त्या स्वप्नांना..

त्या स्वप्नांना..

काय करु? समजत नाही.
मनास माझ्या मी
कसा आवर घालु?
हे मज आता उमजत नाही..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..

स्वप्न आहेत ती
काही श्रावणातल्या पावसाची
तर काही बहरलेल्या वसंताची..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..

स्वप्न आहेत ती
घोटभर चहाची
अन् भरपुर गप्पांची..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..

स्वप्न आहेत ती
शरदातल्या चांदणरातींची
हेमंतातल्या ऊबदार रजईतली..
पण झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी चेतवाया जात नाही...

-दिप्ती भगत
(१५मे,२०२०)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दुसऱ्या आणि चौथ्या कडव्यांतल्या ऋतुंप्रमाणेच पहिल्या आणि तिसऱ्यांत आणायला हवेत. किंवा तिसऱ्यातल्या रोजच्या चहापानसारखे काही वर्णन इतर कडव्यांत टाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही कविता प्रेयसीच्या नजरेतुन लिहायचा प्रयत्न केला होता. लिहीली तेव्हा योग्य वाटत होती. असो..

तुम्ही दिलेल्या सुचनांचा मला पुढच्या लेखनासाठी नक्कीच फायदा होईल. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile