दरवेश्याने अस्वलाला जगायचा हक्क दिला.

लहान, कोत्या, खुज्या माणसांनी
तिचे तुकडे तुकडे पाडायचे ठरवले.
पहील्यांदा मोठ्ठा ढलपा, मग एक लचका,
मग करवरतीचा वार आणि हळूहळू नामशेष करण्याचे ठरविले.
सुरुवात कुठुन करायची यावर एकमत होत नव्हतं.
तिचा स्वाभिमान, तिची ओळख, तिचं मन की तिचा आत्मविश्वास
कुठुन कुरतडायच, कुठे वार करायचा.
कसं खणायचं, कापायचं, तोडायचं, मोडायचं, कुस्करायचं, चोळामोळा करायचा.
ल्गाम तर घातलाच पाहीजे असं कसं!!
नामशेष तर झालीच पाहीजे.
.
.
.
अगं थांब जरा, कुठे धावतेस, कशाला मनातलं बोलतेस
कशाला खातेस-पीतेस-लेवतेस-बोलतेस-व्यक्त होतेस
खरं तर कशाला जगतेस?
दबून रहा, अपमान गिळ, सोस, आनंद लपव
मुकी हो, अदृष्य हो, आकुंचन पाव, ऊठ तुझी जागा त्यांना दे,
विरुन जा, विटुन जा, मरुन जा
मर!! मर!! मर!!
.
.

मग तू त्यागाची मूर्ती बनशील,
देवघरातील देवी आणि अनंतकाळची माता बनशील,
मग तेच तुला पूजतील, प्रसाद दाखवतील,
तेच तुझं माफक कौतुक करतील
मग तू खूष व्हायचस, तुला खिडकीभर आभाळ दिलं त्यांनी
तुला कोपऱ्यात का होइना झाडूपाशी जागा दिली
गिळायला २ तुकडे फेकले, ल्यायला दिलं,
डोक्यावरती छप्पर दिलं, गळ्यात एक डोरलं दिलं.
दरवेश्याने अस्वलाला जगायचा हक्क दिला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

इथल्या अस्वलाचा राग ओढवून घ्यायला नको म्हणून प्रतिसाद येत नाहीत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कशाला उगा मला मधे आणता आचरटबाबा.. मी काय घोडं मारलं..

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हुं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घोडं न मारण्याबद्दल अस्लाची हत्तीवरून, वाजतगाजत मिरवणूक काढली पाहिजे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी नाही घाबरत अस्वल फिस्वलाला. गेल्या कैक शतकांत इतकी अप्रतिम रचना झाली नाही. काळजाचा ठाव घेणारी कविता आहे ही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

अस्वल राव मी तुम्हाला घाबरत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

थँक्यू गोब्रा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता कशी वाटली याबद्दल बोला की. मला आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप आवडली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता जा निघोनी जसे की विरावे
धुके दूर रानात अलवारसे
तुझी पाठ होता मला शोधणे गे
कुठे फोडले काल मी आरसे !

अकलक राठा म्हणजे काय लंपन भाऊ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

आचरटबाबा म्हणतात त्याप्रमाणे हा गोट्या खेळताना म्हणायचा मंत्र आहे.
पंचपांडु-सह्यादांडू-सप्तपोतडे-अष्टजिंकिले-नऊनऊ किल्ले-दसशा पेडा-अकलकराठा-बाळू मराठा-तिरंगी सोटा-चौदा लंगोटा-पंधराशी परिवळ-सोळी घारीवल-सतरम सीते-अठरम गरुडे-एकोणीस च्यक्चयक-विसा पकपक-एकवीस रात्री-बावीस कात्री-तेवीस त्रिकामफुल-चोवीस चोर-पंचवीस मोर !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता जा निघोनी जसे की विरावे
धुके दूर रानात अलवारसे
तुझी पाठ होता मला शोधणे गे
कुठे फोडले काल मी आरसे !

...'अकरा अकरा अकरा' म्हणजे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कराड, सातारा भागांत मुलांचे गोट्या खेळतानाचे गाणे. मला पाठ होते.
अकलं खाजा पासून सुरुवात १४ वी गोटी मारताना '१४ हात लंगोटा' . त्यास सर्वांनी एकेक गोटी द्यायची असते. पहिला सुटतो त्यास सर्वात जास्ती गोट्या मिळतात.
अकलं खाजा....१
दुब्बी राजा....२
किराण भोजा....३
चारी चौकटे....४
पंचा पांडव....५
सय्य दांडव ....६
....
....८
नवनव किल्ले ....९
दश्शी गोंडा...१०
....११
....१२
.बाळू मराठा....१३
चौदा हात लंगोटा...१४
शेवट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी! विचारलं म्हणून समजलं. लंपन, आबाबा खूप धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।