तत्वमसि

सृष्टी से पहले सत्य नहीं था,

असत्य भी नहीं

अंतरिक्ष भी नहीं,

आकाश भीं नहीं था

छिपा था क्या कहाँ,

किसने देखा था

उस पल तो अगम,

अटल जल भी कहाँ था

सृष्टी का कौन हैं कर्ता

कर्ता हैं यह वा अकर्ता

ऊंचे आसमान में रहता

सदा अध्यक्ष बना रहता

वोहीं सच मुच में जानता.

या नहीं भी जानता

हैं किसी को नहीं पता

नहीं पता

कधीतरी लहानपणी ऐकलेले हे शब्द लक्षात राहिले कारण they talked about something deeper. या शब्दांचा अर्थ कळायच ते वय नव्हत पण हे नक्की होत कि कधीतरी कुठे तरी अर्थ उमजेल.

नंतर थोडी समज आल्यावर आणि थोडे शहर फिरल्यावर एक नेहमी पडत आलेला प्रश्न म्हणजे what is that which makes us, us? what binds this countrymen together?

आपण भारतीय आहोत म्हणजे नककी काय ... भारतीय असणे हे फक्त एका धर्माचे अनुयायी असणे नक्कीच नाही. किंबहुना धर्म हा शब्दच आपण किती प्रकारे वापरतो याला मर्यादा नाही. रोजच्या बोली भाषेत आपला धर्म करावा याचा अर्थ कधीतरीच पूजा अर्चना कराव्यात असा क्वचितच असतो.

काही दिवस माहेरी गेलेली असतांना, घरी आलेला प्रत्येक माणूस स्वतःच्या version मध्ये धर्म काय हे सांगून गेला. पोळ्यावाल्या आजींच्या घराच्या एका बाजूला medical आणि एका बाजूला दवाखाना आहे. लोक गाडी यांच्या घरासमोर लावतात.. अगदी घरात जायला जागा उरत नाही.. म्हाताऱ्या बाई समोर रोजचा प्रश्न पण तिचे उत्तर कि ह्यांनीच आपला समाज कार्याचा धर्म पूर्ण झाला समजाव. कामवाल्या मावशीचा नवरा दारुडा आणि आजारी तर मुलगा दिव्यांग. एक मुलगी आहे जिचे शिक्षण पूर्ण करायला या बाईंची मरमर. यांच्या पाय पडले तर म्हणतात "बाई आपण आपल्या परीने जेवढा करू शकतो तेवढा करावं तोच आपला धर्म." आणि या सगळ्या बायकांना वर्षानुवर्ष सांभाळून घेणारी आई सांगते अगं आपल बर चाललय ना मग खूप काम नसतांना देखील बायकांना कामाला ठेवला ना कि त्यांच्या संसाराला हातभार लागतो. त्यांचा स्वाभिमान टिकून राहतो.
असा हा "धर्म" म्हणजे नक्की काय याचा थोडा उलगडा करणारे ध्रुव भट्टांचे "तत्वमसि" हे पुस्तक वाचनात आले आणि इतक्या वर्षापासून पडलेल्या प्रश्नाची उत्तर पहिल्यांदाच मिळायला लागली किंवा आपल्याला पडलेले प्रश्न valid आहेत हे जाणवल.

पुस्तकाचा context तसा साधा आहे. बरीच वर्षे अमेरिकेत राहून आलेल्या नायकाला, आपल thesis उरकून परत जायचे आहे. Thesis करण्या करता नर्मदेच्या जंगलातल्या आदिवासींसोबत राहायचे आहे. आपण प्रगत देशातून शिकून आलो आणि आता इथे अंधश्रद्धा निर्मूलन करायचे आणि या समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवायचा हा त्याचा हेतू.

जसे जसे दिवस जातात नायकाला जाणवायला लागतं कि त्याचा हेतू कधीच मागे पडलाय किंबहुना त्याच्या हेतूला इथे काहीही अर्थ उरत नाही. माणसाची प्रगती आणि माणसाच्या परिस्थितीची प्रगती यांच्यात फरक आहे. इथल्या माणसाची प्रगती करायच काम इथल्या संस्कृतींनी केलेलं आहे. काही गरज असेल तर ती परिस्थिती बदलायची.

ह्या संस्कृतीचा पाया धर्म कधीच नव्हता. आणि म्हणूनच धर्म हा शब्द प्रत्येक जण स्वतःच्या सोयीनुसार वापरतो.

हीच संस्कृती आहे जी प्रत्येकाला धर्म आणि धर्मनिरपेक्ष असायची समान मुभा देते आणि तरीही एकाच धाग्यात ओवून ठेवते जिथे देव नसला तरीही श्रद्धा असणे महत्वाचे मानले जाते.

नायकाला भेटलेला प्रत्येक माणूस एका अनामिक नात्यात गुंतलेला आहे आणि हे नातं फक्त आणि फक्त संस्कृतीचं आहे. कितीतरी दिवसाचे उपाशी आदिवासी जेंव्हा नायकाला "रिकाम्या पोटी घरून जाऊ देणार नाही" म्हणून घरात असलेल फक्त मीठ खायला आणून देतात, कधीही न भेटलेल्या आजीबाई २ मिनिटात नायकाला स्वतःची अख्खी जीवनगाथा सांगतात, मध गोळा करायचा पिढीजात व्यवसाय असला तरीही त्याचे industrialization ला मान्यता द्यायला नकार देतात. आपला या लोकांशी कधीही संबंध आलेला नाही आणि कदाचित येणार हि नाही, आपला देव यांच्या पेक्षा वेगळा दिसतो पण तरीही या सगळ्यागोष्टी आपल्याला कुठल्यातरी परिचित घटनेची आठवण करून देत आहेत (english मधे dejavu). एकाच गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती हि कि हे जे काही आहे जे सगळ्यांना एकाच धाग्यात गुंफते तीच संस्कृती. तिच्याच अस्तित्वानी अनादी काळापासून या भारतखंडाला जोडून ठेवलेला आहे, तीच आहे जी धर्मा पेक्षा मोठी आहे आणि अनंत आहे. ह्या संस्कृतीचा वारसा इतका समृद्ध आहे कि रामायण आणि महाभारत कधीही ना वाचलेल्या लोकांना पण हे ग्रंथ पाठ असतात.

हीच संस्कृती मानवाला निसर्गासोबत coexist करायला शिकवते. तत्वमसि मधे संस्कृतीच मूर्त रूप काही असेल तर ती नर्मदा नदी. कधीतरी नर्मदापरिक्रमे बद्दल ऐकेले होते पण असंख्य लोकांच्या मनात असलेली त्याच्या बद्दलची श्रद्धा याच पुस्तकातून कळली. परिक्रमावासी, परिक्रमा करण्याचे त्यांचे कारण, त्यांची यात्रा, येणारे अनुभव, लोकांची मदत, आदिवाशींचा आणि नर्मदा मनुष्य रूपात दर्शन देईल हि श्रद्धा. या परिक्रमेला ३+ वर्ष लागतात असे वाचले आहे. नर्मदेला सर्वस्व अर्पण केल्या शिवाय हि परिक्रमा पूर्ण होत नसावी. पुस्तकाचा नायक गोष्टीची सुरुवात नास्तिक म्हणून सुरुवात करतो आणि शेवटच्या पानावर "रेवा" (नर्मदा) चे दर्शन झाल्याचे कबूल करतो. नर्मदेला सर्वस्व अर्पण करायची इच्छा, तिच्यात एकरूप व्हायची इच्छा प्रबळ असेल तेंव्हाच परिक्रमा करण्याला "तत्वमसि" चा अनुभव येऊ शकेल असं वाटतं. तेंव्हाच "तत्वात" एकरूप होणं शक्य होईल आणि तेंव्हाच वर लिहिलेल्या ओळींचा अर्थ पूर्ण कळू शकेल. अजून तरी कुठेतरी "किसी को नही है पता.. नाही है पता" यावरच समाधान मानाव लागेल.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

रिवा नहीं दिखेगी ये है पता।
थोडंसंच समजलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक किरकोळ सुधारणा. वर अनेक जागी 'तत्वमसि' असे लिहिले गेले आहे. तेथे 'तत्त्वमसि' असे हवे (= तत् त्वं असि) तू तेच आहेस. (जसे की 'तत्त्वज्ञान'.)

(ध्रुव भट्ट ह्यांनी गुजराथीमध्ये 'तत्त्वमसि' असेच लिहिले आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0