निर्घृण खून..

निर्घृण खून..

काय अपराध
होता तयांचा
जे त्यांस
असे मरण यावे?
माणसांतल्याच लांडग्यांनी
तयांस जीवे
ऐसे मारीले
ह्या माणसांपरि
ते लांडगे तरी बरे
हेरतात ते सावज
भुक शमविण्यासाठी
संचारबंदी असोनी
ऐसा जथ्था तेथ जमला
अन्
माणसांतल्या माणुसकीचा
निर्घृण खून तेथेची जाहला..

- Dipti Bhagat

(त.टी. : सदर कविता ही पालघर जिल्ह्यातुन सुरतला निघालेल्या तीन प्रवाश्यांवर लोकांच्या जमावाने पोलिसांदेखत हल्ला केला. या दुःखद घटनेवर आधारीत!)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मन्याऽ = दिप्ती भगत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्वल, शाळेत हजेरीपटावरच नाव दिप्ती भगत. अन् घरातले सगळेच मन्या हाक मारतात. म्हणुन जालावर वावरताना "मन्या ऽ" आयडी वापरते. Smile
कवितेवर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा! मला जाणुन घ्यायला आवडेल.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile

Smile नाही म्हणजे गल्ली चुकली की काय असं वाटलं म्हणून इचारलं.
-------
कवितेचा गाभा समजला नाही त्यामुळे पास!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या लहानपणी 'शुक् शुक् मन्या, जातोस की नाही, की घालू तुझ्या पाठीत लाटणं?' असे एक अत्यंत लोकप्रिय गाणे होते, ते उगाचच आठवून गेले. असो चालायचेच.

----------

कवितेबद्दल माझी प्रामाणिक प्रतिक्रिया सावकाशीने देतो.

----------

म्हणजे, तशा माझ्या प्रतिक्रिया नेहमी प्रामाणिकच असतात, परंतु तरीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@'न'वी बाजु
'शुक् शुक् मन्या, जातोस की नाही,>>> जातेस की नाही अस हवंय.. Mosking

आपला प्रामाणिक प्रतिसाद जाणुन घ्यायला आवडेल! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile

कवितेच्या फुटर मधे आता त.टी. ऍड केली आहे.

नाही गल्ली नाही चुकली. मन्या या आयडी नावामुळे अनेकदा असा गोंधळ याआधी मायबोलीवर झालाय.. खुपच अवांतर बोलतीये. थांबते! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile

कविता आवडली नाही. त्या दु:खद घटनेप्रती भावना मनापासून असल्या तरी, एक कविता म्हणून जमली नाहीये असं वाटतं.
तळटीप नसती तर कविता कशावर आहे हे कळलंच नसतं. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

आपल्या थेट प्रतिसादासाठी धन्यवाद!
इथे मला त.टी. द्यावी लागली तेव्हाच कविता लिहिताना कुठेतरी कमी पडली कि काय? अस वाटल. कारण मुक्तछंद वाचकाला तटी न देता थेट भिडायला हवं. अस वाटत होत.. असो. पुढच्यावेळी ती काळजी मी नक्कीच घेईल.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile

इथे मला त.टी. द्यावी लागली तेव्हाच कविता लिहिताना कुठेतरी कमी पडली कि काय? अस वाटल. कारण मुक्तछंद वाचकाला तटी न देता थेट भिडायला हवं. अस वाटत होत..

ते एक झाले. शिवाय, तयांचा, तयांस, ऐसे मारीले, ऐसा जथ्था तेथ जमला, तेथेची जाहला वगैरे archaic रूपप्रयोगांनी कवितेला कोणत्याही प्रकारचा भारदस्तपणा येत नाही; उलट, उगाच कृत्रिमता येते, आणि कवितेमागील भावनेच्या प्रामाणिकपणाचा पचका होतो. सबब, तो मोह टाळावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा मुद्दा नक्कीच लक्षात ठेवेल. आणि नेक्स्ट टाईम काळजी घेईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile

मी सहसा कविता वाचायला जात नाही. पण विचार केला बघू काय लिहिलं आहे.
मुळात ती बातमी आणि विडिओ त्या घटने दिवशी पाहिलेला. गावकऱ्यांना कुणी भडकावू बातमी दिली असावी की पोरं पळवणारे आलेत. मग त्यांनी तोड केली.
अशी घटना आम्ही अनुभवली आहे. आम्हालाही मारायला पहारी कुऱ्हाडी घेऊन तरुम आलेलज. पण त्यांना लांबूनच सक्षजले की आम्ही ते पोरं धरणारे साधू नाहीत आणि आम्ही वाचलो.
कवितेतला विचार पोहोचला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कवितेतला विचार पोहोचला. >>> मला कवितेत जे सांगायच होतं. ते कुणालातरी जाणवलं. यातच माझ्या मनाचे समाधान झाले. मनापासुन धन्यवाद! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile