हल्ली डायरेक्ट फेसबुकच्या भिंतींवर डकवितात. कालाय तस्मै नमः|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

‘न’ वी बाजू, कवितांचं जाऊ द्या हो, त्याचं कुणाला काय पडलंय? पाली महत्वाच्या! (मराठीत अतूट अंग). माझ्या मुली लहान होत्या, तेव्हा त्या पालींना बघून प्रचंड excite व्हायच्या. धाकटीला गाढवंही खूप आवडायची. त्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वप्रथम,

मराठीत अतूट अंग

बरोबर. (ऑल्दो, मराठीत मला वाटते त्याला 'अविभाज्य घटक' की कायसेसे म्हणण्याचा प्रघात आहे.) परंतु, अटूट अंग हे उद्धरण असल्याकारणाने मूळ भाषेत दिले, इतकेच. (खरे तर अवतरणांत द्यायला हवे होते, चुकलेच माझे. पुढल्या खेपेस नक्की काळजी घेईन.) असो.

कवितांचं जाऊ द्या हो, त्याचं कुणाला काय पडलंय?

याबद्दल दुमत असू शकेलही कदाचित, परंतु...

पाली महत्वाच्या!

...याबद्दल आपले एकमत आहे, हे वाचून बरे वाटले.

माझ्या मुली लहान होत्या, तेव्हा त्या पालींना बघून प्रचंड excite व्हायच्या.

येस्स्स्स्स!!!

(आपल्यासारखे आणखीही कोणी आहे, हे वाचून परमानंद झाला.)

(दुर्दैवाने, आमच्या घरात / मी राहतो त्या भागात हे श्वापद अद्याप तरी आढळलेले नाही. केवळ घरात मोकळे सोडण्यासाठी भारतातून आयात करण्याची इच्छा अनावर होते - त्याकरिता प्रवासखर्च वगळता इतर खर्चही होऊ नये खरे तर; पुण्यातल्या घरातून चारपाच उचलून आणता येतील - परंतु आमच्या इथल्या कष्टमखात्यास ते कितपत रुचेल, याबद्दल साशंक असल्याकारणाने ती जोखीम घेऊ शकलेलो नाही. असो.)

धाकटीला गाढवंही खूप आवडायची.

मलाही आवडतात! गाढवाइतका सालस तरीही उमदा, देखणा प्राणी त्रिभुवनांत कदाचित दुसरा नसावा. शिवाय, 'लाथ मारीन, तिथे पाणी काढीन' हा त्याचा उपजत बाणा वाखाणण्यासारखा तथा अनुकरणीय आहे. मनुष्याच्या गुलामीत त्यास शब्दश: बांध घालावा लागतो, ही दुर्दैवाची बाब आहे.

असो. आपल्याशी वार्तालाप, विचारविनिमय केल्याने छान वाटले. त्याबद्दल (मराठीत) आभार.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद, ‘न’ वी बाजू! असेच निज शैशवास जपत रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किती अवांतर कराल ? तुमचे अवांतर वाचता वाचता नाईन केम टु माय नोज.

केवळ ३.१४अदितीकडे (तिने फ्रेंडशिप दिल्याने) पाहून तुम्हाला सहन करतो झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्षमस्व गवि! विषयांतर खूप झालं. आता कवितेवर focus करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे कर्मा,

अहो तुम्हाला नाही हो. त्या सरीसृपप्रेमी नबा यांना म्हटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किती अवांतर कराल ?

या धाग्यावरच्या माझ्या किंवा कांचनताईंच्या (किंबहुना, कोणाच्याच) एका तरी प्रतिसादास (हा प्रतिसाद प्रकाशित होण्याच्या क्षणापर्यंत) 'अवांतर' अशी श्रेणी मिळाली आहे काय?

उगाच काहीतरी तुमचे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिली. आभार स्वीकारतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक पोस्टर पुर्वी बघितलेले फार आठवते अंधुक अंधुक अब्राहाम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र अनुवाद बहुधा साने गुरुजी किंवा मंगेश पाडगावकरांचा होता
ते खरोखर फार सुंदर पोस्टर होतं, आणि महाराष्ट्रत ते लोक घरात लावायचे त्या महाराष्ट्राच फार कौतुक वाटत आज. माझे वडीलांचे मामा होते स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या जुन्या घरात हे पोस्टर हॉल मध्ये लावलेले होते असल्याचे स्मरते
त्यातल्या आठवत असलेल्या अंधुक ओळी
तो फार गोड मुलगा कि छोकरा आहे हो
फार सुंदर पोस्टर होत खरच्

अरे नशिबाने सापडल हो गवि बघा हे होत ते पत्र्

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
प्रिय गुरुजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
मात्र त्याला हे देखील शिकवा,
जगात प्रत्येक बदमाशागणिक
असतो एक साधूचरित , पुरुषोत्तमही
स्वार्थी राजकारणी असतात जगात,
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी , तसे जपणारे मित्रही,
मला माहित आहे !
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
तुमच्यात शक्ती असती तर .........
त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा
आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
जमेल तेवढं दाखवित चला त्याला ,
ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
मात्र त्याबरोबरच ,
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला ,
पाहू दे त्याला , पक्षांची अस्मान भरारी ............
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
शाळेत त्याला हा धडा मिळू दे ,
फसवून मिळालेल्या यशापेक्षा ,
सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
आपल्या कल्पना, आपले विचार ,
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने ,
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी ,
त्याला सांगा ................
भल्याशी भलायीन वागावं,
आणि टग्यांना अद्दल घडवावी .
माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी ,
पुढे हेही सांगा त्याला ,
ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
हसत रहावं उरातल दुख्ख दाबून ,
आणि म्हणावं त्याला
आसवांची लाज वाटू देऊ नको.
त्याला शिकवा .........
तुच्छतावाद्याना तुच्छ मानायला ,
अन चाटुगिरीपासून सावध रहायला .
त्याला हे पुरेपूर समजवा की ,
करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,
पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.
धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
कानाडोळा करायला शिकवा त्याला.
आणि ठसवा त्याच्या मनावर,
जे सत्य आणि न्याय वाटते,
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेन वागवा,
पण, लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
अन धरला पाहिजे धीर त्याने,
जर गाजवायच असेल शौर्य .
आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,
माफ करा गुरुजी,
मी फार बोललो आहे _
खूप काही मागतो आहे.........
पण पहा........
जमेल तेवढ अवश्य कराच,
माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

खूप सुंदर आणि आजही अगदी apt. पूर्वी कधीतरी वाचलं होतं पण आता विस्मृतीत गेलं होतं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेली २५, ३० वर्षे ज्या ‘जुन्या बाजुच्या’ कविता मी लिहिल्या, त्यापैकीच काही इथे ‘टाकल्या’. त्याही मित्रमंडळींच्या आग्रहास्तव आणि त्यातल्याच एका हितचिंतकाने माझ्या वतीने registration केल्यामुळे.

मीही एकासाठी registration करून ठेवले आहे. माहिमचा डॉन पण हाताचे फ्रँक्चरमुळे झाल्याने कविता/लेख लिहीत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगलं आहे. असंच लोकांना प्रोत्साहन देत रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0