आस

अशाच या कातरवेळी
निशब्द असावा
आसमंत सारा
त्यासमयी रवि तु
क्षितिजाच्या कुशीत निजावा

रवि तुज निजवताना
वारा ही गाई झुळझुळ गाणे
ती लुकलुकणारी कोर ही
बघ तुज कथा सांगे

अशाच एका कातरवेळी
बघ. कोण पणती
त्या तुळशीसमोर लावे
मंद अश्या त्या प्रकाशात
माझा ऊर भरुन वाहे

तेव्हा दुरवर कोठेतरी
मज ऐकु येते ती किणकिणारी घंटा
'आस' लागे मनास कान्हा
तसाच ऐकु येईल का रे मज
एक दिन तुझा मधुर पावा..

-दिप्ती भगत
(९मे, २०२०)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गवळी मुले ( कान्हा धरून )दुपारच्याला झाडाखाली लवंडून पावा वाजवतात बहुतेक. सांजेला परतताना नसावे. पण वाजवायला सुरू करा रे. कुणी आसुसलेले आहे.
( वात्रट प्रतिसाद.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही ओळ ऐकल्यावर अवांतर असलं तरी या जुन्या वात्रटिकेची आठवण झाली.
मुंगी व्याली चिंगी झाली तिचे दूध किती
अठरा रांजण भरुन उरले प्याले बारा हत्ती !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

बहुतेक मालक/संपादकांची तंबी येणार. "प्रतिसाद दिले नाहीत तरी चालेल, वात्रटिका करून नवसभासदांना पळवू नका."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@शरद गाडगीळ
काका, मी पळुन जाणाऱ्यांपैकी नाहीये हो.. Smile आत्ताच तर आलीये..
इथले काव्यप्रेमी वाचत असतीलच कि माझ्या कविता.. त्यांच्यासाठी थांबेल. लिहित राहील इथे.. पण लेखनात चुका आढळल्या तर सांगत जा. सुधारता येतील मला.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile

काव्य नाही समजत पण चूका काढायला पहिले !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या प्रतिक्रियेवरुन ऐसीची तंबी येणार असे वाटत असेल तर तुम्ही ऐसी प्रशासनाला अजून ओळखलेच नाहीये. असो.
प्रतिक्रिया उडवायला संपादक सक्षम आहेतच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

ऐसी प्रशासनाला ओळखले आहे.
पण कधी कधी नवसभासद तक्रारीही करतात. मन्याने हसत प्रतिसाद दिलाच आहे.
( मायबोलीवर धागाही आहेच असा. आणि अनुभव आहे.)
सोमिवर थोडे सावध असणं बरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'न'वी बाजू यांच्या रसग्रहणाच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण तुम्ही अशाच लिहीत ऱ्हावा...

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0