नेटसम्राट

नेटसम्राट

कुणी, ट्रोल करता का रे? ट्रोल?
एका फेकबुक्याला कुणी ट्रोल करता का?

एक फेकबुक्या नेट वाचून,
डेटापँक वाचून,
लोकांच्या कमेंट्स वाचून,
हजारोंच्या लाईक्स वाचून,
वॉल, पेजेस मध्ये सर्फिंग करत आहे,
जिथून कुणी ब्लॉक करणार नाही,
असे अकाऊंट ढूंढत आहे,
कुणी, ट्रोल करता का रे? ट्रोल?

काय  रे बाळा, खरच सांगतो बाबांनो
फेकबुक्या आता थकून गेलंय,
लाईक, कमेंट आणि शेअरच्या जाळ्यात,
अर्ध-अधिक तुटून गेलय,
फेकन्यूजच्या लाटांवरती,
टिकेच्या जाळावरती,
कमेंट रिप्लाय करून करून,
फेकबुक्या आता थकलाय,

मल्टीपल फेक प्रोफाईल उघडीत,
खोटंनाटं शोअॉफ करत आहे,
खरं सांगतो बाबांनो,
फेकबुक्याला फेकुगिरीच नडतीय रे,
हे.. बाबा.. कुणी ट्रोल करता का रे? ट्रोल?

फेकबुक्याला लाईक नको,
कमेंटचा पाऊस नको,
सजेस्टेड फ्रेंड्स नको,
कोणाचेही पोक नको,
मेसेजबॉक्सचे वेव्हिंग नको,
एक हवं ओन्ड पेज..
पाहिजे ते लिहिण्यासाठी,
एक हवी इन्व्हायटेड फ्रेंड्स लिस्ट..
फेकबुक्याला व्हायरल करण्यासाठी,
एक अनलिमिटेड डेटापँक हवाय..
व्हिडिओज् अपलोड करण्यासाठी,
कुणी, ट्रोल करता का रे? ट्रोल?

©भूषण वर्धेकर
१० मार्च २०१९
हैद्राबाद

आज सापडले मोबाईलवर SmileWink
मागीलवर्षी लिहिले होते

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

मस्त लिहिलयं !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0