नशा

आजकाल मी तुझ्या नशेत रहाते
कधीतरी तुला स्वप्नात पहाते

तुला आवडणारे रंग चितारते
तुझी लाडकी गाणी गुणगुणते

तुझ्या डोळ्यांनी स्वतःला निरखते
आरशात माझी प्रतिमा हरखते

तुझा मृदु स्पर्श आठवते
तुझं हसू मनात साठवते

चालता चालता कितीदा
तुझ्याशी गप्पासुद्धा मारते

तुझ्या नसण्याची ठेच लागून
कळत नकळत भानावर येते

तुझ्या जगात माझ्याविना तू
खुशाल असशील असं समजते

मीही इथे ठीकच असते, कारण
आजकाल मी तुझ्या नशेत रहाते..

field_vote: 
0
No votes yet