आजचा बेत - भेंडींच्या दाण्याचे कालवण

बागेत दिवसातून चार वेळा फेऱ्या होत असूनसुद्धा कोपऱ्यातल्या भेंड्या काढायला आलेल्या आहेत याकडे तुमचं लक्षच न जाणं हे अगदी खरं खरं पण न पटणारं कारण हा एक महत्त्वाचा घटक आहे आजच्या रेसिपीचा.

या भेंड्या जेव्हा तोडून घरात आणल्या तेव्हा कोल्हापुरी भाषेत जून व मराठवाड्याकडील निबर झालेल्या. त्या भेंड्यांचं करायचं काय हा मोठा प्रश्न.

अशावेळी सासूबाईंची एकदम हुकमी रेसिपी कामाला येते. हो, समीरा रेड्डीसारखा सासूसोबत शो करता येत नसला तरी आमच्यातही अव्यक्त अबोल असं को-ऑर्डिनेशन आहेच की! बाय द वे, मी समीरा रेडी आणि तिच्या सासूची अधूनमधून फॅन असते बरं का!

बरं, आता भेंड्या सोलून घ्यायला सुरुवात करायची. सोलतानाच ठरवायचं की आपल्याला याच्यावर पोस्ट लिहायची आहे; त्यामुळे कसं आपलं दुर्लक्ष झालं म्हणूनच भेंड्या निबर झाल्या, जरा लक्ष दिलं असतं तर कोवळया तेल ऑरगॅनिक
सोन्यासारख्या भेंड्यांची किती चवदार भाजी झाली असती असे दोष स्वतःला देत बसत नाही आपण!

okra

सोललेले दाणे त्याचा लगेच एक फोटो काढून शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचा फोटो "guess what?" या कॅप्शनखाली टाकायचा. मधूनमधून "ज्वारीच्या घुगर्या" असे रिप्लाय आलेले असतात ते वाचून मनोमन हसायचं. "तुम्हाला नाहीच मुळी ओळखू येणार", असं पुटपुटायचं. म्हणजे उरलीसुरली गिल्ट कुठल्या कुठे निघून जाते आणि आपण काहीतरी मोठं तीसमारखान काम करणार आहोत याचा फील येतो.

घरात थोरली, मधवी, धाकटी अशा तीन लोखंडी कढया असतील तर त्यातली धाकटी कढई घेऊन त्याच्यामध्ये हे भेंडीचे दाणे गुळदाव परतून घ्यायचे.

okra seeds roasted

भांड्यात तुमच्या अंदाजानं तेलात लसणाच्या दोन पाकळ्या ठेचून घालायच्या. त्यावर आलं, लसूण, कोथिंबीर, ओलं खोबरं याचं टिपिकल हिरवं वाटण ओतायचं. त्या गर्द पोपटी रंगाच्या प्रेमात पडायचं, मात्र इथे समाधी लागू द्यायची नाही त्याच्यावर ढळत्या हातानं तीन-चार चमचे कोल्हापुरी चटणी टाकायची. माझी इस्लामपूर-सांगली येथून थोरल्या नंदेकडून आलेली चटणी आहे.

green chatni

या मसाल्याला तेल सुटू लागलं की त्याच्यामध्ये परतलेले भेंडीचे दाणे ओतायचे. पळीनं एकदा चांगले फिरवून घेतल्यानंतर भेंडीचे दाणे बुडतील इतपतच, कोमट केलेलं एक वाटी पाणी घालायचं. पहिली उकळी आल्यानंतर शास्त्र म्हणून एक चमचा शेंगदाण्याचे कूट घालावे जेणेकरून हे कालवण दबदबीत दाटसर होईल.

घरात महाराष्ट्रीयन भाज्या-आमट्यांना नाकं मुरडणारी टीनेजर मुलं असतील तर बिनधास्त उसळ आहे असे ठोकून द्या. किटो डायटच्या नावाखाली खपून जातं. आजचाच जिवंत अनुभव आहे.

ready!

बऱ्याच भाज्यांच्या बियांमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट असतात त्यामुळे हे पौष्टिक कालवण आहे. असं दबदाबीत कालवण होईल इतक्या बिया तुमच्याकडे नसतील पण कधीतरी भाजीवल्याने नजरचुकीने ४-५ निबर भेंड्या वजनात भरल्या तर तळतळ न करता भेंड्या सोलून ते दाणे रोजच्या डाळीच्या आमटीत घाला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रोगापेक्षा इलाज भयंकर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही स्वतः भेंड्या लावलेल्या नसणार!

आमच्याकडे उन्हाळ्यात मोप भेंड्या येतात. पण भर उन्हाळ्यात कधी कधी बाहेर पडायचाही कंटाळा येतो, आणि मग त्या भेंड्या राड, जून होतात. एवढ्या कष्टानं वाढवलेल्या भेंड्या फुकट गेलेल्या बघून वाईट वाटतं. बसल्याजागी ऐसी-ऐसी किंवा फेसबुक-फेसबुक खेळण्याचे पैसे मिळतात, ते थोडे फुकट गेले तर तेवढं वाईट वाटत नाही. पण स्वतः पिकवलेलं काही फुकट गेलं की वाईट वाटतं.

त्यामुळे मला या पाककृतीची कितीही भीती वाटली तरी मी बहुतेक करेन हे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही स्वतः भेंड्या लावलेल्या नसणार!

तांत्रिकदृष्ट्या, तुमचे म्हणणे बरोबर आहे. बोले तो, मी नाही, बायकोने लावलेल्या आहेत. फिल इट, फरगेट इट तत्त्वावर. बाकी अनुभव सेम टू सेम.

पण आम्ही त्या तसल्या अवस्थेप्रत पोहोचलेल्या भेंड्यांचीसुद्धा रेग्युलरच भाजी करून (कशीबशी का होईना, परंतु) खातो ब्वॉ. 'कर्माची फळे' म्हणून. हे असले अघोरी प्रकार नाही करीत काही.

(त्यात पुन्हा, अगोदरच त्या अवस्थेप्रत पोहोचलेली भेंडी. मुळात त्यांनी तशी ती अवस्था प्राप्त केली, ती त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे कष्ट न घेतल्यामुळे. त्यात वर आणखी त्यांचे दाणे काढीत बसण्याचे कष्ट कोण घेतो! काहीही काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोण म्हणतो मी स्वतः भेंड्या लावलेल्या नाहीत, म्हणून?

श्री-ग-णे-शा-य-न-म-हा. ह. है अपना दिल, तो आवारा, न जाने किस पे आयेगा. ग. गीत गाता चल, ओ साथी, गुनगुनाता चल. ल. लल्ला लल्ला लोरी, दूध की कटोरी, दूध में बत्ताशा, मुन्नी खरे तमाशा. श. शाम ढले, खिड़की तले, तुम सीटी बजाना छोड़ दो. द. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, ज़िंदगी हमें तेरा, ऐतबार ना रहा, ऐतबार ना रहा. ह. है ना, बोलो बोलो, पप्पा, बोलो बोलो, पप्पा को मम्मी से, मम्मी को पप्पा से, प्याऽऽऽऽऽऽर है, प्याऽऽऽऽऽऽर है. पुन्हा ह. हम दोनों, दो प्रेमी, दुनिया छोड़ चले, जीवन की, हम सारी, रस्में तोड चले. ल. लाल छड़ी मैदान खड़ी, क्या खूब लड़ी, क्या खूब लड़ी, हम दिल से गयेऽऽऽऽऽऽ, हाय! हम दिल से गये, हम जाँ से गये, बस काहीतरी काहीतरी बात बढ़ी. ढ. वगैरे वगैरे.

तर सांगायचा मतलब, या असल्या भेंड्या मी स्वतः लहानपणी पुष्कळदा लावलेल्या आहेत. (किंबहुना, त्यामध्ये (आमच्या टोळक्यातला) चँपियन होतो म्हटले, तरी हरकत नाही.) आणि, गंमत म्हणजे, काहीकाही अक्षरांकरिता (विचार केला असता) मुबलक सुरस आणि सुमधुर गाणी सापडण्याची शक्यता असतानासुद्धा, तीचतीच ठराविक रटाळ गाणी दर वेळेस पुन्हापुन्हा आळवली जायची. (म्हणून 'जून भेंडी'.)

परंतु, आमच्या भेंड्यांत जास्तीत जास्त अघोरी प्रकार जर कोठला होत असेल, तर तो म्हणजे अक्षरे बदलून देणे. म्हणजे, वर उल्लेखिल्याप्रमाणे, ढ आल्यास तो बदलून ड देणे. (हिंदीत ळ-ऐवजी ल, किंवा ण-ऐवजी न, वगैरे प्रकार करण्याची वेळ येत नसे. निदान ळ-च्या बाबतीत तरी.) किंवा आए/गए वगैरे मंडळी आदल्या गाण्याच्या शेवटी आल्यागेल्यास, एक तर य-ची बाराखडी, किंवा (अ-पासून अः-पर्यंतची) संपूर्ण स्वरमाला पुढच्यास उपलब्ध असे, वगैरे. किंवा, अगदी फारच झाले, तर मग ल आल्यास, 'आ लौट के आ जा मेरे मीत' हे गाणे (केवळ ते (त्रिवार) 'लौऽऽऽट के आऽऽऽऽऽऽ'ने सुरू होते, या बळावर) खपवून दिले जाई. (अन्य प्रसंगी तेच गाणे अ अक्षर आल्यावरसुद्धा चालवले जाई. थोडक्यात काय, सोयीकरिता गाणे वाटेल तेथे सुरू करणे नि वाटेल तेथे तोडणे, इतपत चीटिंग होतही असे नि क्वचित्प्रसंगी खपूनसुद्धा जात असे.)

मात्र, या लेखात दिल्याइतका भयंकर प्रकार भेंड्यांच्या इतिहासात आजतागायत झाला नसावा.

(तर आता मला सांगा. आहे कोणाची बिशाद, मी स्वतः भेंड्या लावल्या नाहीत म्हणण्याची? QED.)

==========

तळटीपा:

हा शब्द मराठीतल्यासारखा जोडशब्द आहे (किंबहुना, मराठीतूनच उचललेला आहे), अशी आमची समजूत कित्येक वर्षे होती. त्याने ते गाणे अधिक सार्थ होते, ती गोष्ट वेगळी.

'दोस्तना' म्हणजे 'बारहसिंगा'सारखा काही प्रकार असावा, असा विचार करून आम्ही ते प्रकरण सोडून दिले होते. "पण मग त्यात विशेष ते काय सांगितलेत?" अशी शंका वारंवार आली, तरीही.

ते 'काहीतरी काहीतरी' बोले तो 'आँख मिली, और' आहे, असे नुकतेच गूगलशोधावरून कळले. आमच्या वेळेस ही सुविधा उपलब्ध नसल्याकारणाने, ते 'काहीतरी काहीतरी' आम्ही तसेच ठोकून देत असू. ते फाऊल धरले जात असले, तरीही.

ढ-करिता कोठेच गाणे मला या क्षणी आठवत नसल्याकारणाने, तूर्तास येथेच पुरे करतो.

आय मीन, 'लल्ला लल्ला लोरी' नि 'रे माम्मा रे माम्मा रे', काय गाणी आहेत!५अ

५अ ल-करिता 'लो आ गयी, उन की याद, वो नहीं आये', किंवा र-करिता 'रात ने क्या क्या ख़्वाब दिखाए' नाहीतर 'रहे ना रहे हम, महका करेंगे', असली गाणी कोणालाही चुकूनसुद्धा आठवत नसत. निदान, पहिल्या फटक्याला तरी.५अ१

५अ१ अर्थात, ल-करिता फारसे पर्याय नसावेत बहुधा; र-करिता पुष्कळ असावेत, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

असे झाल्यास त्यावर हमखास 'डम डम डिगा डिगा' हे गाणे (कर्मफळ म्हणून) येई.६अ, ६ब

६अ हे गाणे रचणाऱ्यास उलटा टांगून मिरच्यांची धुरी, इ.इ.

६ब या गाण्याची अश्लील आवृत्ती आमच्या पिढीत बरीच लोकप्रिय होती. तर ते एक असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावरून तुम्ही भेंड्या (गाण्याच्या) 'खेळलात' हे सिद्ध होते. तुम्ही भेंड्या (अगेन, गाण्याच्या) 'लावल्यात' हे सिद्ध होत नाही. तुम्ही भेंड्या लावल्या (म्हणजे आयोजित केल्या) हे सुद्धा सिद्ध करून दाखवा पाहू. अर्थात, मला तुम्हांला हा प्रश्न विचारण्याचे काही प्रयोजन नाही आणि त्याचे तुम्ही उत्तर देण्यास बांधीलही नाही, तरीही, जस्ट क्युरिअस. काय म्हणता न'बा?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

का तुम्ही समीरा रेड्डीला भयंकर म्हणत आहात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही समीरा रेड्डी कोण, याची मला पुसटशीसुद्धा कल्पना नसल्याकारणाने (थँक गॉड!), तिला 'भयंकर' म्हणण्याचे कोणतेही प्रयोजन मजजवळ नाही. (अर्थात, उलटपक्षी, तिने भयंकर असण्यास मला काही प्रत्यवायसुद्धा नाही, ही बाब अलाहिदा. फक्त, आय प्लीड इग्नरन्स, इतकेच म्हणायचे आहे.)

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनामी थांबवा

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे कालवण चिकट, बुळबुळीत नाही होत का? भेंडीचे दाणे भाजीमध्ये जेव्हा दाताखाली येउन टचकन फुटतात, तेव्हा आवडतात पण चव काही खास वाटली नव्हती कधी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही होत ,त्यासाठीच गुळदाव भाजून घेतलं ना आपण .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'गुळदाव' बोले तो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुळदाव बोले तो ओ ओ ओ ओ ओ अंम
वाफवल्यासारख
अर्ध कच्च , शिजयला लागले अस वाटायल की थमाबायच,
नाहीच समाजाऊन सांगता येत अस वाटत असेल तर - घर आओ बातएनगे
(जरा typing जमेपर्यंत सांभाळून घ्या )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अल् देन्ते म्हणा की मग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही होत ,त्यासाठीच गुळदाव भाजून घेतलं ना आपण .

धन्यवाद सुलभा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'गुळदाव' हा शब्द आपल्याला समजला, असा आपला दावा आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडं भाजुन घ्यायचं. मंद आचेवर किंचीत परतणे म्हणजे गुळदाव बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा शब्द पूर्वी कधी ऐकला / वाचला नव्हता.

अवांतर: गुळभेंडी हे ज्वारीच्या एका वाणाचं नाव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मध्ये शिजवणं अभिप्रेत आहे ना? इथे भाजण्याचा उल्लेख आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चालेल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

‘गुळदाव’ हा शब्द गूगल केल्यावर एक जात्यावरची ओवी सापडली:

माझ्या चुड्याईचं सोनं, गुळदाव का हाई मोती
मला पुसती सया, नारी कुठं घरनं आली होती

यावरूनही नीट कळत नाहीच, पण त्या पानावर ‘smooth and shining’ असं भाषांतर दिलं आहे.

https://ccrss.org/database/songs.php?semantic_class_id=E13-03-01c02

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

प्रमाण शब्द गूळधवा असावा. दाते कोशात 'गूळ'खाली हे सापडलं -
॰धवा-धा- धिवा-धुवा-देवा-धेवा-धावी-पु. केवळ तांबडा नव्हे, केवळ पांढरा नव्हे असा मिश्र रंग; गुळी रंग. -वि. अशा रंगाचा (मोती, इ॰ पदार्थ). ॰धानी-वि. लालसर; गुळधवा रंगाचा (मोती).
इथे पाहा.

हा रंग येईपर्यंत दाणे भाजावे, असा अर्थ असू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अच्छा म्हणजे गुलाबीसर, सरसरीत भाजून घ्यायचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही पाककृती आपल्या बापजन्मात करणेही होणार नाही आणि खाणेही होणार नाही. तरीपण तुमच्या चिकाटीला सलाम!

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंय. भेंडीचे दाणे म्हणजे चिकाटी आलीच.
---
पाककृती उघडेपर्यंत... हा लेख विनोदी असेल अशी अपेक्षा होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मौजमजा सदरात चिकटविल्यास अनेकांचा अपेक्षाभंग टळेल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकुणात काय भेंडीचा व्यवस्थित गुळदाव कीस पडलेला आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भेंडीच्या दाण्यांची भाजी माझ्याकरता इतकी फार फेच्ड संकल्पना आहे की यापुढे एखादा पाककृतीचा धागा भेंडीचे दाणे किसून हलवा असा निघाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. सबकुछ देख लिया. अब ऊठा ले रे भगवान टाइप झाले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0