"परतीची विमान यात्रा "

पुण्याच्या त्या वाहन-प्रदूषित सायंप्रकाशात उजळून निघालेल्या
जुन्या सुहृदांच्या चेहऱ्यांना मी सांगितले की बापहो ,
वीसशे पस्तीस पर्यंत प्लीज प्लीज प्लीज टिकून रहा ,
पश्चिमेतील प्रज्ञावान शास्त्रज्ञांनी तुम्हाला
वार्धक्य-शून्य करण्याचा घातलेला घाट तोपर्यंत पूर्ण शिजलेला
असेल, उन्मत्त यमराजाच्या तोंडाला काळे फासून
त्याला रेड्यावर उलटा बसवून त्याची धिंड निघाली असेल:
तिच्यात नाचत सामील व्हा (मी असेनच !).
एकशे-वीस सहज गाठाल!
ही सुवार्ता ऐकून सुहृदांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण आणि
माझ्याकडे दयार्द्र कटाक्ष टाकले व म्हणाले
मित्रा तुला कोणत्या विचित्र अमेरिकन रोगाची बाधा
झाली आहे नकळे , "हे" सर्व चालू ठेवण्यात आम्हाला
(कोणालाही !) रस असेल असे तुला का वाटते ? अनेक
संतादिकांनी आमची यापुढची पायवाट सोपी केली आहे ,
तेंव्हा उठ आणि विमानात बसून अमेरिकेला परत जा !
यांचे संत काय म्हणाले असतील याबाबत डोके खाजवीत
परतीची विमान यात्रा पार पडली.
मेंदूचा पार भुगा झाला राव!
xxx
मिलिंद पदकी
टीनेक , न्यू जर्सी
2019

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुम्ही या असंख्य प्रश्न असलेल्या जगांत आयुष्य वाढवायचं म्हणताय ! पण आम्हाला तर संतांनी सदेह स्वर्गारोहण करायचं शिकवलं आहे. तेच सर्वोत्तम नाही का ?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

आमचे विमान वेगळे ... right?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me