वय इथले संपत नाही  

वय इथले संपत नाही ... मज 'डाय 'ची आठवण येते  मी प्रात:काळी गातो.. तुझी तारुण्य गीते  हे झरे श्वेत केसांचे, ही धरती तरुणी माया  प्रेमात कुजलो आपण, प्रेमात पुन्हा उगवाया  त्या मुली नाजूक भोळया, 'वया'  ला हसून पळती  तारुण्याचे तोरण घेऊन ,आरशात होऊ द्या आरती  तो गंध मंद हवाहवासा , स्वप्ने सोडुनी गेला,  माझ्या प्रेमवासातील जणू अंगी गुलाबी शेला  गोकुळ पलीकडे तरीही तुज पाझर फुटेना थांब  फडफडत्या पापणीपाशी मी उरलासुरला थेंब  ' गीतेतील ' ओवीसम , मी सजलो प्रेमभावाने  देहाच्या भवती रिंगण , घालती सराईत मने    -अनंत छंदी 

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त जमलंय विडंबन!
फक्त कडवी पाडुन सुटसुटीत लिहा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile