करोनातील प्रवास ( गावाला जायचं म्हणजे जायचं)

फोटो पावसाळ्यात घाट उतरताना https://www.instagram.com/p/CE_xH4sjuY7/?utm_source=ig_web_copy_link

तोच घाट मे मध्ये https://www.instagram.com/p/B_6ZOnyJvZX/?utm_source=ig_web_button_share_...
मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोणी मूर्ख माणसे ओरडत होते की कसली तरी रोग आलाय. या दरम्यानच्या काळात मी कोक पुणे च्या प्रोड्युकॅशन युनिट ला भेट दिली होती. तेथे कमीत कमी १० इटालियन इंजिनिअर फील्ड होते जे परत जाऊ इच्छित होते. (आणि आम्ही हसत होतो)
याच कालावधीत मी पुन्हा औरंगाबाद हुन ठाणे रेल्वे मग आपल्या एसटी ने गावाला (होळीसाठी) घरी गेलो. तेथून पुढे एरोड(तामिळनाडू) मध्ये जावं लागलं मग समजलं की काहीतरी मोठं झालाय . दोन कंपन्यांनी आम्हाला दरवाजवरून परतून लावलं अस सांगत की हे एक्स्पोर्ट च प्लांट आहे , नो रिस्क.
.
यानंतर पुढे हैद्राबाद ला जायचा बेत होता पण सोबत सिनिअरने (फाटल्याने) फॅमिली कारण सांगून परतीचा रस्ता धरला, आमची फॅमिली वैगेरे नसल्याने पर्याय नव्हता. परंतु त्याच कारणास्तव मी हैदराबाद रद्द करून उगाच गोव्या च प्लॅन केला व कंपनीत समजावून वगैरे सांगितलं. (पैसे जमा होण्यासाठी).

दिनांक ११ मार्च रोजी मी कोईम्बतोर हुन मंगलोर ला जाणारी ट्रेन पकडली.
व मंगलोर गाठण्याऐवजी पहाटे कालिकत ला उतरलो.
इथली माणस जास्तच सिरीयस होती. मास्क वैगेरे लावत होती. मला हसू आल. मधल्या काळात बीच, बिग बाजार रस्ता( मसाल्यांसाठी प्रसिद्ध) व एका पुरातन शिवमंदिरात गेलो.दर्शन झाले नाही

दुसऱ्या दिवशी गोव्यात गेलो. त्यांच्या मते गोव्यात उष्णतेमुळे करोना येणार नाही. ते बिनदास्त होते.

परत औरंगाबाद.
परत आल्यावर ऑफिस मधली परिस्थिती बदललेली होती माझ्या जवळ कोणी येईना कोणी बोलना. समजून चुकलो.

२२ च्या जनता बंद नंतर कंपनी १०% ची परवानगी घेऊन ८०% कामगार सोबत चालू झाली. परंतु आमचं डोकं फिरल्याने आम्ही जायला नकार दिला.

लॉक डाऊन सैल झाल्यावर गावाला(अलिबाग) ला जायचा बेत होता पण गाड्या चालू नसल्याने स्वतः च्या दुचाकीवरून जाण्याचं ठरवलं

प्रवास अंदाजे दहा तासांचा होता वाटेत मी असंख्य मजूर त्यांच्या लहान मुलांसोबत चालत जाताना बघितलं व आपण काहीच सोसत नाही याची जाणीव झाली. त्यांचे फोटो येथे टाकणे मला योग्य वाटत नाही.
वाटेत जेवढे पोलीस चेकपोस्ट होते ते सर्व लांबूनच पास बघून घेत होते. (आमच्याकडे वाहन परवाना नाहीये)

गावाला असताना निसर्ग चक्रीवादळ येउन गेलं. फुल्ल 144 मध्ये एकदा मुंबई जाण झालं.

ज्यार्थी कंपनीने पगार थांबवला त्याअर्थी आम्हाला परत जावे लागणार.
पावसात पुन्हा लोणावळ्याच्या घाटाला बाईक लावली नि कामावर (चिडीचूप) परत आलो. त्या काळात सर्व सहकार्यांना करोना होऊन गेलेला होता. (बहुतेक मलाही).

कंपनीची लायकी समजल्याने हातपाय मारायला सुरुवात तामिळनाडू हुन परत आल्यावरच सुरू केलेली.

कोकणचा गणपती.
काही झालं तरी गणपतीला कोकणी गावला जातो अशी पूर्ण कंपनीत वदंता होती. आमची पण तेच मनात होत.

गणपती च्या एक दिवस आधी पुन्हा घाट उतरलो. या नंतर पुन्हा गाडी चढवायचे नसल्याने निवांत आलो. परत औरंगाबाद ला जाऊन राजीनामा.
सप्टेंबर २०२०

एकंदरीत या करोना काळात मी होळी, निसर्ग वादळ, गणपती, आणि दसऱ्याला घरी होतो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खरंच कठीण परिस्थिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0