ती अन् पाऊस..

ती अन् पाऊस..

खूप दिवस झाले
आता पावसात
चिंब चिंब भिजून
भरलेल सावळ ते आभाळ
नजरेत साठवणारी ती

भिजावं का थोडतरी?
ह्या येत्या पावसात
चिंब चिंब घेऊ न्हाऊन
असा विचार करणारी ती

गेले कित्येक दिवस
दिवस? छे! कित्येक वर्ष
रिमझिम पावसाकडे बघतीये
छत्रीबाहेर हात काढुन
भिजण्याचा प्रयत्न करतीये

हा पाऊस मात्र
द्वाडच फार
भिजविले मलाच फक्त
मन मात्र तसेच कोरडे

शुष्क तिचे नयन अन्
मन तिचे व्याकुळलेले
त्या धरेसम
कोरडे-तहानलेले
विचार करत
दाटल्या मळभाकडे पाहत
निष्फळ उसासा टाकत
दीनवाणे हसणारी ती

आता वाट
पाहते आहे ती
येत्या आषाढसरींची
अगदी आभाळासारखंच
तिच मनही भरुन आलंय
आता गरज आहे फक्त
एकदा धो-धो कोसळण्याची!

अपुर्ण

-दिप्ती भगत
(१७मे,२०२०)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला कवितेतली कल्पना प्रतिभा किती प्रगल्भ आहे ते मोजता येत नाही पण एक तंत्र म्हणून तुझ्या चारही कविता वाचल्या.
ही कविता थोडी दूर जाऊन ( म्हणजे मी लिहिली हा विचार बाजूला ठेवून )वाच. संपूर्ण कवितेत पाऊस आणि 'मी', मन, याची सांगड घातली आहे. जमली आहे. खरंच जमली आहे.
कविंमध्ये ( आणि लेखकांतही) दोन प्रकार आहेत. सहज सुचल्यावर लिहितात. आता हे नेहमी आणि सातत्याने म्हणजे दर आठवड्याला महिन्याला वळणारे नसते. पण कलाकृती उत्तम असते.
अगदी सिद्धहस्त साहित्यकार मात्र तंत्र संभाळून मागणीप्रमाणे औषधाच्या कारखान्यांत गोळ्यांना मक्याच्या पिठाचे आवरण चढवतात तसे भौनांचे ( भावनांचे) आवरण चढवून वेळेत सादर करतात.
उर्मी आणि तंत्र याची सांगड घालणे.

एकदा मंगेश पाडगावकरांनी लिज्जत पापडाच्या जाहिरातीसाठी पावसावर एक कविता ७ जूनला लिहून दिलेली ते आठवलं.

(बोअरिंग झाल्यास उत्तरदायित्वास नकार.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. नक्कीच. तसा प्रयत्नसुद्धा करतीये. माझ्या जुन्या कविता तटस्थपणे वाचताना त्या लिहीताना झालेल्या चुका आता दिसत आहेत. आणि ती प्रोसेस आवडतीये.

ही कविता काही दिवसांपुर्वीच केलीये. तेव्हा 'ती आणि पाऊस' असा त्या दोघांचा प्रवास दाखवायच मनात आहे. पण असा एखादा मनाशी विचार ठरवुन कविता करायचा पहीलाच प्रयत्न. तो कितपत जमेल हे ठाऊक नाही. (कदाचित कविता वाचताना तुम्हालाही ते जाणवलं असाव.)
इतर कविता सहज सुचल्या तरच लिहील्या गेल्या आहेत.

मंगेश पाडगावकरांची कुठली कविता? सांगाल का प्लीज.. कवितावाचन आताशी कुठे सुरु केले आहे. याआधी कवितांचा संबंध फक्त शाळेपुरता मर्यादित होता..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile