अध्यात्माची भूमिती

अनादिच्या अल्याडचा
"अ" हा नि:संग असा एक बिंदू घेतला.
मग
अनंताला स्पर्श करू धजणारा,
ज्ञानगम्य असा,
"ज्ञ" हा दुसरा बिंदू घेतला.

"अ" ला "ज्ञ"शी जोडणारी
"अज्ञ" ही रेषा आखली.

ह्या रेषेवर
माझ्याच जवळपास
कायम घोटाळणारा
"हम्" हा बिंदू निवडला.

"अज्ञ" या रेषेशी
लंबरूप,
फटकून असणारे,
"सोs" हे प्रतल
असे निवडले
की ते "अज्ञ" रेषेला
"हम्" बिंदूत छेदेल.

"सोs" प्रतलावरील
सो१,सो२,सो३,.... सो∞ या बिंदूंपासून
"हम्" बिंदूकडे जाणार्‍या रेषाखंडांना
अनुक्रमे
"सोsहम् १",
"सोsहम्२"
"सोsहम् ३".......
....."सोsहम् ∞"
अशी नावे दिली.

मग या लंबरेषाखंडांची नावे
(१,२,३,....∞ हे प्रत्यय वगळून)
अविरत उच्चारत राहिलो.

अध्यात्माची भूमिती
(की भूमितीचे अध्यात्म?)
मग
रोमारोमात भिनत असताना
अचानक लक्षात आलं-

"अज्ञ" रेषेवरच्या
"अहम्" या रेषाखंडाची लांबी
हळूहळू
शून्यवत् होतेय.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी कधीचा त्या अनंतावर अडकून पडलो होतो. त्या अज्ञ रेषेमुळे मला परत येता आलं! कुठल्याच टोकाला न जाता, अज्ञ म्हणून लटकण्यातच मजा आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संख्यारेषेवरील कुठल्याही दोन बिंदूंमध्ये अगणित (∞) बिंदू असतात. तेव्हा 'अ-ज्ञ' अंतर हे 'अ' पासून 'ज्ञ' कडे कमीकमी होत जाताना त्याच्या 'मर्यादे'तही असे अगणित काटेकुटे असणार ह्यात शंका नाही. बायदवे, तुमच्या काव्यप्रतिभेच्या वक्ररेषेचा मागोवा, (पक्षी: Area under the curve) काढू पाहता ती समष्टीच्या परिघापल्याडची गोष्ट आहे हे निर्विवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0