काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६

Image

रहायला वांद्र्याला असलो तरी लायसन्स ताडदेव आर टी ओ चं होतं.
आता का?
तर शेवटी भारतीय असल्यामुळे सगळ्या गोष्टी वशिला लावून सोप्या? करून घ्यायची वाईट सवय झालेली.
माझ्या एका लांबच्या मामाचं गिरगावला ड्रायव्हिंग स्कूल असल्याने तेव्हा कैक वर्षांपूर्वी झटपट लायसन्स तिकडून करून घेतलेलं...

पण आत्ता मात्र टॅक्सीचा बॅज काढायचा तर लायसन्स आणि राहायचा पत्ता मॅच होणं मस्ट!
हे असं आपण तेव्हा जुगाड मारतो आणि नंतर मग घोळ होतात.
बाय द वे ह्याच विषयावर हंस २०१९ च्या अंकात "अलियास" नावाचा छान किस्सा आलाय.
गॅसचं कनेक्शन घेताना मारलेला शॉर्टकट आणि त्याची नंतरची चित्तरकथा.

इथे तर आपलं ठरलंय ना की सगळं स्वतः करायचं.
थ्रू प्रॉपर चॅनेल... "शॉर्टकट" मारायचे नाहीत वगैरे.
तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ताडदेव आर टी ओ कडून एन. ओ. सी. घेणं.
(आणि मग ते लायसन्स अंधेरी आर. टी. ओ. ला ट्रान्स्फर करणं.)

सो ताडदेव...
ताडदेव आर. टी. ओ. चं लोकेशन फार मस्त आहे खरं तर:

महालक्ष्मी स्टेशन चा ब्रिज चढून आलात की सरळ रेल्वे रुळांना समांतर ब्रिजवरून जायचं रेसकोर्स उजव्या हाताला ठेवून.
साधारण दहा मिनटांत तुम्ही ऑलमोस्ट हिरा-पन्नाच्या सिग्नलला पोचता.
त्याच्या जस्ट आधी एक लेफ्ट टर्न आहे तो घ्यायचा.
मग उजवीकडे गोल्फ कोर्सची निवांत हिरवाई बघत रमत गमत चालत अजून पाच मिनिटांत आर टी ओ.

अंधेरीच्या निर्विकार कॉंक्रिट बिल्डिंगपॆक्षा ताडदेव आर टी ओ ला मस्त कॅरेक्टर आहे.
प्रशस्त मोकळी जागा, बैठी ऑफिसेस आणि झाडं वगैरे.

काम झटपट झालं आणि मग मी खुशीत येताना फूटपाथवरल्या आजीकडून मस्त गजरे घेतले.
आजी पण झक्कास होती छान टूथलेस हसत तिनं तीनाऐवजी चार गजरे दिले... शुभ-शकुन!

चला श्री गणेशा तर चांगला झालाय आता उद्या धडक अंधेरी आर टी ओ.
काम लायसन्स ट्रान्स्फर.

आजचा खर्च:
१००० रुपये

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचतोय. येऊ द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0