एक कोटी चंद्र-सुरांची चर्चा

मला भारतीय शास्त्रीय (भा शा) संगीतातील शष्पही कळत नाही.
हे सांगून पुढे लिहितो.

म का याच्यावर का टीका होत असावी.

१. त्याचा आवाज 'वाईट' आहे (रॉक मधे आवाजाच्या क्वालिटीचे महत्व फारसे नसते, पण भा. शा. संगीतात थोडेफार असावे)
२. तो अभिषेकी यांचा शिष्य नसताना तो ते रेटून पसरवतो म्हणून शिष्य मंडळींचा राग असावा.
३. तो अनेक ठिकाणी बेसूर गातो.
४. तो भा. शा. किंवा सुगम (नाट्य)संगीत गात असताना चिप ट्रिक्स करतो. उदाहरणार्थ : 'घेई छंद मकरंद' गाताना त्याचा बिट बदलत बदलत शेवटी 'बडी योर ...' करत 'वि विल रॉक यु'ची, तीही चुकीची अडखळत एन्ट्री करतानाचा व्हिडिओ मी बघितला. (माझा राग अर्थातच 'वि विल रॉक यु'च्या चुकीच्या एन्ट्रीबद्दल असला, तरीही) नाट्यसंगीतप्रेमी मंडळी यामुळे पिसाटली तर ते अत्यंत साहजिक आहे.
हा माल तो फ्युजन म्हणून खपवतो. फ्युजन असे नसते.
५. तो भयाण शब्दोच्चार करतो.
६. तो फालतू गिमिक्स करत असतो. मैफिलीत गाताना सेल्फी काढणे/कुठलीही गाणी मधेच घुसडणे इत्यादी.

आणि मुख्य म्हणजे तो। वाईट। गातो.
यामुळे भा. शा. संगीत प्रेमी तसेच अभिषेकी शिष्य चिडले तर त्यात काय ते नवल?
अमेरिकेत राहतो, विंगिनीयर आहे; प्रसिद्धीचा संगीताशी संबंध नसावा.
मलाही तो डोक्यात जातो.
अखेर लोक बोलू लागले आहेत.

व्यवस्थापकीय टिप्पणी - खरडफळ्यावर लोक मोलाची चर्चा मातीमोल करताना बघून माझा जीव पाणीपाणी झाला. आणि ती चर्चा, संबंधित लोकांच्या परवानगीशिवाय इथे आणत आहे. -- अदिती

field_vote: 
0
No votes yet

राजा काळेंनी महेश काळेंवर नाव ने घेता ब्रह्मास्त्रच डागलेलं आहे. - लेखाचा दुवा - मोबाईल, संगणकासाठी
मला मका आवडतो बाबा. कशाला बिचाऱ्याच्या मागे पडलेहेत माहित नाही. जावडेकराचा पण लेख येऊन गेला, पण तो ॲज् एक्स्पेक्टेड उथळ होता. राजा काळे म्हणताहेत म्हणजे खरंच चुकत असावं बा काही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

साधना करून संगीत येते?

लांबवलेला कंटाळवाणा लेख. महेश काही नवीन करू पाहात असेल. त्यांना काही नवीन चांगली गाणी मिळाली नाहीत तर काय करणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही भा शा संगीतातील शष्पही कळत नाही. पण भुपेन हजारिकाच्या गाण्यात एक नाद आहे तो जाणवतो.
आता सर्वांच्याच गळ्यातून असं काही होणं शक्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्याबरोबर ईंजिनीयरिंगला एक महेश काळे होता. खरंतर म का मला लई वर्ष सिनीयर होता. पण प्रत्येक विषयाला न्याय देत-देत म का माझ्याबरोबर आला. त्याचं गाव मला नक्की आठवत नाही, पण बारामती होतं, मला आठवतंय तसं. त्याचे उच्चार थोडे वेगळे होते, त्यामुळे त्याचं नाव त्यानेच सांगतांना "महीस काळी" असं ऐकायला यायचं. पण त्याच्या समोर हसायला माझ्यात अज्याब्बात्त हिंमत नव्हती. हसलो असतो तर मरणाचे रट्टे खाल्ले असते.

मलाही भा शा संगीतातील शष्पही कळत नाही.

+१. मलापण. तसंतर मला बाकीचं पण कशातलं शष्प कळतं असा मलाच बऱ्याचदा प्रश्न पडतो. किशोरकुमारचं गाणं आवडतं. ते समजायला लै काही लागत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे इतक्या जणांना इतक्या गोष्टींतले शष्प कळत नाही, की आपण सारेच शष्पांच्या घनदाट, अंधःकारमय जंगलात चाचपडत आहोत, असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मका बेसूर नसता तर कदाचित आवडलाही असता. मलाही मकाचं बेसूरपण ऐकून समजतं!

ते 'हे सुरांनो चंद्र व्हा' हे गाणं मला एरवीही ऐकताना विनोदी वाटतं. मी फारच सिनिकल, खवचट वगैरे आहे; हे झालंच. त्यामुळे त्या गाण्याची गंमत बघून फार काही त्रास होत नाही. पण ती गंमत करताना युद्धजन्य संगीत का? मला युद्धंफिद्धही आवडत नाहीत. दोन भिकार गोष्टी एकत्र येऊन बरं काही थोडीच तयार होणारे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्याला पण शास्त्रीय संगीत किंवा आणखी कुठल्याही संगीतातलं कळत नाही ब्वा. पण आपल्याला मकाचं कानडा राजा पंढरीचा आणि अरुणी किरणी आवडतात.

‘घेई छंद मकरंद’, ‘शब्दावाचून कळले सारे’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, यांसारख्या अनेक रचना बेजबाबदारपणे आणि स्वत:च्या घमेंडीत गाऊन आणि वरती परत या स्वरशिल्पावरची मरगळ आम्ही झटकली, असे उद्दाम वक्तव्य करणारे

ह्यामुळे राग का आला समजण्यासारखं आहे.
आवाजाबद्दल- वसंतराव देशपांडेंचा आवाज पण इतका काय खास नव्हताच, तरीही ते ग्रेट गायक म्हणून ओळखले जातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता जा निघोनी जसे की विरावे
धुके दूर रानात अलवारसे
तुझी पाठ होता मला शोधणे गे
कुठे फोडले काल मी आरसे !

तरीच, म्हटलं अण्णा काही लेख पाडणाऱ्यांतले नव्हेत.
संपादकांनी त्यांच्या नावावर लेख टाकला म्हणजे ..
(कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मकाचे सूर जसे बदाबदा पडतात, तसे अण्णांचे लेख खरडफळ्या‌वर पडतात. मग त्यांना इमोसनल ब्लॅकमेल करायचं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मराठीत दुसऱ्याला मिळणारे पैसे हा ........

-आपला पुलं
(कारणा शेवटी आम्ही ......)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ज्योक्स अपार्ट. पण त्याच चार पाच गाण्यांच्या जिवावर किती काळ भारी भारी म्हणून जगायचं? कट्यार सिनेमा येऊन सुद्धा आता पाचेक वर्ष झाली ना? आणि नो वरिजनल क्रिएशन ! अभिषेकींनी संगीत दिलेली आणि जुन्या गायकांनी आधीच गायलेली गाणी गातोय ना तो?

मग सुदेश भोसले आणि अमोल काटदरे (किंवा विभावरी आपटे आणि ऋषिकेश रानडे) काय वाईट? किंवा दुसऱ्या शब्दात सुदेश भोसलेला किशोरकुमारचा स्टेटस मिळत नसतो. तो अभिषेकींचा स्टेटस मका ला मिळू पाहतोय याचे वैषम्य असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण सुदेश भोसले नवीन गायकांना नेहमीच सांगतात "नकला करू नका" मी नकलांच्या कार्यक्रमांतूनच पुढे आलो तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो आणि त्याने स्वत:ची गाणीही गायली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भूमि त्रिवेदीचं राम चाहे लिला चाहे https://youtu.be/GMEcGitf6l8 मस्त दणदणीत वाटतं. तिनेच लिहिलं म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खाणंपिणं, संगीत हे अण्णांचे हातखंडा विषय आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मका विषयी मला कुठलाही पूर्वग्रह नाही. पण तरीही मला त्याच्या आवाजाचा पोत कधीच आवडला नाही. कट्यारमधली (चित्रपटातली) गाणी मला कायमच स्टंटबाजी करणारी वाटली. तरीही चित्रपटांत ती बऱ्यापैकी सुसह्य होती. पण त्याच्याच जिवावर कोणी चार-पांच वर्षे काढायला लागलं, तर ते अति होतंय असं वाटायला लागलं. पुढे तो परीक्षक झाला. त्यातल्या त्याच्या गोलमाल कमेंटस ऐकून हंसू यायला लागलं. आणि हे लेटेस्ट फ्युजनचं ऐकल्यावर तर ते तद्दन भंपक वाटलं! गाण्यातला मी काही दर्दी नसलो तरी शष्पापेक्षा नक्कीच जास्त कळतं, एवढं म्हणू शकतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

तो बोलताना फार नाकात बोलतो हे टॅनुल्याचं आणि माझं एकमत आहे. (अमेरीकेत राहून पुणेरीपणा सोडलेला नाही हेही दुसरं एकमत)
बाकी आम्हीपण शष्प न कळणाऱ्यातले आहोत, मकाच्या एक कॉन्सर्टला आम्ही गेल्तो, त्याला पब्लिक इन्व्हॉल्वमेंट बरी जमते.
माझ्या पुण्याच्या मयत्रिणीने दिवाळी पहाट की असच कायतरी शंकर महादेवन वगैरेंसोबत त्याच्या गाण्याचा कार्यक्रम बुक केला होता. ते पसाभर पब्लिक त्याला आवरेना तेव्हा शंकर साहेबांनी येउन नौका तडीस नेली असं ती सांगत होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |