बाठोणी (सासव)

एप्रिल अर्धा संपत आलाय. काही दिवसातच घरा घरांतुन आंब्यांचा सुगंध दरवळु लागेल. तस बाजारात आंब्यांच्या राजाच आगमन झालेल आहेच. पण सध्या त्यांचे नगा-गणीक भाव पहाता महागाईने आधीच फाटलेल्या खिशाला ठिगळं लावायची पाळी यायची. त्यामुळे तुर्तास अजुन काही दिवस वाट पहाण्या शिवाय गत्यंतर नाही.

माझं घर आणि आजोळ कोकणात (दोन्ही एकाच गावात समोरा समोर) असल्याने 'एप्रिल-मे'मध्ये घरी कधी आंब्यांचा दुष्काळ जाणवला नाही. एप्रिल महिन्याच्या मध्यावर मामा आंब्याची करंडी घेउन मुंबईतल्या घरी हजर असायचाच. मे महिन्यात शाळेला सुट्टी लागली की मग गावी आंब्यांचा फडशा पाडण्याच्या कामगीरीवर जातीने रुजु व्हायचो. आम्हा भावंडांमध्ये आंबे, ताडगोळे, शहाळी रिचवायच्या शर्यती लागायच्या. एप्रिलमध्ये लोणची, पन्हं, मुरांबे आदींच्या तावडीतुन वाचलेल्या कैर्‍या, आजी- मामाने माळ्यावर पेंड्यांमध्ये पिकायला ठेवलेल्या असायच्या. आम्ही गेलो की त्याचा फन्ना तर उडायचाच पण स्वतःच्या हाताने (दगड मारुन वा बेचकीने) वाडीतल्या झाडांवरचे आंबे पाडुन खाण्यात जी मजा असायची ती वेगळीच. असो तर सांगायचा मुद्दा काय तर बालपणी आम के आम आणि गुठलीयोंके दाम पण नाही.

मे महिन्यात हटकुन घरी होणारा पदार्थ म्हणजे बाठोणी (बाठ्यांच सासव.) इथे आफ्रिकेत तस पाहिल तर बारा महिने झाडांवर कैर्‍या लागलेल्याच असतात, पण आंब्यांचा खरा मौसम हाच, एप्रिल-मे. सध्या बाजारात सर्वत्र रायवळ आंबे दिसु लागलेत. काल आईच्या हातच्या बाठोणीची आठवण झाली. म्हटल मौका हे दस्तुर भी है. होउन जाउदे.
तसा हा पदार्थ बनवण्याच्या दृष्टीने काही फार पेश्शल नाही. मुळात रायवळ आंब्यांची आंबट गोड चव आणि त्यात थोडी मॉडिफिकेशन केलं की झालं. Smile

साहित्य :

माणशी किमान दोन ते तीन बाठे येतील या हिशोबाने रायवळ (चोखायचे) आंबे घ्यावे. एक कुणाच्या दाढेलाहील लागणार नाही. Wink
मी सहा घेतले. Smile

फोडणीसाठी :
१ मोठा चमचा जीरं.
१ लहान चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा काळीमिरी पुड (भरड)
मीठ चवी नुसार.
२ मोठे चमचे साजुक तुप.

कृती :

आंबे, सालं सुटी होतील इतपत हलक्या हाताने दाबुन घ्यावे. सालं काढुन बाठे गरा सकट बाजुला काढावे.
सालीत उरलेला गर चमच्याने काढुन घ्यावा. वाटल्यास दोन आंब्यांचा पुर्ण रस काढावा.

कढईत तुपावर जीर, काळीमिरी, लाल तिखट आणि मीठाची फोडणी करावी.

बाठे आणि रस अलगद फोडणीत सोडावे. चमच्याने हलकेच एकत्र करावे.
लहान आचेवर ५ मिनिटं शिजवावे.

शक्यतो गरमा-गरमच वाढावे. (वाटल्यास सोबतीला चपाती-पुरी-भाकरी. नाहीतर नुसतेच.)
आंब्याच्या आंबट गोड चवीला किंचित तिखट आणि मीठाची अफलातुन जोड.

बघता काय सामिल व्हा. Smile

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वा वा वा! समयोचित पाकृ
आता येतीलच आंबे पंधरवड्यात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आहा! उन्हाळ्यातली माझी अतिप्रिय पाककृती!
किंचित फरक - फोडणीला सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि आमरसात थोडं ओलं खोबरं आणि (तिखटाऐवजी) सुकी मिरची वाटून घालायची. हवा असला तर किंचित गूळ किसून घालायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

किंचित फरक - फोडणीला सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि आमरसात थोडं ओलं खोबरं आणि (तिखटाऐवजी) सुकी मिरची वाटून घालायची.

बरोबर, या बद्दलही ऐकुन आहे. पण कधी चाखल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

हे मेथांब्याचे भावंड दिसते आहे. कधी चाखली नाही बाठोणी. संधी मिळताच करुन बघेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास रे गणपा Smile

बाठोणी मी कित्येक वर्षांत खाल्ली नाहिये. इकडे बंगळूरात तर सगळा आनंदी आनंदच आहे Wink

सुरेख फोटो आणि सुरेख पाककृती.
येत्या १-२ महिन्यांत पुण्याची पायधूळ झाडायचा विचार आहे, गणित जमले तर आईला बाठोणी करायला सांगतो ही. Smile
हापूसची अजूनही मी इकडे बंगळूरात वाट बघतोय. खिसा खूपच जास्त ताणला जातोय सध्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करायलाच पाहिजे. जवळच्या दुकानातल्या कैर्‍या सदानकदा गाभुळलेल्याच असतात. (आंबट कैर्‍या धड नाहीत, गोड आंबे धड नाहीत.) पण सासवासाठी उत्तम.

(अमिता सलत्रींनी लिहिलेल्या "रुच्चिक" पुस्तकात दोन प्रकार आहेत: शिजवलेल्या आणि बिगरशिजवलेल्या घोटांचे सासव, असे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणत्या जातीचे आंबे?

मी हा प्रकार कधीच खाल्लेला नाही. रायवळ हा प्रकार विकत आणून खायचा नाही. आणि आंबा हा प्रकारच, इतर फळांप्रमाणेच प्रोसेसिंग करून खाण्याच्या प्रकारातला नाही असं मत आता गणपामुळे बदलतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी हा प्रकार कधीच खाल्ला नाही - यंदा करून पाहिलाच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदर हा प्रकार बर्‍याच जणांसाठी नवा होता तर.
मी ही पाककृती(?) टाकावी की नाही हा विचार करत होतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

>>एकंदर हा प्रकार बर्‍याच जणांसाठी नवा होता तर.<<

सासव ही जातविशिष्ट (सारस्वत) आणि/किंवा स्थानविशिष्ट (कोकण किनारपट्टी) पाककृती आहे. त्यामुळे ती परिचित नसावी. असेच काही अफलातून सारस्वत प्रकार म्हणजे हळदीच्या पानातला बांगडा, आंबट, साँग, भुजणं, तिरफळ घालून कालवण वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मीदेखील हा प्रकार पहिल्यांदाच ऐकतेय, करून पहायलाच हवा. कच्च्या कैरीचे कायरस, मेथांबा वगैरे पदार्थ अगदी सुपरिचित आहेत पण पिकलेल्या आंब्याला फोडणी देण्याचा प्रकार नवीनच आहे, चिजं म्हणतात त्याप्रमाणे स्थानविशिष्ट किंवा जातीविशिष्ट असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0