घे भरारी..

घे भरारी..

स्वप्नसुखांचे लेवुन पंख
घे भरारी गगनात
आभाळ आहे तुझेच परि
तु तुझिया मायेला विसरु नको

श्वासात घे भरुन तु
ती अविरत ऊर्जा त्या भानुची
घे भरारी गरुडापरि तु
असुदेत एक नजर भूवरी

नंदादीप तो जळत राहो
तुझ्या इच्छा-आकांक्षाचा
निसर्गाचे ते अनमोल देणे
तु परतवत रहा त्याला..

- Dipti Bhagat

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पहिल्या दोन कडव्यांत पक्षी, आकाश, भरारी आल्यानंतर तिसऱ्यात एकदम 'नंदादीप'तडमडायला नको. झाड, डोंगर चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'नंदादीप' तडमाडायला नको. झाड, डोंगर चालेल.>> हे लक्षात आलंच नव्हत. ही कविता एका लहानगी साठी अगदी 4-5मिनटांत झाली. मी तशीच पोस्ट केली. आता अशा चुका टाळायचा प्रयत्न करेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile

लहानांसाठी लिहिणे फार अवघड असतं. त्यांच्या छोट्या गमतीदार विश्वात शिरावं लागतं. अर्थहीन पण गडबडगुंडा ध्वनी त्यांना फार आवडतात.
कवितेने भरारी घेतली की गाणं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0