एक तारा...

आभाळातून एक तारा खिडकीत येऊन मला म्हणाला...
आभाळातून एक तारा खिडकीत येऊन मला म्हणाला...
दु:ख माझं शब्दात सांगशील का रे ह्या जगाला...?
त्यांच्या इच्छे खातर, हे माझ्या तुटण्याची वाट बघतात,
अन मला तुटतांना बघून, अरे हे खुशाल खुश होतात...

मी म्हटलं, मित्रा हे जग असंच आहे सारं...
मी म्हटलं, मित्रा हे जग असंच आहे सारं...
दुसऱ्याच्या स्वार्थासाठी, कुणी दुसरंच मरतं बिचारं...
तरी एकदा तुझ्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन,
तुझ्या निष्पाप आसवांना शब्दात मांडून बघेन...

तो तारा खुश होऊन म्हणाला, सांग काय हवंय तुला...?
तो तारा खुश होऊन म्हणाला, सांग काय हवंय तुला...?
मित्रा तुझं हे ऋण एकदा तरी फेडायचं मला...
तुझी देखील एक इच्छा पूर्ण करेन मी,
तुझ्यासाठी तर एकदा स्वत:हून तुटेन मी...

मी म्हटलं, तू बोललास हेच भरपूर आहे...
मी म्हटलं, तू बोललास हेच भरपूर आहे...
दुसऱ्यासाठी तीळ-तीळ तुटणं मी चांगलंच जाणून आहे...
हृदयाच्या अगणित तुकड्यांना सावरलंय मी...
माझ्या प्रत्येक आसवाला हसण्यात आवरलंय मी...

खरंच काही करायचं असेल ना तुला माझ्यासाठी,
खरंच काही करायचं असेल ना तुला माझ्यासाठी,
तर सदैव चमकत राहा त्या आभाळी फक्त स्वतःसाठी...
पुरे ते दुसऱ्यासाठी झुरणं अन दुसऱ्यासाठी तुटणं,
कळूदे जगाला काय असतं फक्त स्वतःचाच विचार करणं...

"तसंच करेन दोस्ता..." असं म्हणून तोही निघून गेला...
"तसंच करेन दोस्ता..." असं म्हणून तोही निघून गेला...
स्वतःतचं थोडंस तेज तो माझ्या खिडकीवर ठेवून गेला...
रोज रात्री त्याच खिडकीत बसून मी त्याला बघत बसतो...
तो आजही तसाच चमकतोय हे बघून मीही खुश होत असतो...

पूर्वप्रकाशित

- सुमित

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

छान! कविता आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋषिकेश...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

सुमित,
कविता आवडली. आशयही छान आहे.

हृदयाच्या अगणित तुकड्यांना सावरलंय मी...
माझ्या प्रत्येक आसवाला हसण्यात आवरलंय मी...

अशा ओळी हेलावून गेल्या. खूप छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सागर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

छान. आवडली कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मंदार...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

पहिली ओळ दोन वेळा लिहिण्याची कल्पना वेगळी वाटली - आवडली का नाही त्याबद्दलच मत मात्र अजून बनलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

त्यांच्या इच्छे खातर, हे माझ्या तुटण्याची वाट बघतात,
अन मला तुटतांना बघून, अरे हे खुशाल खुश होतात...

मस्तच कल्पना!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सारीका...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

अप्रतिम ……
शब्द न शब्द भावला खरंच ……

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

अप्रतिम ……
शब्द न शब्द भावला खरंच ……

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

धन्यवाद सोनालीका... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."