हॉरसशू क्रॅबस अँड शू बर्ड्स - पुस्तक परिचय

पुस्तकविश्ववरती फार पूर्वी लिहीलेला एक पुस्तकपरिचय सापडला. कोणी डेलावेअरचे आहे का? लुइस नावाचा डेलावेअरमधला भाग अतोनात निसर्गसंपन्न आहे. एकंदरच डेलावेअरला पक्ष्यांची विपुलता आहे.
________________________________
https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/51r-66YSGiL._SX384_BO1,204,203,200_.jpg
.
माझ्या मुलीबरोबर मी बॉर्डर्स या पुस्तकांच्या दुकानात प्रवेश केला आणि आम्ही दोघी एका टेबलवर आपापल्या पुस्तकामध्ये रममाण होऊन गेलो. नेहमी हे असच होतं पुस्तकांच्या दुकानात प्रवेश, मी कॉफी घेते आणि मग एका टेबलवर आम्हा दोघींची २ वेगवेगळी विश्व साकार होऊ लागतात. जिवंत, अतिशय मोहमयी, आम्हाला हरवून टाकणारी. त्यात खंड पडतो तो फक्त एक पुस्तक बदलून दुसरं घेण्याकरता.
आज मी जरा बदल म्हणून कविता किंवा स्वयंसुधारणा (सेल्फ्-इंप्रूव्हमेंट) ही नेहमीच्या विषयांची पुस्तकं न घेता माझ्या मुलीकरता म्हणून काही मिळत आहेत का हे बघत होते. मला माहीत नव्हत एक अतिशय सुंदर, शब्दांनी चित्र रेखाटणारे आणि चित्रांतून कविता बोलणारे असे पुस्तक मला मिळणार आहे.सहज म्हणून मी "हॉरसशू क्रॅबस अँड शू बर्ड्स" हे पुस्तक चाळू लागले. पहीलं जाणवलं ते हे की पानापानावर समुद्राच्या पोटातील गूढरम्य सृष्टी चित्रकाराने त्याच्या समर्थ कुंचल्याच्या फटकार्‍यातून उभी केलेली आहे.
पुस्तकाची सुरुवातच खिळवून टाकणारी आणि उत्सुकता ताणणारी आहे. "वसंतातील दाट धुक्याने आछादलेल्या चांदण्या रात्री , डेलावेअरच्या खाडीमध्ये खोल समुद्रतळातून एक पुरातन जीव आपला प्रवास सुरु करतो आहे....कोण आहे हा प्राणी?" आणि मग प्रत्येक पानागणिक आपल्याला नवी , अद्भुत माहीती मिळत जाते त्या प्राण्याबद्दल. त्याचा जीवनपट, त्याचे जीवनचक्र (लाइफ्-सायकल) आपल्या समोर उलगडत जाते आणि आपण हॉरसशू खेकड्याच्या प्रेमात कधी पडतो ते आपल्याला कळतही नाही. परत हे सर्व वाचत असताना पुस्तकात विविध मोहमयी आकृतीबंध इतस्ततः पाहून हा खेकडा अगदी डोळ्यासमोर साकार होतो. त्याला असलेले १० पाद, एखाद्या कोळ्यासारखं त्याचं चालणं, त्याची हिरव्या मोत्यांसारखी अंडी, त्याचं पाण्यात उलटं पडून पोहणं सारं काही डोळ्यासमोर उभं राहतं.
जसजसा वाचक गुंतून पुढे पुढे वाचत जातो तसतसा त्याला या खेकड्याचे पर्यावरणातील विशिष्ठ स्थान (नीश) विशेषतः अन्नसाखळीमधील, स्थान कळते. दक्षीण अमेरीकेतून जेव्हा रेड नॉट पक्षी आणि तत्सम अने दुर्मीळ पक्षी जेव्हा स्थलांतर करून येत असतात तेव्हा डेलावेअर खाडीमधे घरट्यात हॉरसशू खेकड्याची मादी असंख्य अंडी घालत असते. हे रेड नॉट पक्षी जेव्हा डेलावेअर खाडीमध्ये विश्रांतीकरता उतरतात तेव्हा हीच अंडी समुद्राच्या लाटांनी किनार्‍यावर पसरतात. आणि पक्षांकरता मेजवानी ठरतात. पक्षांना हे अतोनात सोईस्कर ठरते कारण स्थलांतर करून आल्याने या पक्षांमध्ये एवढे त्राणच उरलेले नसते की ते मासे पकडून खाऊ शकतील अथवा कवचधारी प्राण्यांचे कवच फोडू शकतील. अशा रीतीने निसर्गच साक्षात या पक्षांची काळजी वहात असतो.
या खेकड्यांचे हे पर्यावरणातील स्थान आता कुठे माणसाला कळते आहे. आतापर्यंत मानव यांना कापून माशाच्या गळाला अमीष म्हणून लावत असे.त्यामुळे खेकड्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते. पक्षी, या खेकड्यांवर अवलंबून असलेल्या पक्षांचे अस्तिवदेखील धोक्यात येऊ पहात होते.
मला हे पुस्तक खूप आवडले.यामागील कारण कदाचित हे असेल की डेलावेअर हे मला "घर" वाटते. आम्ही खूप फिरलो- कॅलिफोर्निआ, डेलावेअर, पेससिल्व्हेनिआ, व्हरमोंट, टेक्सास पण स्थैर्य आणि आनंद डेलावेअरला लाभला. हे पुस्तक "डेलावेअर" विषयी असल्याने येथील "लोकल" या भागात सापडते. पुस्तक वाचनिय आहेच. ज्यांना निसर्गप्रेम आहे त्यांच्यासाठी मी जरूर शिफारस करेन.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Me Delaware la yeun gele aahe. Ameriket barech bhag nisarg ramya aahet. Chhan lihile aahe. Pustak shodhun vachayacha prayatn nakki karin. Me 25 state madhe jaun aale aahe. ajun 25 kadhi jayala milatat dev jaane

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा मस्त. खरे आहे खूप निसर्गरम्यता आढळते. आधुनिकता व पर्यावरण दोहोंचा समतोल आढळतो.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार प्लॅनेट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्वीची पुस्तकं पाहिली की एक लगेच जाणवते ते म्हणजे चित्रकारी. हे माध्यम फोटोग्राफीपेक्षाही दांडगे आणि स्वस्त आहे. निरनिराळ्या दोन तीन घटना किंवा दृष्ये एकाच वेळी एकाच चौकटीत पकडायला फोटोग्राफीत खूप वेळ जातो पण चित्रकार ते सहज जमवू शकतो.
शिवाय शाब्दिक वर्णन भावनांसाठी.
कधी वाटतं अशी चित्रकला आपल्याला साध्य हवी होती.
वाचकाला त्या जागी नेण्याचे सामर्थ्य आहे चित्रांत.
परिचय आवडला.
तुम्हाला मुलीबरोबर अशी संथ वेळ घालवायला मिळते हे सुद्धा छानच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद च्रट्जी Smile
>>>>>>>कधी वाटतं अशी चित्रकला आपल्याला साध्य हवी होती.
वाचकाला त्या जागी नेण्याचे सामर्थ्य आहे चित्रांत.>>>>> हा मुद्दा फार आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0