वाट..

वाट..

जुन्याच एका वाटेवर
वाट चुकले होते मी
आज पुन्हा मी
त्याच वळणावर
नवी वाट शोधते आहे

भांबावलेली आहे मी
गोंधळले ही आहे मी
पुन्हा पुन्हा वाट
शोधुन दमले आहे मी

अशी कशी मी ही वेडी
इतकी कशी मी
बावरलेली;
वाट स्पष्ट समोर असुन ही
वाट शोधत भटकणारी मी

वाट हरवली आहे
म्हणून जीवनात माझ्या
निराशेचा हा काळोख
देईल का मज
करुन कोणी
माझ्या नव्या वाटेची ओळख

अखेरीस कोणीतरी
हाक मजला दिली
हीच आहे ती वाट तुझी
अशी खात्री मजला दिली

ती हाक ऐकुन
धीर आता
मजला आला
हाक देणारा तो आवाज
मला आता ओळखीचा वाटला

उमजले मला नंतर
ही हाक तर आहे
माझ्याच अंतर्मनाची
त्यानेच तर शोधली आहे
वाट माझ्या
नव्या प्रवासाची

पुन्हा जुन्याच
त्या वळणावर
मी मला नव्याने भेटले
माझी मी मलाच आता
नव्याने ओळखु लागले

एकदा वाटले
माझे मलाच हा तर आहे
परतीचा प्रवास
तेव्हा अंर्तमनाने
दिला आवाज
हा तर आहे
तुझ्या आयुष्याचा
नव्याने घडणारा प्रवास!

- Dipti Bhagat

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ही भांबावलेली कविता छान जमली आहे. सहज ओळी आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद शरद..
सदर कविता माझा पहिलाच काव्यलेखनाचा प्रयत्न आहे.. ही कविता लिहीताना खर तर मी स्वतः माझी वाट शोधत होते. त्यामुळे तेव्हाची माझी मनस्थितीच बांभावलेली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile

>>>>माझ्याच अंतर्मनाची
त्यानेच तर शोधली आहे
वाट माझ्या
नव्या प्रवासाची>>>> छान सकारात्मक वळण. आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थँक्स सामो!
माझ्या जुन्या कविता परत वाचताना तुला तीच कविता नव्याने समजेल. थोडीफार वेगळी भासेल.. असे वाटते आहे.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile

...'मज', 'मजला'सारखे archaic शब्दप्रयोग कवितेचा जो एक सहज फ्लो आहे, त्याची वाट लावतात. (Pun not intended.) उगाच ओढूनताणून जबरदस्तीने घालायचे म्हणून घातल्यासारखे वाटतात.

(शिवाय,

ती हाक ऐकुन
धीर आता
मजला आला
हाक देणारा तो आवाज
मला आता ओळखीचा वाटला

इथे, कवयित्री एका उंच इमारतीतल्या (सुरुवातीच्या सलग भरपूर मजल्यांवर थांबण्याची सोय नसलेल्या) एक्सप्रेस लिफ्टमधून चाललेली आहे, त्यात पुन्हा ती प्रचंड क्लॉस्ट्रोफोबिक आहे, आणि अशा अवस्थेत भरपूर वेळानंतर अखेरीस तिचा गंतव्य मजला आल्यावर ('मजला आला!') लिफ्टचा जो पूर्वसूचनात्मक 'डिंग' असा आवाज येतो, तो ऐकून तिला प्रचंड 'हुश्श!' झालेले आहे, अशी काहीबाही चित्रे डोळ्यांसमोरून तरळून गेली. कवयित्रीला ती अर्थातच अपेक्षित नसावीत, याची खात्री आहे.

सांगण्याचा मतलब, कीप इट सिंपल. जिथे 'मला' चालू शकेल, तिथे विनाकारण 'मज', 'मजला' नको. विशेषतः, कवितेच्या एकंदर एरवी साध्या, सोप्या, प्रवाही बाजाशी ते विसंगत असताना.

बाकी कविता छान आहे.

(आणि हो, आणखी एक. मुद्दा मामुली वाटेल, परंतु,

हिच आहे ती वाट तुझी

'हिच' नव्हे. 'हीच'. शुद्धलेखनाकडे अंमळ लक्ष ठेवा. (शुद्धलेखन लक्ष वेधून घेण्यासाठी जाणूनबुजून गंडवले असेल, असे वाटत नाही. तशी गोष्ट असती, तर ती वेगळी होती, नि कदाचित खपूनही जाती. परंतु इथे तसे वाटत नाही. शिवाय, वृत्तात बसवण्यासाठी शुद्धलेखनास फाट्यावर मारायचे लायसन वापरलेले आहे म्हणावे, तर इथे तोही प्रकार नाही. (मुळात कविता कोणत्याही वृत्तास धरून नाही. अर्थात, असलीच पाहिजे, असे बंधन नाही, परंतु मग तो लायसनवाला मुद्दा उद्भवू शकत नाही.)

होते काय, की असल्या चुका - वरकरणी कितीही क्षुल्लक वाटल्या, तरीही - वाचणाऱ्याच्या चटकन डोळ्यांत खुपतात, नि गरज नसताना, अकारण लक्ष आपल्याकडे - नि कवितेपासून दूर - वेधून घेतात. कशाला ती संधी त्यांना द्यायची?)

(अतिअवांतर: या कवितेशी संबंध नाही, परंतु, 'सनराइझ' अशा अर्थीचा जो मराठी शब्द आहे, तो 'सूर्योदय' असा लिहितात. Mosking )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अपेक्षित बदल केला आहे..

मजला : तुमची विनोदबुद्धी प्रचंड आवडली मला.. ह्या कवितेला लिहुन वर्ष झालं. तेव्हा जशी सुचली तशीच कागदावर उतरवली होती.. त्यानंतरच्या कवितांमध्ये पण मज/मजला असे शब्दप्रयोग मी अगदी सहज(?) वापरले आहेत.. त्या कवितांमधल्या शुद्धलेखनाच्या चुका सुधारुन इथे पोस्ट करेल.. तरी चुका आढळल्या तर नक्की सांगा.. Smile
कवितेतले छंद, वृत्त, गण, मात्रा यांबद्दल शिकायचा-जाणुन घेण्याचा प्रयत्न करतीये. पण त्या वृत्तबद्ध कविता लिहिताना मनातले सहजभाव कवितेत उतरतील का? असा प्रश्न मला पडतो..

(अतिअवांतर? : शुद्धलेखनाचा कायम कंटाळा केला त्याचाच परिणाम! Mosking )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile