पण कधीतरी

उल्कापाताच्या आतषबाजीने
दिपून जातोय मी आज
पण कधीतरी
चंद्रमाधवीच्या अद्भुत प्रदेशात
अंतर्बाह्य उजळायचंय मला

शब्दांच्या समृद्ध अडगळीत
हरवून जातोय मी आज
पण कधीतरी
शब्दापल्याडच्या घनघोर निबिडात
निरुद्देश भटकायचंय मला

लवलवत्या रंगरेषा
रेखाटतोय मी आज
पण कधीतरी
अमूर्ताचं असीम अवकाश
अनवट रंगांनी भरायचंय मला

त्रिमितींच्या अभेद्य पिंजर्‍यात
घुसमटतोय मी आज
पण कधीतरी
स्थलकालाचं
वितान व्यापून
मग थोडं उरायचंय मला

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

कविता खूपच आवडली. असेच लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह!! भव्यतेला कवटाळण्याची आकांक्षा आपल्या कवितांमधून जाणवत रहाते. फक्त हिच नाही तर अन्य कवितातही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्रिमितींच्या अभेद्य पिंजर्‍यात
घुसमटतोय मी आज
पण कधीतरी
स्थलकालाचं
वितान व्यापून
मग थोडं उरायचंय मला

हे जब्राट आहे. मितींच्या पलिकडलं विश्व म्हणजे हजार डोळ्यांनी अनुभवलेलं जग असं काहीसं असेल. (जाहिरात - थ्री बॉडी प्रोब्लेम लोकहो, वाचा!)

अनंत यात्री - लेबलं लावणं ठीक नाही, पण विज्ञान_कविता हा प्रकार तुमच्या लेखणीतून निर्माण होतो आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही.. जबरदस्त...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेच कविता वाचणार्‍या सर्व कवितारसिकांना धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0