प्रसन्न

ते विस्मृत गाणे
धूसर होऊन
विरून जाते

पण नेणीवेच्या
अथांग डोही
अवचित दिसते

अन् पुन्हा गीत ते
शब्दांच्याही
पल्याड नेते

अन् नकळत अश्रु
झरताना
ओठांवर येते

मग नव्या दमाने
घाव झेलुनी
लढत राहतो

अन् हरलो तरीही
पुन्हा खळाळून
प्रसन्न हसतो

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

>>>>> पण नेणीवेच्या
अथांग डोही
अवचित दिसते>>>> मस्त!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0