छत्री दुरूस्तीला टाकली पाहिजे (३/३)

या आधीच्या भागातः काय मजा असते नाही. एखादी ओळ, एखादी कविता, एखादा प्रसंग आपल्याला किती मागे घेऊन जातो. पहिल्या पावसाला यायला अजून कितीतरी वेळ आहे आणि मी मात्र काही ओळींमुळे पार कुठल्याकुठे पोचलो आहे. रोजच्या आयुष्यात माझ्यापासून वर गेलेल्या आठवणींच्या आकाशातून अश्या सरी कोसळतच राहतात, काही क्षण त्यात भिजावेसे वाटतेच पण ....

आठवणींच्या आकाशाच्या अन्
माझ्यामध्ये मी एक छत्री धरून बसतो

अलीकडे आजचा मी अन्
पलीकडे आधीचा
आठवणींच्या ताब्यातला

आज सरला अन्
आजचा मी कालचा होऊन छत्री पलीकडे गेलो
वाट पाहत उद्याच्या माझी.. कसा असेन उद्या मी?

उत्सुकतेच्या फटीतून डोकावलो अन्
आज माझ्यावर कालचे मी पडू लागले
फट विस्तारली.. छत्री फाटली..
आठवांच्या रुपात कोसळत राहिलो
पार पार मागे वाह(व)त गेलो...

छ्या! ही छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे!

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

तुमची छत्री फाटली होती म्हणून मलाही इतकं काही छान दिसलं त्यातून .. नकाच दुरुस्त करू ती Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच छान! फाटलेल्या छत्रीसकट सगळे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहिले.
लेख मनापासून आवडला. कसं काय सुचलं तुला? असं सुचूच कसं शकतं? असे प्रश्न विचारावेसे वाटले.
Smile लिहीत रहा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

वा!!! पहिले दोन भाग वेगळे टाकलेस हे उत्तम केलेस. कारण या रचनेला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. ते इथं ती वेगळी असल्यानं नीट भिडलं. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील तिन्ही प्रतिक्रियांशी सहमत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आहाहाहा! ऋष्या, लेका तू ग्रेट आहेस! पाऊस, पाणी, बर्फ वगैरे गोष्टींबद्दल मला आत्यंतिक जिव्हाळा आहे
पण कधी असं मांडू शकलो नाही. सुरेख मांडलंयस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त ! छत्री फाटली तरी तिचे अन आठवणींचे नाते कायम राहिले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा(ह)वा.

छान लिहिले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरेख लेखमालेचा सुंदर शेवट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तीनही भाग वाचले. पहिले दोन भाग वाचत असताना माझे पावसातले कळसुबाई, लोहगड, माथेरानचे अनुभव आठवले आणि माझीही छत्री फाटली.
तिसरा भाग काव्यरुपाने पेश करण्याची कल्पना आवडली.
सुंदर लेखन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

तीनही भाग एकापाठोपाठ वाचले. मजा आली. पावसाची चाहूल लागली असता जाणवणारी हुरहूर, या भजनाच्या सुरुवातीच्या तुकड्यात पंडितजींनी नेमकी पकडली आहे.

माझ्या एका मैत्रिणीची नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया कितपत यशस्वी झाली आहे, याचा अंदाज काही दिवसांनी यायचा होता. ती हॉस्पिटलमधून घरी निघत असतानाच अचानक पाऊस पडायला लागला, म्हणून मी चिंतेत पडले. मात्र तिच्या नवर्‍याचा चेहरा आनंदाने फुलून निघाला. त्या आगंतूक पाहुण्याने त्याला सर्व काही ठिक होणार असे आश्वासन दिले होते! तो पाऊस आणि त्याचा चेहरा माझ्या कायम लक्षात राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छत्रीखाली जाणं हे मला गाडी बोगद्यात शिरण्यासारखं वाटलं. पण फटींमधून आठवणींचे स्वर दिडदा दिडदा करत रहातात...

मस्त लेखमाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिनही भाग एका दमात वाचून काढलेत. खूप छान!
तूझी छत्री अशीच कायम फाटलेली असावी आणि तू ह्या आठवणींचा ओलावा असाच आमच्यापर्यंत सतत पुरवत रहावा असे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

वा! छत्री तुमची फाटलीय आणि पावसात भिजवून टाकलंत आम्हाला! पाउस हा माझा जिव्हाळ्याचा विषय, कितीक आठवणी जाग्या झाल्या. सुंदर लेखन! धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उन्हाळा संपताना पावसाची वाट बघताना आलेला पाऊस, चिखलात उड्या मारण्यासाठी लागणारा मुळातला द्वाडपणा जागा करणारा पाऊस, कुंद वातावरणातला डोंगराच्या टोकावरचा निवांत पाऊस, "बरं आहे इथे मुंबईसारखा बदाबदा पाऊस कोसळत नाही" असं म्हटल्यावर पाच मिनीटांत ओलंचिंब भिजवणारा पाऊस ... सगळ्याची आठवण झाली.

ऋ, लिहीत रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाऊस नि पावसाशी संबंधित घासून गुळगुळीत झालेल्या असोसिएशन्समुळे हा लेख वाचला नव्हता. आज वाचला. काहीच्या काही 'लागली' आहे तुमची लेखणी. नि एखाद्या हायकूसारखा फॉर्म. फार फार फार आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रतिसाद वाचून, का कोण जाणे, पण 'स्वाती ठकार'ची आठवण झाली.

फक्त तेवढा एक लसणीचा भपकारा हवा होता. नि एखादा हुंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काहीही कळले नाही. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

टुकार बाईंपेक्षा हा प्रतिसाद जेन्युइन आहे बराच. पूर्वेतिहास न पाहता तुलू गेलो तर अर्थातच तसे वाटण्याची काहीएक शक्यता आहे हे मान्य Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्यनि कर रे बाबा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मलाही कर. भिकार कविता करणार्‍या कुणा एका बाईंसारखं काहीतरी मी बरळलेय (असं 'न'वी बाजूंना वाटतंय) याहून जास्त काही तपशील असले, तर मलाही जाणून घ्यायचे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भिकार कविता करणार्‍या कुणा एका बाईंसारखं

कविता??????

(स्वाती ठकार > १ ??????)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादाच्या निव्वळ ष्टाइलबद्दल (कोणी लिहिला, कशासाठी लिहिला वगैरेंकडे पूर्ण दुर्लक्ष करून) निरीक्षण नोंदवले. अधिक काही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थातच, निव्वळ शैली पाहता थोडेफार साम्य आहे हे मान्यच केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काल संपूर्ण ३ भाग परत वाचले. वेडी झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कमेंटस् मुळे धागा वर आला म्हणून वाचायला मिळालं. तिनही लेख वाचले. किती सुंदर लिहिलंय. निव्वळ वेड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाप रे काय मस्त कविता आहे. परत तीन्ही भाग वाचले. अवर्णनिय वाचनानुभव!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतकंच म्हणेल "तुम्ही पाऊस जगला आहात!" Smile
पुलेप्र!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile