कांदे की फटके

एक गोष्ट लहानपणापासून ऐकत आले आहे.
गुन्हा केलेल्या एका माणसाला राजाने पन्नास कांदे खा किंवा चाबकाचे पन्नास फटके खा असा पर्याय दिला. गुन्हेगाराने कांदे खाणं सोप्पं समजून तो पर्याय निवडला. मात्र सातआठ कांदे खाल्ल्यानंतर चाबकाचे फटके परवडले असं वाटून फटके मारा म्हणाला. असं होता करता दोन्ही शिक्षा भोगून नशीबाला दोष देत गलितगात्र अवस्थेत पडला.
टीप: करोना आणि लॉकडाऊनने उद्भवलेल्या परिस्थितीशी याचा संबंध लावायचा असल्यास आपापल्या जबाबदारीवर लावावा. लेखकाचा हेतू आणि मन निर्मळ आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गुन्हेगाराने कांदे खाणं सोप्पं समजून तो पर्याय निवडला

या गैरसमजाला जबाबदार तमाम मराठी सासवा आहेत.

कोठल्याही मराठी लहान मुलास जर ठसका लागला, तर छपराकडे पाहावयास सांगतात. तेथे त्या मुलाची (किंवा मुलीची) सासू छानपैकी कांदे खात बसलेली असते. त्यामुळे, कांदे खाणे ही काही आत्यंतिक सोपी अशी बाब असावी, अशी त्या मुलाची (चुकीची) समजूत होते, नि लहानपणापासूनच हे बाळकडू मिळाल्याकारणाने मुलाच्या (किंवा मुलीच्या) डोक्यात रुजते, पक्की बसते.

मराठी लहान मुलांच्या मनावर अनिष्ट संस्कार करणारी ही रानटी परंपरा बंद केली पाहिजे. त्याऐवजी, छपरावर लटकलेल्या सासूस आलटूनपालटून कांदे नि फटके खाऊ घातल्यास, मुलास स्वतः कंपेयर अँड काँट्रास्ट करून, यांपैकी कोणते अधिक सोपे, हे स्वतः, प्रत्यक्ष निरीक्षणाने ठरविता येईल. मुलांना या स्वयंनिर्णयाच्या संधीपासून निदान आजच्या या आधुनिकोत्तर युगात तरी खरे तर वंचित करता कामा नये. पण लक्षात कोण घेतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलामुलींची माहेरं जबाबदार आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे कांदे खाणारी आणि छतावर बसलेली ह्या दोन वेगळ्या प्रसंगातल्या सासवा. काही मायनर फजिती झाल्यास सासू कांदे खाते आणि ठसका लागल्यास ती छतावर सापडते. तुम्ही सासूसाठी हायब्रीड प्रसंग तयार केलेला दिसतोय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असू दे, काही लोकांना नाकाने कांदे सोलण्याची असते हो संवय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.