कौतुक कुणाचं  करावं ?

कौतुक कुणाचं  करावं ?कौतुक  कुणाचंही करावं 
पहिल्या पावसात चिंबलेल्या मृदगंधाचं करावं ,
न्हालेले केस झटकताना होणाऱ्या तिच्या विभ्रमांचं करावं , फेसाळत्या किंगफिशरच्या पहिल्या चरचरीत घोटाचं करावं ,
बॅट्समनला  क्रिझबाहेर खेचणाऱ्या बेदी , प्रसन्ना च्या फ्लाईट चं  करावं ,
बॅट्समनच्या पुठ्ठयामागून काटकोनात  चेंडू घुसवणाऱ्या शेन वॉर्नचं  करावं ,
जमिनीवर एक इंच ही न राहणाऱ्या गावसकरच्या स्ट्रेट ड्राईव्हचं   करावं, 
'तेरे बिना जिया जाये ना' ची लडिवाळ साद घालणाऱ्या 'रेखा'तल्या प्रेयसीचं करावं ,
दुनियेला फाट्यावर मारत कपुरांच्या अर्जुनाला वरणाऱ्या मलाईकाचं  करावं , प्रेमाची आर्त साद नाकारत 'विवाहरेखा ' सांभाळणाऱ्या अमिताभचं  करावं ,
कौन कम्बख्त बरदाश्त करने के लिये पिता है , म्हणत अंतर्यामी हलवून सोडणाऱ्या देवदास दिलीपचं करावं ' जो डर  गया समझो मर गया,' म्हणत थरकाप उडवणाऱ्या गब्बर नावाच्या  क्रौर्याचंही   करावं , देहदर्शनाचं लंगर उघडणाऱ्या सनी लिओने , पूनम पांडेचंही करावं  ब्रँड चं सोवळं न बाळगता कुठलीहि मदिरा रिचवणाऱ्या मद्यपीचं  करावं 
पौर्णिमेच्या चंद्रावर खांद्यावरच्या तिळाचे तिट लावणाऱ्या गुलजारच्या प्रतिभेचं करावं , कल्पनेत का होईना पण अर्ध्या छत्रीत तिच्याबरोबर भिजण्याची 'इजाजत' देणारीचं  करावं,  पुरणपोळीचं  करावं , वाडीच्या बासुंदीचं  करावं ,  तांबड्या- पांढऱ्या रश्श्याचंही  करावं , काळया चिमणीच्या मागं फिरणाऱ्या फॅन्ड्रीतल्या जब्या च्या निरागसतेचंही करावं , हार जितीचा फैसला त्रैराशिकाच्या आकडेवारीने करणाऱ्या डकवर्थ - ल्युईस चं ही  करावं , सातच्या आत घरात येणाऱ्या आज्ञाधारक पिढीचं ही  करावं , प्रेमाच्या तराजूत सर्वांना सेम माप देणाऱ्या पाडगावकरांचं  करावं , झेलबाद , यष्टीचीत सारख्या शब्दांचे जन्मदाते बाळ ज., विविक यांचं ही करावं , काका , आंटी म्हणत अनेकांना  दणकन जमीनीवर आदळणाऱ्यांचं ही करावं , ' पुरे पचास हजार ' या एकमेव डायलॉग ने अमर झालेल्या  सांभा चं ही करावं ,
तमाम सबूतो और गवाहों को मद्देनजर रखते हुए ..म्हणत अनेकांना फासावर चढवणाऱ्या सप्रूचं  करावं ,
राज सारख्या भ्रमराला सांभाळून घेत त्याच्याबरोबर  संसार करणाऱ्या कृष्णा कपूर चं ही  करावं ,
'तिचा' आधीचा ' अंदाज 'विसरून तिच्याबरोबर पाट लावणाऱ्या सुनील दत्त च्या सज्जनतेचं  करावं ,
आमच्यासारख्या नर्मदेतल्या गोट्यांना शाळेत छळणाऱ्या पायथॅ गोरसचं  करावं ,

श्यामलवर्णीयांना गोरेपणाची स्वप्नं दाखवत झुलवणाऱ्या फेअर अँड लव्हली चं  करावं ,
' ती सध्या काय करते ' चं उत्तर मिळण्यासाठी अधीर झालेल्या दहावी च्या बॅच चं  करावं ,
भारत भूषण , प्रदीप कुमार, विवेक मुश्रन  च्या नशीबाचं  करावं ,
झीरो फिगर चं खुळ लावणाऱ्या दीक्षित , दिवेकरांचं  करावं ,
' वाड्यावर ' नेणाऱ्या निळूभाऊंचं करावं     - अनंत छंदी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सबको सलाम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कौतुक चंद्राचंही करावं आणि त्याला पाहून वेडगळ हंसणाऱ्याचंही करावं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

क्या बात है अप्रतिम काव्य झरा खळाळत जाणारा
बेगुमान्
बेमुवर्त
कुठल्याही कंसात न बसणारा
बेबंद प्रतिभेचा अनिर्बंध मुक्त संचार्
जणु अम्फान जणु निसर्ग चक्रिवादळासम चक्रावणारी चकवणारी प्रतिभा
माझी अवस्था प्रतिभेच्या चक्रीवादळात सापडलेल्या रुतुपर्णासारखी झाली. मी घोषाचा अदमास घेत घेत अगोदर म्रदगंधावर स्थिरावतो तोच्
माझ्या संवेदननांना तिच्या विभ्रमाने वेडंपिसं केल, एकीकडे फेसाळणारी किंगफिशर दुसरीकडे काटकोनात चेंडु घुसवणारा मी फरफटत गेलो
सैराट झाल्या माझ्या संवेदना चंद्रा चंद्रा थांब ना
बाकी सावरल्यानंतर एक प्रश्न छळ छळ छळतोय
'तिचा' आधीचा ' अंदाज 'विसरून तिच्याबरोबर पाट लावणाऱ्या सुनील दत्त च्या सज्जनतेचं करावं ,
म्हणजे ती कोण ? आणि तिचा अंदाज विसरुन म्हणजे नक्की काय आहे हे ?

दुसर आपल एक मनातल
देहदर्शनाचं लंगर उघडणाऱ्या सनी लिओने यात लंगर शब्द कायच्या काय वाचला
चंद्रहासांच्या चक्रिवादळीय प्रतिभेत गरगरणारा शुष्कपर्ण रसिक दुसर काय्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

राज कपूरबरोबरच्या प्रेमाचा 'अंदाज ' आता ती म्हणजे हे सांगायलाच हवे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ंचन्द्रहस्